लोकसभा निवडणूक निकालावर पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले की,

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । देशातल्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. देशातील लोकसभा निवडणुकीच्या निकालावर काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. “2024 ची लोकसभा निवडणूक जनता विरुद्ध मोदी अशी होती. मोदींनी स्वतः ला देशापेक्षा मोठे समजले व मी म्हणजेच ह्या देशात सर्व चालणार या अविर्भावात प्रचार केल्याने भाजपला बहुमत मिळाले नसल्याने हा मोदींचा नैतिक पराभव असल्याची टीका माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, काँग्रेस पक्षाने जनतेचे मुद्दे घेऊन प्रचार केला तर मोदींनी जाती धर्माचे राजकारण केले, कोणतेही विकासाचे मुद्दे न घेता द्वेषपूर्ण प्रचार करीत देशातील वातावरण बिघडविण्याचे काम नरेंद्र मोदींनी केले. देशातील पहिले पंतप्रधान असतील ज्यांनी प्रचारातच स्वतःच्या नावाने प्रचार केला, काही निवडणुकीत तर देवाचा अवतार असून आईच्या पोटी जन्म न घेता माझा थेट पृथ्वीवर जन्म झाले असल्याचे हास्यास्पद विधान केले होते. मोदींचे ध्रुवीकरणाचे राजकारण जनतेने नाकारले आहे.

महाराष्ट्रात अत्यंत अपेक्षितच निकाल लागला असून भाजप च्या फोडाफोडीच्या राजकारणाला जनतेने जागा दाखवली आहे. सातारा च्या निकालाबाबत आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, सातारा लोकसभेचा निकाल अत्यंत धक्कादायक निकाल आहे. सातारा हा पुरोगामी विचारांचा जिल्हा आहे. सर्व विधानसभा मतदारसंघात अत्यंत चांगला प्रचार केला गेला होता. एकजुटीने सर्वांनी प्रचार करूनही झालेला पराभव धक्कादायक आहे.