कराड प्रतिनिधी | कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील विविध गावात मूलभूत सोयी सुविधा उभारण्यासाठी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. राज्याच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाने याबाबतचा शासन निर्णय नुकताच प्रसिद्ध केला. यामध्ये मतदारसंघातील ६४ विकासकामांचा समावेश करण्यात आला आहे.
आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी गाव अंतर्गत मूलभूत सुविधांच्या कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध विकासकामांचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. त्यांचा प्रस्ताव विचारात घेवून कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील ६४ विविध विकासकामांसाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामध्ये गोवारे (१० लाख), कोयना वसाहत (७ लाख), मुंढे (१० लाख), वारुंजी (१० लाख), गोटे (१० लाख), विंग (१५ लाख), येरवळे (१० लाख), येणके (७ लाख), पोतले (१० लाख), शिंदेवाडी – विंग (१० लाख), बामणवाडी (१० लाख), वानरवाडी (५ लाख), पवारवाडी – बामणवाडी (१० लाख), शिंदेवाडी – कोळे (५ लाख), शिबेवाडी (५ लाख), कारंडेवाडी – बामणवाडी (५ लाख), तारुख (७ लाख), कोळेवाडी (१० लाख), कूसुर (१० लाख), शिंगणवाडी (७ लाख), गोळेश्वर (७ लाख), कार्वे (१० लाख), पाचवडवस्ती (१० लाख),
आटके (१० लाख), रेठरे खुर्द (१० लाख), संजयनगर – शेरे (७ लाख), नांदगाव (१० लाख), पवारवाडी – नांदगाव (१० लाख), ओंड (१० लाख), कालवडे (१० लाख), बेलवडे बुद्रुक (१० लाख), तुळसण (१० लाख), विठोबाचीवाडी (७ लाख), पाचुपतेवाडी (७ लाख), नायकवडीवाडी – सवादे (७ लाख), उंडाळे (२० लाख), घोगाव (१० लाख), मनव (५ लाख), टाळगाव (५ लाख), शेवाळेवाडी – उंडाळे (१० लाख), लटकेवाडी (५ लाख), येळगाव (५ लाख), येणपे (१० लाख), म्हासोली (७ लाख), शेवाळेवाडी – म्हासोली (७ लाख), येवती (५ लाख), घराळवाडी (७ लाख), गणेशवाडी (५ लाख), शेवाळेवाडी – येवती (१० लाख), चोरमारवाडी (५ लाख), हणमंतवाडी (५ लाख), बांदेकरवाडी – सवादे (५ लाख), हवेलवाडी – सवादे (५ लाख), साळशिरंबे (१० लाख), चौगुलेमळा (७ लाख), अंबवडे (७ लाख), वडगाव हवेली (१० लाख), काले (२२ लाख), जिंती (५ लाख) आदी कामांसाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. निधी मंजूर करण्यासाठी राज्य सरकारने सहकार्य केल्याबद्दल आ. चव्हाण यांनी आभार मानले.
गेली अडीच वर्षे राज्यात महायुतीचे सरकार आहे. भाजप, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचे एकत्रित सरकार आहे. त्यामुळे विरोधी गटाच्या आमदारांना शासनाकडून निधी मिळण्यासाठी मर्यादा पडत आहेत. अशा परिस्थितीत आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी आतापर्यंत कोट्यवधीचा निधी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील विकासासाठी आणला आहे. सत्ता आणि सरकार वेगळ्या पक्षांकडे असल्याने विरोधी आमदारांना मतदारसंघात निधी मिळवताना प्रयत्न करावे लागतात. असे असूनही आ. पृथ्वीराज चव्हाण मतदारसंघाचा विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे पदोपदी जाणवते.