सातारच्या प्राची ताकतोडे सांभाळणार जिल्हा काँग्रेस लोकसभा समन्वयकाची जबाबदारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । आगामी लोकसभा निवडणुकीमुळे सर्वच पक्ष संघटनात्मक बांधणीसाठी तसेच पक्ष प्रचारासाठी तयारीला लागली आहेत. यासाठी काही यवा पदाधिकाऱ्यांवर नव्या जबाबदारी देखील सोपविल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणजे सातारा जिल्ह्यातील प्राची राहुल ताकतोडे या सातारा शहरात व जिल्ह्यात गेली अनेक वर्षे काँग्रेस पक्षच काम अतिशय प्रामाणिकपणाने करत आहेत. त्यांच्या कार्याची दखल युवक काँग्रेसच्या वतीने त्यांच्यावर सातारा जिल्हा लोकसभा समन्वयक पदाची नवीन जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुनलदादा राऊत, प्रदेश युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे व सातारा जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमरजित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राची यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.

मूळच्या साताऱ्यातील असलेल्या प्राची ताकतोडे यांच्याकडे सध्या प्रदेश युवक काँग्रेसच्या सचिव पदाबरोबर सोलापूर लोकसभा समन्वयक पदाची जबादारी आहे. त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये शक्ती सुपरशी या राष्ट्रीय युवक काँग्रेसच्या महिलांसाठी असलेल्या प्रकल्पाचे काम त्या ही अतिशय जोमाने करत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल युवक काँग्रेसने घेऊन त्यांच्यावर सातारा जिल्हा लोकसभा समन्वयक पदाची नवीन जबाबदारी दिली आहे.