कराड प्रतिनिधी । केंद्रात, राज्यात अनेक वर्षे मंत्री राहिलेल्या जेष्ठ नेते शरद पवार यांनी ४०-४५ वर्षाच्या काळात महाराष्ट्राला त्यांनी काय दिले? शरद पवार हे जर नोकऱ्या, रोजगार पाहिजे असेल तर मी सांगतोय त्याला निवडुन द्या असे सांगत असतील तर ४० वर्षे तुम्ही काय केले? आमदार बाळासाहेब पाटील हे २५ वर्षे आमदार आहेत. २५ वर्षे झाले तरीही लोकांसमोर येत आहात. येणाऱ्या काळात कराड उत्तरमधून भाजपचे आमदार म्हणून मनोज घोरपडे निवडुन येतील. आणि कराड दक्षिणमधुन पृथ्वीराज चव्हाण हे पराभुत होऊन अतुल भोसले हे आमदार होतील, असे भाजपचे नेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी म्हंटले.
कराड येथे भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी शनिवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी दरेकर म्हणाले की, आघाडी सरकार केंद्रात असताना एक लाख ९१ हजार कोटी निधी मिळाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर गेल्या दहा वर्षात १० लाख १५ हजार ९०० कोटी रुपये मिळाले. ११ व्या क्रमांकावर असलेली अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आणली आहे. उध्दव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना राज्यातील फक्त पाच प्रकल्पांना सुधारीत प्रशासकीय मान्यता दिली.
शरद पवार हे जर नोकऱ्या, रोजगार पाहिजे असेल तर मी सांगतोय त्याला निवडुन द्या असे सांगत असतील तर ४० वर्षे तुम्ही काय केले? आमदार बाळासाहेब पाटील हे २५ वर्षे आमदार आहेत. २५ वर्षे झाले तरीही लोकांसमोर येत आहात. विरोधकांची पोल जनतेसमोर उघडा झाला आहे. कराड दक्षिणमधुन पृथ्वीराज चव्हाण हे पराभुत होऊन अतुल भोसले हे आमदार म्हणुन निवडून येतील तसेच साताऱ्यातील आठही मतदार संघातील महायुतीचे उमेदवार निवडून येतील यात शंका नाही,. महाविकास आघाडीला मदत होण्यासाठी मराठा समाजाचा नेता मनोज जरांगे-पाटील हे उदयोन्मुख होत होता त्याचा नेतृत्वाचा राजकीय स्वार्थासाठी ऱ्हास करण्यात आलेला असल्याचे दरेकर यांनी यावेळी म्हटले.