जिल्ह्यात खरीप हंगामपूर्व कामास सुरुवात; कृषी विभागाकडे ‘इतक्या’ हजार क्विंटल बियाण्यांची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडून ऊस हे पीक घेतले जाते. ऊस पिकासोबत इतर पिके घेण्यास कृषी विभागाकडून सहाय्य केले जाते. यावर्षीचा खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी कृषी विभाग सज्ज झाला असून, चालू वर्षी 2 लाख 44 हजार 400 हेक्टर क्षेत्रावर पेरणीचा अंदाज आहे. त्यासाठी कृषी विभागाने ४४ हजार ७९५ क्विंटल बियाण्यांची मागणी केली असून, 1 लाख 36 हजार टन खताची मागणी असून सध्या ७० हजार ६९२ टन खत उपलब्ध आहे.

पूर्वमोसमी पाऊस झाल्याने पोषक वातावरण झाल्याने मशागतीच्या कामांना वेग आला आहे. आडसाली उस लागवडीसाठीची शेतकऱ्यांची तयारी सुरू झाली आहे. पेरणीची कामेही वेळेत करता यावी या दृष्टीने मशागतीची कामे उरकली जात आहेत. जिल्ह्यात खरीप हंगामासाठी दोन लाख ४४ हजार ४०० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन आहे. त्यासाठी कृषी विभागाने बियाणे व खतांची उपलब्धता करून ठेवण्याची लगबग सुरू केली आहे.

जिल्ह्याला 1 लाख 9 हजार 500 टन खताची मंजुरी

यंदा एक लाख ३६ हजार टन खतांची आवश्यकता आहे. त्यापैकी एक लाख नऊ हजार ५०० टन खतांची मागणी केली आहे. त्यामध्ये युरिया ३७ हजार ७०० टन, डीएपी दहा हजार टन, एसएसपी ११ हजार ७०० टन, एमओपी चार हजार १०० टन, एकूण संयुक्त ४६ हजार टन अशी खतांची मागणी केली आहे. जिल्ह्याला 1 लाख 9 हजार 500 टन खताची मंजुरी झाली आहे.