कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील नांदगाव येथील मातोश्री सिंधुताई विश्वनाथ सुकरे स्मृतीमंच व श्वेता १ ग्रॅम गोल्ड यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच भव्य सिंधू सुगरण स्पर्धा नुकतीच पार पडली. पौष्टिक तृणधान्यापासून बनवलेल्या २०० वर पाककृती घेऊन महिला स्पर्धक स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. त्यात ओंड येथील ७५ वर्षाच्या आजी प्रभावती ठोके यांच्या नाचणीचे पट्टू ने प्रथम क्रमांक मिळवला. त्या नांदगावच्या सिंधू सुगरण ठरल्या.
नांदगाव, ता.कराड येथील मातोश्री सिंधुताई सुकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त गतवर्षीपासून पाककला स्पर्धा सुरू करण्यात आल्या आहेत. यावर्षीही या स्पर्धेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. नांदगाव व पंचक्रोशीतील १५० वर महिला स्पर्धकांनी यात सहभाग नोंदवला. स्पर्धेचे उदघाटन प्रा. नरेंद्र सुर्यवंशी, प्रा. हेमंत शेटे, स्नेहल शेटे, विजय कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दक्षिण मांड व्हँली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वि. तु. सुकरे गुरुजी, माणिकराव थोरात, बालीश थोरात, सुनील पवार, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत सुकरे, दिलीप महाजन यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
दरम्यान शाहिर थळेंद्र लोखंडे यांनी कथा ,कविता सादर करीत महिलांचे मनोरंजन केले.आहारतज्ज्ञ वर्षा पाटील यांनी ग्रामीण महिला व त्यांचे आरोग्य याविषयी मार्गदर्शन केले. प्रा.नरेंद्र सुर्यवंशी व स्नेहल शेटे यांनी पाककला स्पर्धेचे परिक्षण केले. दक्षिण मांड व्हँली शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वि.तु.सुकरे( गुरुजी ),श्वेता १ ग्रँम गोल्डचे संचालक विजय कदम, सरपंच हंबीर पाटील, बाजार समितीचे माजी संचालक सतीश कडोले, आण्णासो पाचंगे, अरुण पाटील, तंटामुक्ती समितीचे उपाध्यक्ष जयवंत मोहिते आदी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
या ‘सुगरणी’ ठरल्या अव्वल!
1) प्रथम –प्रभावती ठोके(ओंड)
2) द्वितीय- स्मिता युवराज तिवाटणे(ओंड)
3) तृतीय – केतकी भूषण इंदापूरे (कासारशिरंबे)
4) उत्तेजनार्थ- संध्या गाडे, कविता माने, स्वाती थोरात, अश्विनी पाटील, शोभा कोठावळे, दिव्या थोरात, स्वाती शिंदे, सुवर्णा माळी, श्वेता जाधव, दिपाली तांबवेकर, स्मिता थोरात.