पत्नी सत्वशिला समवेत मतदान केल्यानंतर पृथ्वीराजबाबांनी व्यक्त केला ‘हा’ विश्वास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सातारा लोकसभा निवडणूक 2024 साठी सातारा जिल्ह्यात आज मंगळवारी दि. ७ रोजी रखरखत्या उन्हात चुरशीने मतदान होत आहे. या दरम्यान, आज दुपारी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड येथील नगरपालिका शाळेत पत्नी सत्वशिलासमवेत मतदान केले. जनता इंडिया आघाडीला साथ देऊन आणि देशात सत्तांतर होईल याची मला खात्री आहे, असा विश्वास माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.

माजी मुख्यमंत्री आमदार चव्हाण यांनी मतदान केल्यानंतर माध्यमांची संवाद साधला. ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीसाठी कुठे दहशत, आमिषे, कुठे पद देतो, कर्ज देतो असे अमिषे दाखवली असली तरी या विरोधी पक्षाच्या खासदाराला तीन वेळा यापूर्वी जनतेने निवडून दिलेले आहे. त्यांची बारा वर्षाची कारकीर्द लोकांच्या समोर आहे. त्यामुळे मागच्यापेक्षा या वेळेला सातारा लोकसभा मतदारसंघाचा महाविकास आघाडीचा उमेदवार जास्त मताधिक्याने निवडून येईल.

भाजपने कॅशलेस करप्शन केले आहे, त्यामुळे त्यांना नोटांची गरज भासत नाही. निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून नोटांशिवाय करप्शन करण्याचा विक्रम भाजपने केला आहे. त्यामुळे त्यांना नोटांची गरज आता भासत नाही. पूर्वी भासत होती. सर्वोच्च न्यायालयाने त्यावर परखड मत मांडले असल्याचे सांगत चव्हाण भाजपवरील निशाणा साधला.