राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेबाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबांचे महत्वाचे विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रेची आज मणिपूरमधून सुरुवात होत आहे. ही न्याय यात्रा देशात अन्यायाविरोधात एक लोकचळवळ उभा करेल, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते सातारा येथे भारत जोडो न्याय यात्रेच्या स्टिकरचे अनावरण करण्यात आले. ते पुढं म्हणाले की, राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा मणिपूर ते मुंबई अशी असणार आहे तसेच हि यात्रा 15 राज्यातून 100 जिल्ह्यातून जवळपास 6500 किमी चे अंतर पार करणार आहे. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेच्या यशस्वीतेनंतर आता राहुल गांधी अन्यायाच्या विरोधात जनआंदोलन उभं करत आहेत यासाठीच त्यांची हि न्याय यात्रा असेल.

आज या न्याय यात्रेची सुरुवात खोंगजोम या गावातून झाली. यावेळी राहुल गांधींच्या सोबत काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह काँग्रेस चे वर्किंग कमिटी सदस्य, काँग्रेस चे खासदार उपस्थित होते.