माढा लोकसभा निवडणुकीसाठी लोकसभा निरीक्षकांनी दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश

Satara News 2024 03 01T161744.031 jpg

सातारा प्रतिनिधी | आगामी होणारी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा महायुतीच्या माध्यमातून स्वतः निवडणूक लढवणार असलेल्या लोकसभा मतदारसंघावर निरीक्षक नेमले आहेत. माढा लोकसभा मतदारसंघात लोकसभा निरीक्षक तथा केंद्रीय अर्थराज्यमंत्री ना. भागवत कराड व आमदार प्रसाद लाड यांनी माढा लोकसभा मतदारसंघाचा प्राथमिक आढावा बैठकीद्वारे घेतला आहे. यामध्ये भाजपच्या उमेदवाराला प्रचंड मतांनी विजयी करण्यासाठी सर्वजण कार्यरत रहावे,असे निर्देश माढा … Read more

साताऱ्यातील ‘इतके’ वसुली विभागाच्या रडारवर; 5 लाखांहून अधिक आहे थकबाकी

Satara News jpg

सातारा प्रतिनिधी | आवाहन करुनही कर भरणा न करणाऱ्या मिळकतदारांवर पालिकेच्या वसुली विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. 5 लाखाहून अधिक थकबाकी असणाऱ्या शहरातील 30 मिळकदारांना जप्तीची नोटीस बजावण्यात आली. मालमत्ता कर, पाणी कर, स्वच्छता कर, अग्निशमन कर, विकास कर आदी प्रकारचे कर पालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत आहे. या करातूनच नागरिकांना पायाभूत सेवा-सुविधा पुरविल्या जातात. शहरातील … Read more

कराडात चित्रा वाघ कडाडल्या, संदेशखालीतील घटनेचा निषेध करत ठाकरेंसह राठोडांवर साधला निशाणा

Karad News 53 jpg

कराड प्रतिनिधी । आज संपुर्ण राज्यभरात भाजप पदाधिकाऱ्यांकडून संदेशखालीतल्या महिला अत्याचाराच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात येत आहे. याला पाठिंबा म्हणून आज कराड भाजप पदाधिकाऱ्यांच्या वतीने येथील कोल्हापूर नाक्यावर महात्मा गांधी यांच्या पुतळा परिसरात आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पश्चिम बंगालची भूमी महिलांसाठी चालता-बोलता नरक बनलीय. या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी ममता बॅनर्जींसारखी … Read more

सातारा लोकसभेसाठी मुख्यमंत्र्यांचे पदाधिकाऱ्यांना आदेश; म्हणाले तयारीला लागा…

Satara News 2024 03 01T105014.371 jpg

सातारा प्रतिनिधी । शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे सातारा जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट वर्षा बंगल्यावर जावून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नुकतीच भेट घेतली. यावेळी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेसाठी जिल्ह्यातील सकारात्मक वातावरण आणि पदाधिकारी व शिवसैनिकांनी केलेल्या निर्धाराबाबत सविस्तर चर्चा केली. ‘अभी नहीं तो कभी नहीं’च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आग्रही भूमिका मांडली. यावेळी … Read more

सातारा लोकसभा निवडणुकीसाठी कराड तालुक्यातील मराठा समाजबांधवांचा निर्धार

Karad News 20240301 094116 0000 jpg

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील मराठा समाज बांधवांची गुरूवारी सायंकाळी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत मराठा बांधवांच्या वतीने महत्वाचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, सगेसोयर्‍यांबाबत अध्यादेश काढण्याचे आश्वासन देऊन शासनाने मराठा समाजाची फसवणूकच केली असल्याची संतप्त भावना कराडमधील मराठा समाज बांधवांनी व्यक्त केली आहे. सत्ताधार्‍यांसह विरोधकांना धडा शिकवण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावातून एक ते दोन उमेदवारी … Read more

पुण्यावर दावा तर सांगली, सोलापूरही लढविण्याची काँग्रेसची तयारी – सोनलबेन पटेल

Congress News 20240301 092128 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे तीन पक्ष एकत्र येऊन काम करत आहेत. पुण्यावर काँग्रेसचा दावा असून सांगली आणि सोलापूर मतदारसंघही लढविण्याची तयारी आहे. त्याचबरोबर राजू शेट्टी आमच्याबरोबर आल्यास हातकणंगले मतदारसंघ त्यांना देण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव सोनलबेन पटेल यांनी गुरुवारी स्पष्ट केले. सातारा येथील जिल्हा काँग्रेस कमिटीत आयोजित पत्रकार … Read more

