कराड तालुक्यातील किरपे गावच्या प्राचीने मिळवलं ‘गोल्ड मेडल’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील किरपे गावच्याप्राची अकुंश देवकर हिने साऊथ आशियाई ज्युनियर चॅम्पियन स्पर्धेत 3 हजार मीटरमध्ये गोल्ड मेडल मिळवून यश संपादन केले आहे. प्राचीने केलेल्या या कामगिरीमुळे किरपे गावासह जिल्ह्यातील क्रिडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

चेन्नई येथे सध्या साऊथ आशियाई ज्युनियर चॅम्पियन स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धेत अवघ्या 9 मिनिट 57.20 सेंकद वेळेत प्राचीने गोल्ड मिळवले. किरपे गावची प्राची देवकर हीचे अतुल पाटील प्रशिक्षक आहेत.

सध्या ती बेंगलोर येथे प्रशिक्षण घेत आहे. प्राची कराड येथील वेणूताई चव्हाण महाविद्यालयाची विद्यार्थींनी आहे. तसेच आशियाई ज्युनियर स्पर्धेत प्राची देवकरने गोल्ड मेडल मिळवल्याबद्दल प्रशिक्षक अतुल पाटील, क्रिडाप्रेमी सुनील बामणे, सलीम मुजावर, प्रकाश काटवटे, सरपंच प्रज्ञा देवकर, उपसरपंच विजय देवकर, पोलिस पाटील प्रविणकुमार तिकवडे, शंकरराव माने, अकुंश देवकर, कृष्णत माने, बजरंग कदम आदींनी तिचे अभिनंदन केले.