कराड प्रतिनिधी । कराड शहरातील पाणी पुरवठा टंचाईची परिस्थिती निर्माण झाल्यापासून ते कराड शहराला पाणी पुरवठा पूर्ववत करेपर्यंत नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जे अहोरात्र काम केले. त्यांच्या या कामाबद्दल माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकप्रतिनिधी या नात्याने पाणी पुरवठा विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचे नगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रात जाऊन आभार मानले.
कराड शहरातील पाणी पुरवठा खंडित झाल्यानंतर आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रात तातडीने संबंधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची मिटिंग घेऊन आढावा घेत 5 महत्वाच्या सूचना केल्या. त्या महत्वाच्या 5 सूचनापैकी 3 सूचनाची तातडीने अंमलबजावणी पालिकेकडून केली गेली. जुने जॅकवेल तातडीने सुरु करून तात्पुरती व्यवस्था उभी केली गेली व त्यामाध्यमातून शहराला पाणी पुरवठा काही प्रमाणात सुरु झाला.
या प्रक्रियेत कराड शहराला टँकर च्या माध्यमातून पालिकेचे कर्मचाऱ्यांनी महत्वाची भूमिका बजावत काम केले तसेच जल शुद्धीकरण केंद्रातून शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अहोरात्र कष्ट केले. त्याबद्दल लोकप्रतिनिधी या नात्याने कृतज्ञतेच्या भावनेतून आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी जलशुद्धीकरण केंद्रामध्ये प्रत्यक्ष भेट देऊन कर्मचाऱ्यांचे आभार मानून संवाद साधला.