Narendra Modi : कराडातील महाविराट सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल; हात जोडत केला नमस्कार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सातारा लोकसभा निवडणूक 2024 (Satara Lok Sabha Election 2024) मधील सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची कराड येथे आज सोमवार, दि. 29 विराट महाविजय सभा होत आहे. या सभेसाठी पंतप्रधान मोदी थोड्यावेळापूर्वीच दाखल झाले. यावेळी या ठिकाणी त्यांचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. या ठिकाणी त्यांनी सभेतून जनतेस संबोधित केले.

यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, लोकसभा उमेदवार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, भाजपचे सातारा लोकसभा निवडणूक प्रभारी डॉ. अतुल भोसले, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम आदींसह भाजपची वरिष्ठ नेतेमंडळीही उपस्थित आहेत.

सभेसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली जाणार आहे. कराड दक्षिण, कराड उत्तर व पाटण या तीन विधानसभा मतदार संघांसाठी कराड हे मध्यवर्ती ठिकाण समजले जाते. त्यामुळे मोदींची सभा कराड येथे घेण्यात आल्याने सभास्थळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहिले आहेत.

पंतप्रधान मोदी दुसऱ्यांदा सातारा जिल्ह्यात…

2019 मध्ये झालेल्या सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीवेळीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सातार्‍यात सैनिक स्कूलच्या मैदानावर सभा झाली होती. त्यानंतर आता पंतप्रधान मोदी आज सातारा जिल्ह्यातील कराड येथे आले आहेत.