कराड प्रतिनिधी । भारत जोडो यात्रानंतर काँग्रेस ने संघटन वाढीसाठी मोठी तयारी केल्याचे दिसते. याचं अनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कडून राज्यातील सर्व 48 लोकसभा मतदार संघात काँग्रेसची ताकद वाढीसाठी निरीक्षक म्हणून पक्षातील जेष्ठ नेत्यांना जबाबदारी दिली आहे त्यानुसार माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांना कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानुसार आ. पृथ्वीराज चव्हाण दोन्ही लोकसभा मतदार संघातील काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
भारत जोडो यात्रेनंतर देशात काँग्रेस चे वातावरण निर्मिती झाली व त्यानंतर कर्नाटक मध्ये बहुमताने काँग्रेसची सत्ता आल्यानंतर देशातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला. याचं अनुषंगाने महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या माध्यमातून जरी निवडणूक लढविण्याची तयारी असली तरी काँग्रेस पक्षाने 48 लोकसभा मतदार संघाचा आढावा मुंबई येथे काँग्रेस मुख्यालयात घेतला होता. त्यानंतर आता जेष्ठ नेत्यांकडून प्रत्येकी 2 लोकसभा मतदार संघाची जबाबदारी देत निरीक्षक म्हणून दौरा केला जाणार आहे.
पक्षाच्या संघटनेचा व सद्य राजकीय परिस्थिती बाबत आढावा घेण्यासाठी सूचना दिल्याने त्यानुसार आ. चव्हाण हातकणंगले व कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील सर्व विधानसभा मतदार संघातील काँग्रेस कार्यकर्त्यांशी तसेच माजी लोकप्रतिनिधी सोबत संवाद साधणार आहेत. तसेच जुने काँग्रेस पदाधिकारी-लोकप्रतिनिधी यांच्या निवासस्थानी भेट देऊन काँग्रेस सोबत राहण्यासाठी संवाद मोहीम हाती घेतली आहे.