सातारा प्रतिनिधी । कोयना दौलत डोंगरी महोत्सव 15 ते 17 एप्रिल 2025 कालावधीत पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली दौलतनगर मरळी या ठिकाणी होणार आहे. या महोत्सवाची प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरु आहे.
महाराष्ट्र शासनाचा पर्यटन विभाग, कृषी उत्पन्न बाजार समिती पाटण व जिल्हा प्रशासनाच्यावतीने दौलत नगर येथे कोयना दौलत डोंगरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये कृषी प्रदर्शनाबरोबर पशुपक्षी प्रदर्शनाचे, महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाचे स्टॉलही असणार आहेत. कोयना दौलत डोंगरी महोत्सवामध्ये घोडे सवारी, वॉटर स्पोर्ट, इलेक्ट्रिक बग्गी , आनंदमेळा त्याचबरोबरकोयना दौलत डोंगरी महोत्सवाच्या सांगता कार्यक्रम यामध्ये महाराष्ट्राची लोकधारा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे.
या कोयना दौलत डोंगरी महोत्सवाला जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी उपस्थित रहावे यासाठी महोत्सवाच्या माहितीसाठी पारंपरिक माध्यमे, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे तसेच विविध समाज माध्यमांद्वारेही माहिती देण्यात येत आहे.