भाजपने महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला नेले; काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । मोदी, शहा व अदानींनी नकळत मुंबई हातात घेतली आहे. गेल्या दहा वर्षात भाजपने महाराष्ट्राला छळले असून अनेक मोठे प्रकल्प गुजरातला नेल्याने महाराष्ट्राचा विकास खुंटला. महाराष्ट्राचा सरकारी मालमत्ता उद्योगपतींच्या घशात घातल्या. आम्ही आवाज उठवल्यानंतर मंत्र्यांनी श्वेतपत्रिका काढतो म्हणून सांगितले. ती श्वेतपत्रिका कुठाय? असा सवाल करत आमचे सरकार आल्यानंतर विकासकामांच्या बोगस टेंडरची चौकशी करणार असल्याचा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला.

मुंबईचे अर्थिक विकास केंद्र गुजरातला पळवले

कराड दक्षिणमधील काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचारार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांनी विजयी निर्धार मेळावा आयोजित केला होता. मेळाव्यात बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, भाजपच्या नेत्यांनी मुंबईचे आर्थिक विकास केंद्र गुजरातला पळवले. कराड-चिपळूण रेल्वे मार्गाचे भूमिपूजन झाले असताना तो निधी मोदींनी बुलेट ट्रेनला वळवला. पालघर जिल्ह्यात होणारी मरीन अकॅडमी मोदींनी द्वारकेला पळवली. मात्र, राज्यातील भाजप नेत्यांनी त्यांना विरोध केला नाही.

बोगस टेंडर काढून विकासाची पोस्टरबाजी

महायुती सरकारने बोगस टेंडर काढून विकासाची पोस्टरबाजी सुरू केली. आमचे सरकार आल्यानंतर या सर्व प्रकारांची केली जाणार आहे. ही निवडणूक राज्याच्या भवितव्याची आहे. भाजपचे सरकार आपल्या डोक्यावर घ्यायचे आहे का, पुन्हा वर्णव्यवस्था लादून घ्यायची का, याचा गांभीर्याने विचार करा. मी जगातील अनेक देशांचा आणि भारतातील राज्यांचा विकास पाहायला आहे. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना, खंडकरी शेतकऱ्यांना जमिनी परत करण्याची योजना, १०८ रुग्णवाहिकेची योजना आम्ही आणली. भाजपने त्यांची नावे बदलल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार येणार

कराड दक्षिणमध्ये पैशाचा वारेमाप वापर होईल. कोणी खोटी आश्वासने देवून निघून जाईल. पण माझा तुमच्यावर विश्वास आहे. तुमच्या आशीर्वादाने मी खासदार, केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्री झालो. हे मी कधीच विसरणार नाही. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. कराड दक्षिणच्या विकासाला साथ देउन इतिहास घडवूया, असं आवाहन पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं.