सातारा प्रतिनिधी | जागतिक बँक अर्थसहाय्यित मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प, पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शिरवळ येथे नुकतेच ‘शेळी व परसातील कुक्कुट पालन प्रशिक्षण’ या विषयावर प्रशिक्षण पार पडले. यावेळी पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. अनिल भिकाने यांनी दृकश्राव्य प्रणालीद्वारे उपस्थित प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले.
यावेळी प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. पऺचकोर तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी या महाविद्यालयाचे प्रभारी सहयोगी अधिष्ठाता डॉ. मुकुंद आमले हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून पशुसंवर्धन विभागाच्या स्मार्ट प्रकल्प समन्वयक डॉ. करगावकर मॅडम, डॉ. निलेश खलाटे, विद्यापीठाचे या प्रकल्पाचे समन्वयक डॉ. सारिपुत्त लांडगे व डॉ. गितांजली ढुमे दृकश्राव्य माध्यमाद्वारे उपस्थित होते.
उपस्थित दृकश्राव्य प्रणाली द्वारे उपस्थित होते.
यावेळी डॉ. भिकाने म्हणाले की,पशुसखींनी प्रशिक्षणा दरम्यान या महाविद्यालयातील विविध विषयातील तज्ञ प्राध्यापकांनी व्याख्यान व प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून केलेल्या मार्गदर्शनाचा लाभ स्वतःची आथिर्क उन्नती साधण्यासोबतच आपल्या परिसरातील पशुपालक व कुक्कुट पालन करणार्या व्यावसायिकांना सहकार्य करण्यासाठी करावा.
यावेळी पशुसंवर्धन विभागाच्या स्मार्ट प्रकल्प समन्वयक डॉ. करगावकर मॅडम, डॉ. निलेश खलाटे, विद्यापीठाचे या प्रकल्पाचे समन्वयक डॉ. सारिपुत्त लांडगे व डॉ. गितांजली ढुमे दृकश्राव्य माध्यमाद्वारे उपस्थित होते. यावेळी यशस्वी प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र, माहितीपुस्तिका व प्रथमोपचार पेटीचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.