कराड प्रतिनिधी । संपूर्ण देशभर हर घर तिरंगा उपक्रम राबवण्यात येत आहे. हर घर तिरंगा या भारत सरकारच्या विशेष उपक्रमातंर्गत 15 ऑगस्ट या कालावधीत घरोघरी व शासकीय कार्यालयावर राष्ट्रध्वज फडकविणेत येत आहे. या अपक्रमांतर्गत 78 व्या स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने कराड महसूल विभाग व सर्व शासकीय कार्यालये शिक्षण विभाग, कराड शहरातील सर्व शाळामधील विद्यार्थ्यांच्या वतीने तिरंगा रॅली काढण्यात आली.
यावेळी उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. यानंतर कराड येथील प्रशासकीय कार्यालय येथे ध्वजवंदन करुन गटशिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहरातील विविध शाळा कॉलेज मधील विदयार्थी व शिक्षक यांच्या वतीने कराड शहरातून प्रभात फेरी काढण्यात आली. या प्रभातफेरीच्या शुभारंभप्रसंगी कराडच्या तहसीलदार श्रीमती कल्पना ढवळे, अनिकेत पाटील, निवासी नायब तहसीलदार बाबुराव राठोड, महेश उबारे, कराड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बिपिन मोरे, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय खरात, दुय्यम निबंधक देशमुख यांनि उपस्थिती लावली होती.
यावेळी प्रभातफेरीत संत तुकाराम हायस्कूलचा चित्ररथ लक्षवेधक ठरला. कै. रामविलास कन्या प्रशाला, यशवंत हायस्कूल , कासम दानेकरी ॲग्लो स्कूल हौसाई कन्या शाळा,हायस्कूल, टिळक हायस्कूल, एस एम एस स्कूल, विटामाता हायस्कूल, शिवाजी हायस्कूल, महाराष्ट्र हायस्कूल आदी शाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रभातफेरीत शिक्षक, नागरिक तसेच कृषी, महसूल, उपकोषागार कार्यालयांची अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग घेतला.