चांद्रयान 3 च्या यशात काले गावातील प्रवीणचाही हातभार; बजावली ‘ही’ मोठी भूमिका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । २३ ऑगस्टला भारताने चांद्रयान 3 मोहीम फत्ते करून नवा इतिहास रचला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोचणारा भारत हा जगातील पहिला आणि एकमेव देश ठरला आहे. भारताच्या या यशानंतर संपूर्ण देशात उत्साह साजरा केला जात असून भारतीय अंतराळ संशोधन केंद्र असलेल्या ISRO च्या शास्त्रज्ञांचा गौरव केला जातोय. चांद्रयान ३ च्या या देदीप्यपणा यशात कराड तालुक्यातील काले येथील प्रवीण कुंभार यांचाही मोठा हातभार आहे. प्रवीण कुंभार हे सध्या इस्रो स्पेस अॅप्लिकेशन सेंटर अहमदाबाद येथे मायक्रोवेव्ह पेलोड मेकॅनिकल विभागात (MPMD) कार्यरत आहे.

2016 च्या लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षेत प्रवीण भीमराव कुंभार द्वितीय क्रमांकाने’ उत्तीर्ण होऊन “मशीन डिझायनर-B” म्हणून निवड झाली होती. प्रवीणने चांद्रयान ३ च्या का-बँड अल्टिमीटरच्या सेन्सर प्रणालीच्या यांत्रिक रेखाचित्रात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे भारताच्या या चांद्रयान मोहिमेत कालेकर प्रवीणचा सुद्धा खारीचा वाटा दिसून येत आहे.

इस्रोमध्ये काम करत असताना अनेक दिग्गज शास्त्रज्ञांना भेटण्याची आणि काम करण्याची संधी मिळाली. चांद्रयान ३ विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरचे यशस्वी लँडिंग हा माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण आहे. चांद्रयान ३ च्या यशस्वी लँडिंगनंतर, त्यासाठी काम करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांनी आनंद साजरा केला आणि एकमेकांना मिठी मारली अशी प्रतिक्रिया प्रवीण कुंभार यांनी दिली.

महात्मा गांधी विद्यालयात काले येथे घेतले शिक्षण

डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी अज्ञानाच्या अंधारातून बहुजनांना शिक्षणाची दारे खुली करून कराड तालुक्यातील काले येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्याच काल्यातील महात्मा गांधी विद्यालयात प्रवीण कुंभार यांनी आपलं हायस्कुल पर्यतचे शिक्षण पूर्ण केलं सर्वांसाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. काले येथे शिकत असताना दिगंबर यादव गुरुजींनी शिष्यवृत्ती परीक्षेच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा आणि अभ्यास करून घेतला. पाचवीपासून महात्मा गांधी विद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर नवोदय परीक्षेची तयारी, रयत टॅलेंट सर्च परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, अशी तयारी झाली. पुढे गेल्यावर ही तयारी कामी आली. आमच्या हायस्कूलचे कला शिक्षक कनुंजे सर यांनी केलेले चित्रकला आणि प्राथमिक/मध्यवर्ती परीक्षेची तयारी हा माझ्या डिझाइन आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा पाया आहे असं प्रवीण कुंभार यांनी म्हंटल.