सातारा प्रतिनिधी | शूरवीर जिवाजी महाले यांचा जयंती उत्सव आज दि. ९ ऑक्टोबर या दिवशी सर्वत्र साजरा केला जातो. दरम्यान आज सातारा जिल्ह्यातील प्रतापगड येथे जयंती उत्सव साजरा केला जाणार आहे, अशी माहिती ‘स्वाभिमानी नाभिक संघटने’चे राज्याध्यक्ष शंकरराव गायकवाड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ मूर्तीचे आणि शूरवीर जिवाजी महाले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात येणार आहे.
त्यानंतर सकाळी १०:३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीवर आणि शूरवीर जिवाजी महाले यांच्या प्रतिमेवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली जाणार आहे. सकाळी ११:३० वाजता शूरवीर जिवाजी महाले यांच्या जीवनावर आधारित पोवाडे, ऐतिहासिक कार्यक्रम, मान्यवरांचे व्याख्यान आणि मार्गदर्शन होणार आहे. तरी या कार्यक्रमाला सर्वांनी अवश्य उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले.