सातारा लोकसभेसाठी ‘वंचित’च्या ‘या’ उमेदवाराकडून उमेदवारी अर्ज दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्हा सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष प्रशांत कदम यांनी वंचित बहुजन आघाडीतून आपला उमेदवारी अर्ज शुक्रवारी दाखल केला. सातारा मतदारसंघाचा आगामी खासदार माजी सैनिकांमधून असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी कदम यांनी निवडक सहकार्‍यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला.

डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने कदम यांची उमेदवारी जाहीर करून राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले आहे. सातार्‍यात नुकत्याच झालेल्या सैनिक मेळाव्यात कदम यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा मनोदय व्यक्त व्यक्त केला होता. वंचित आघाडीच्या उमेदवारीमुळे सातारा मतदारसंघातील लढत रंगतदार होण्याची शक्यता आहे.

सातारा लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कदम यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला असल्यामुळे याची चांगलीच चर्चा सध्या सुरू आहे. परिणामी निवडणुकीत वंचितच्या या उमेदवारास किती मते पडतील हे पहावे लागणार आहे. तसेच या उमेदवाराच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकर हे सुध्दा सातारा दौऱ्यावर येणार हे नक्की.