बच्चूभाऊ कडूंच्या समर्थनार्थ ‘प्रहार’च्या कार्यकर्त्यांनी साताऱ्यात रोखला पुणे -बंगळूर महामार्ग रोखला

0
137
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शेतकरी, दिव्यांग यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार अपंग क्रांती संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी सूरु केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी सातारा जिल्ह्यातील प्रहार अपंग क्रांती आंदोलन, दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्था, दिव्यांग फाउंडेशन यांच्यासह सर्व दिव्यांग बांधवांनी खिंडवाडी येथे पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्ग रोखुन धरला. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत महामार्ग रोखून धरत पाठिंबा दिला.

आज गुरुवारी महामार्गावर केलेल्या या आंदोलनात अमोल कारंडे, प्रशांत बगले, दिलखुश गायकवाड, अमोल भातुसे, आनंदा पोतेकर, गणेश सकुंडे, गणेश पवार, अजय पवार, शैलेंद्र बोर्डे यांच्यासह जिल्ह्यातील कार्यकर्ते सहभागी झाले होते.

या आंदोलनामुळे कराड बाजूकडून पुणे बाजूकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. सातारा तालुका पोलीस आणि शहर पोलीस यांचा कडेकोट बंदोबस्त होता, दरम्यान, पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के आणि निलेश तांबे यांनी विनंती केल्यानंतर आंदोलन स्थगित केले. तेथून आंदोलनकर्त्यांनी राजधानी साताऱ्यात लाँग मार्च काढून आपल्या मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना दिले.