जिल्ह्यात शिष्यवृत्ती परीक्षेसाठी तयारी पूर्ण, ‘इतके’ विद्यार्थी देणार परीक्षा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे उद्या रविवार दि. १८ फेब्रुवारी रोजी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येणार आहे. याची जवळपास सर्व तयारी पूर्ण झाली आहे. या पाचवीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातील १४० परीक्षा केंद्रांवर १९ हजार ३२२ विद्यार्थी तर आठवीसाठी १०२ परीक्षा केंद्रातून १३ हजार ८५६ विद्यार्थी परीक्षेला बसणार असल्याची माहिती प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

मुजावर यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे की, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा संपूर्ण राज्यात १८ फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार आहेत. सातारा जिल्ह्यात इयत्ता पाचवीची १४० व आठवीची १०२ परीक्षा केंद्रे आहेत. जिल्ह्यात पाचवीच्या परीक्षेसाठी सर्वाधिक २४ परीक्षा केंद्र फलटण मध्ये आहेत यात १ हजार ७७९ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. सातारा तालुक्यातील २३ परीक्षा केंद्रातून तब्बल ३ हजार ८५८ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

इयत्ता आठवीच्या परीक्षेसाठी सातारा तालुक्यात २० परीक्षा केंद्रे आहेत. यात २ हजार ९५७ विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहेत. सर्वात कमी ३ परीक्षा केंद्र खंडाळा तालुक्यात असून यात ६२६ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. जिल्हास्तरावरून व तालुकास्तरावरून परीक्षा केंद्रांना भेटी देण्याबाबत नियोजन झाल्याचे मुजावर यांनी यावेळी सांगितले.