उद्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून साताऱ्यासह सांगली, कोल्हापूर लोकसभेचा घेतला जाणार आढावा

Satara News 2024 02 28T180120.221 jpg

सातारा प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. दरम्यान, सातारा, सांगली आणि कोल्हापूर मतदारसंघाबाबत चर्चा आणि आढावा घेण्यासाठी राष्ट्री य काँग्रेसच्या विधानसभा निरीक्षक, तालुकाध्यक्षांची महत्वाची बैठक उद्या, गुरुवारी (दि २९) सातारा येथे आयोजित करण्यात आली आहे. सातारा येथील काँग्रेसच्या महत्वाच्या बैठकीपूर्वी प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री सतेज … Read more

लोकसभा, विधानसभेच्या 2014 आणि 2019 निवडणूक काळात किती गुन्हे झाले होते दाखल?

Satara News 2024 02 28T130148.225 jpg

सातारा प्रतिनिधी । लोकसभा आणि विधानसभेच्या 2014 तसेच 2019 मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यांची आकडेवारी आणि करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती पोलीस प्रशासनाने जाहीर केली आहे. सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2014 मध्ये एकूण 31 दखलपात्र गुन्हे दाखल झाले होते. त्यातील अ फायनल-2, क फायनल- 2, अबेट फायनल- 1, निर्दोष, -15, शाबित- 6, कोर्ट पेडिंग- 2, आरोपी निष्पन्न- 90. … Read more

प्राथमिक सहकारी सोसायटी हा सहकारचा मुख्य पाया – ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर

Karad News 50 jpg

कराड प्रतिनिधी | सहकारी तत्वावर कार्यरत असणाऱ्या प्राथमिक सहकारी सोसायट्यांच्या माध्यमातून शेतीच्या अर्थकारणाला मोठी चालना मिळाली आहे. त्यामुळे प्राथमिक सहकारी सोसायटी हा सहकारचा मुख्य पाया असल्याचे प्रतिपादन ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी केले. कापील विकास सेवा सोसायटीच्या शताब्दी पूर्ती निमित्त सभासदांना भेटवस्तू, वाहन वितरण आणि ज्येष्ठ सभासदांचा सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी खरेदी विक्री संघाचे … Read more

पाणी प्रश्न पेटला… जिल्ह्यात ‘या’ ठिकाणी पाण्यासाठी चक्क वाघ्या मुरळीद्वारे जागरण

Vaduj News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात दुष्काळ भाग म्हणून ओळख असलेल्या खटाव तालुक्यात पाणी प्रशन चांगलाच पेटला आहे. खटाव तालुक्याच्या पाणी प्रश्नासाठी खटाव तालुका पाणी संघर्ष समितीच्या वतीने येथील तहसीलदार कार्यालयासमोर प्रशासनाच्या दारात जागरण, गोंधळ घालण्यात आला. यावेळी वाघ्या मुरळीद्वारे ‘पाण्यासाठी नाचते मी पर्वा कुणाची..’ चे सादरीकरण करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. खटाव तालुक्यात सध्या पिण्यासह … Read more

कोयना (शिव सागर) जल पर्यटनबाबत सामंजस्य करार

koyna news 20240228 083954 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ यांच्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये सामंजस्य करार काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील मुनावळे येथे शिव सागर जलाशय मध्ये जागतिक दर्जाचे जल पर्यटन विकसित करण्यात येणार आहे. या जल पर्यटन सुविधेमुळे या परिसरातील पर्यटनाला मोठी चालना मिळेल, असा … Read more

सातारा बाजार समितीत झाली कोटीची उलाढाल; कांदे-बटाटेसह झाली भाज्यांची आवक

Satara News 2024 02 27T191620.702 jpg

सातारा प्रतिनिधी । केंद्र शासनाने बाजार समितीच्या धोरणात बदल करुन कायमस्वरूपी प्रशासकाची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला होता. या केंद्र सरकारच्या निर्णयाच्या निषेधार्थ काल सोमवारी जिल्ह्यातील मुख्य बाजार समित्यांनी आपले व्यवहार बंद ठेवले होते ते आज मंगळवारी सकाळी पुन्हा सुरू केले. त्यामुळे आज दिवसभरात एक कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल झाली. तसेच सातारा बाजार समितीत तर कांदा … Read more