पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार साताऱ्यात; नेमकं कारण काय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान असून त्यांचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. पंतप्रधान मोदी हे साताऱ्यात प्रथम २०२९ च्या लोकसभा पोट निवडणूकीवेळी आले होते. त्यानंतर आता लोकसभा निवडणुकीच्यापूर्वी ते पुन्हा सातारा येथे येणार आहेत. त्यांच्या सातारा दौऱ्याचं कारण देखील खास आहे.

शिवप्रभूंचे राजघराणे व तमाम शिवभक्तांच्या वतीने देण्यात येणारा पहिला ‘शिवसन्मान पुरस्कार’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर करण्यात आला आहे. साताऱ्यात दि. १९ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य-दिव्य सोहळ्यात या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. पुरस्कार वितरणाचा सोहळा साताऱ्यातील सैनिक स्कूलच्या मैदानावर पार पडणार आहे.

या जागेची आज बुधवारी दुपारी भाजप खासदार उदयनराजे भोसले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, सातारा पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी पाहणी करून कार्यक्रमाची तयारी, त्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजना, सुरक्षा आदी बाबींचा आढावा घेतला. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचनाही केल्या. यावेळी सुनील काटकर, माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, काका धुमाळ, पंकज चव्हाण, विनीत पाटील आदी उपस्थित होते.

पंतप्रधान मोदी सर्वप्रथम ‘या’ दिवशी आले होते साताऱ्यात

२०१९ मध्ये झालेल्या सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडून उदयनराजे भोसले निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यावेळी 17 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथम साताऱ्यात येत प्रचारसभा घेतली होती. त्यानंतर आता पंतप्रधान मोदी हे साताऱ्यात येणार आहेत.