कराड प्रतिनिधी । काँग्रेस पक्षामध्ये 45 आमदारांचा आमचा गट आहे. त्यातील 30-31 आमदार फुटून बाहेर जातील, याची अजिबात शक्यता नाही. मात्र, जाणीवपूर्वक भाजपकडून खोट्या अफवा पसरविण्याचे काम सुरू आहे. त्यांना साधा मंत्रिमंडळाचा विस्तार करता येत नाही. विधान परिषदेच्या बारा आमदारांची नियुक्ती करता येत नाही, हे वाटते तितके सोपे नसल्याचे विधान माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
राज्यात भाजप व अजित पवार गटाकडून काही आमदार फोडाफोडीचे काम केले जात असल्याने यावरून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड येथे माध्यमांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री अजित पवार गटावर व भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले की, “भाजपला एका पक्षाची सत्ता किंवा एका पक्षाचे हुकूमशाही प्रस्थापित करायची आहे. राज्यात सत्तेचा गैरवापर, दबाव, दहशत, ईडी, सीबीआय याचा वापर करून काही नेते दहशतीखाली भाजपकडे गेले असले. तरी लोक शरद पवारांना सोडून जाणार नाहीत. याचा प्रत्यय काही दिवसांतच येईल. एकंदरीत पाहता हुकूमशाहीच्या दिशेने देश नेण्याचे काम सुरू आहे.
अनेकवेळा भाजपचे नेते अमित शहा म्हणाले की, देश काँग्रेसमुक्त करायचा आहे. ते जर असे म्हणत असतील तर त्यांना माझा सवाल आहे की, काँग्रेसमुक्त म्हणणे म्हणजे तुम्हाला विरोधी पक्ष नको आहे? छोटे पक्ष नको आहेत? एकाच पक्षाचे सरकार पाहिजे आहे. यावरून एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे भाजपला हुकूमशाही पाहिजे. त्यामुळे देशात हुकूमशाही निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हुकूमशाहीच्या दिशेने देश नेण्याचे काम सुरू आहे. ते जाऊ द्यायचं, की नाही हे जनतेच्या हातात असल्याचे आ. चव्हाण यांनी म्हंटले.
निलंबनाच्या बाबतीत विधानसभा अध्यक्षांना निर्णय हा द्यावाच लागणार
यावेळी आ. चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष निवडीबाबतही आपली भूमिका मंडळी. ते म्हणाले की, विधानसभा अध्यक्षापुढे एकनाथ शिंदे गटाविरुद्ध पक्षांतर बंदीचा कारवाई चालू झालेली आहे. त्यामुळे कोणाला नोटीस द्यायची?, कोणाला साक्षी करता बोलवायचे? हे ठरवून विधानसभा अध्यक्ष त्यांची कार्यवाही करतील. साधारणतः 10 ऑगस्टच्या सुमारास निलंबनाच्या बाबतीत विधानसभा अध्यक्षांना निर्णय हा द्यावाच लागणार आहे. विधानसभेचे अध्यक्ष हे घटनात्मक पदावर बसलेले असल्यामुळे त्यांना घटनेच्या चौकटीमध्ये राहूनच काम करावे लागेल हे नक्की. आहे.