सातारा प्रतिनिधी । महायुतीच्या सातारा लोकसभा जागेच्या उमेदवारीबाबत घटक पक्षाच्या नेत्यांची अजूनही खलबते सुरू आहेत. भाजपानेही शक्तिप्रदर्शन व महायुतीचे मेळावे घेतले आहेत. दरम्यान, उदयनराजेंनी दिल्लीत जाऊन राजकीय कौशल्य पणाला लावले; तसेच दिल्लीहून येताच शक्तिप्रदर्शन करीत आपली उमेदवारी असल्याचे जाहीर केले; परंतु त्यांच्या उमेदवारीबाबत अद्याप राज्यातील नेते दिल्लीकडे बोट दाखवत आहेत. तर राष्ट्रीय नेतृत्वाने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलेले नाही. अशात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी उदयनराजे भोसले यांच्याबाबत मोठं विधान केले आहे. त्यामुळे चर्चाना उधाण आले आहे.
आज प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, उदयनराजे भोसले यापूर्वी देखील आमच्या पक्षाच्या घड्याळ चिन्हांवरच निवडून आले आहेत. त्यांना आम्ही याहीवेळेस उमेदवारी देऊ शकतो. याबाबत एक ते दोन दिवसात साताऱ्यातील उमेदवारीबाबत मार्ग निघून जाईल.
साताऱ्याच्या जागेबाबत आम्हीही उदयराजे भोसले यांना उमेदवारी देऊ शकतो. असा आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. कारण ते एक महाराज आहेत. त्यांचा मोठा एक आहे. मटार, याबाबत एक ते दोन दिवसात काही तरी मार्ग निघेल, असे विधान पटेल यांनी केले आहे. त्यांच्या विधानामुळे सातारा लोकसभा मतदार संघ हा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्याचे स्पष्ट होत असून या गटात आता कोण निवडणुकीस उमेदवार असणार? याचाही चर्चा सुरु झाली आहे.