जानकरांनी घेतली संजीवराजेसह रघुनाथराजे नाईक-निंबाळकरांची भेट; 2 तास कमराबंद केली चर्चा

Mahadev Janakar News 20240322 073050 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | भाजप ‘हायकमांड’ने माढा लोकसभेसाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवला आहे. त्यामुळे दुखावलेले गेलेले धैर्यशील मोहिते-पाटील यांची नाराजी अजुनही दूर झालेली नाही. त्यामुळे त्यांनी मतदारसंघातील गावभेटीवर जोर दिला आहे. तर ‘रासप’चे महादेव जानकर यांनीही संजीवराजे आणि रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांची भेट घेतली. तिघांच्यामध्ये सुमारे दोन तास कमराबंद चर्चा पार पडली. तिघांच्या … Read more

फलटणच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात रामराजेंची खोचक टीका; म्हणाले की…

Phaltan News 20240322 065801 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | नरेंद्र मोदी, अमित शहा आम्हाला माहिती नाहीत. आम्ही तेवढे मोठे पण नाही. आमचं देणं घेणं अजितदादांशी आहे, असं सांगत देवेंद्र फडणवीस यांच्या ऐवजी रणजितसिंह निंबाळकरांनाच मुख्यमंत्री करा, अशी खोचक टीका आमदार रामराजे नाईक-निंबाळकरांनी कोळकी (ता. फलटण) येथील मेळाव्यात केली. मतदान कमी झाल्यास आम्ही जबाबदार नाही भावनेच्या भरात तुतारी धरु, मशाल धरु, शिट्टी … Read more

साताऱ्याहून मुंबईला जाताना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या मोटारीला अपघात, आठवले सुखरूप

Ramdas Athawale News 20240321 201115 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | साताऱ्याहून मुंबईकडे जात असताना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मोटारीला कंटेनरने धडक दिली. पुणे-बंगळुरू महामार्गावरील भुईंज (ता. वाई) हद्दीतील बोगद्यात ही घटना घडली आहे. या अपघातात आठवले यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले असून रामदास आठवले हे सुखरूप आहेत. दुसऱ्या वाहनाने ते मुंबईकडे रवाना झाले. आठवलेंच्या गाडीचे मोठे नुकसान घटनास्थळावरून मिळालेल्या … Read more

फडणवीसांसोबतच्या चर्चेनंतर रामराजे आज घेणार मेळावा; काय भूमिका स्पष्ट करणार?

Ramraje Nimbalakr News 20240321 103952 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी होवू घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन आज दि. 21 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता अनंत मंगल कार्यालय, कोळकी येथे केले आहे. विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी काही महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने … Read more

खासदार उदयनराजे अचानक दिल्लीला रवाना, उमेदवारीचा गुंता सुटणार?

Satara News 20240321 064244 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचा गुंता सुटायला तयार नाही. तो गुंता सोडवण्यासाठी आणि उमेदवारीच्या संदर्भात निर्णायक चर्चा करण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले दिल्लीला रवाना झाले आहेत. राजे समर्थकांचे फोन अचानक आऊट ऑफ कव्हरेज लागू लागल्याने राजांच्या दिल्लीवारीच्या शक्यतेला पुष्टी मिळाली आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी यंदा लोकसभेत पुढच्या दाराने सभागृहात पोहोचण्याचा चंग बांधला आहे. … Read more

सातारा जिल्ह्यातून 1400 मुली, महिला बेपत्ता; आ. शिवेंद्रसिंहराजेंनी दिले पोलीस अधीक्षकांना निवेदन

Satara News 2 jpg

सातारा प्रतिनिधी । गेल्या काही दिवसांपासून सातारा जिल्ह्यामध्ये मुली किंवा महिला बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झालेली पहायला मिळत आहे. वृत्तपत्रांमध्ये दररोज मुली अथवा महिला बेपत्ता झाल्याच्या बातम्या येत असतात. मिळालेल्या महितीनुसार आज अखेर आपल्या सातारा जिल्ह्यामधून सुमारे १४०० मुली, महिला बेपत्ता झाल्या असल्याचे समजत आहे. ही बाब अतिशय गंभीर आणि चिंताजनक आहे. बेपत्ता महिला, … Read more

पोलीससह ‘महावितरण’च्या भरतीसंदर्भात पाटण तालुका मराठा समाजाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन

Patan News 6 jpg

पाटण प्रतिनिधी । एसईबीसी १० टक्के मराठा आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत महावितरण आणि पोलिस मेगा नोकरभरती थांबवावी आणि सध्या सुरू असलेली मेगा भरती पुढे ढकलावी अशी मागणी पाटण तालुक्यातील सकल मराठा समाजाच्यावतीने करण्यात आली आहे. मराठा समाजबांधवांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या मागण्यांचे निवेदन प्रांताधिकार्‍यांना दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळाच्या एकदिवसीय … Read more

राज्यातील 13 साखर कारखान्यांना 1898 कोटींची कर्जहमी; सातारा जिल्ह्यातील 2 कारखान्यांचा समावेश

Satara News 2024 03 20T135111.796 jpg

सातारा प्रतिनिधी । लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काही सहकारी साखर कारखान्यांना तब्बल १८९८ कोटींचे कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय नुकताच राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील दोन सहकारी साखर कारखान्यांचा देखील समावेश आहे. विशेष म्हणजे आचारसंहिता लागू होण्या अगोदर मंत्रीमंडळाच्या उपसमितीने या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. सातारा जिल्ह्यातील … Read more

Satara Lok Sabha Election 2024 : जिल्ह्यातील मराठा समाजाचे 2 उमेदवार लढवणार लोकसभा निवडणूक; ‘या’ गावात घेतली शपथ

Satara News 2024 03 20T125820.662 jpg

सातारा प्रतिनिधी । देशात लोकसभा निवडणूक घोषणा झाल्यानंतर सर्व पक्ष कामाला लागले आहेत. अशात अवघ्या एका महिन्यावर येऊन ठेपलेल्या या लोकसभा निवडणुकीसाठी (Satara Lok Sabha Election 2024) उमेदवार निश्चिती केल्या जात आहेत. अशात मराठा आरक्षणासाठी लढणारा मराठा समाज आता थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमधून मोठ्या संख्येनं मराठा समाजाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार … Read more

Udyanaraje Bhosale : खा. उदयनराजेंनी घेतली थेट फडणवीसांची भेट; सागर बंगल्यावर घडामोडींना वेग

Satara News 2024 03 20T115845.114 jpg

सातारा प्रतिनिधी । लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची घोषणा झाली असताना देखील अजून सातारा लोकसभा मतदार संघात महायुती तसेच महाविकास आघाडीकडून उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर भाजपकडून खा. उदयनराजे भोसले (Udyanaraje Bhosale) यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी खा. उदयनराजेंच्या समर्थकांनी केली आहे. या दरम्यान, भाजप नेते तथा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी … Read more

कराड तालुक्यातील शेतकऱ्यांकडून दिवंगत यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळी अभिवादन

Karad News 75 jpg

कराड प्रतिनिधी । विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील चील गव्हाण या गावचे शेतकरी साहेबराव करपे यांनी १९ मार्च १९८६ रोजी कुटुंबासह सामूहिक आत्महत्या केली. राज्यातील ती पहिली शेतकरी आत्महत्या असल्याचे मानले जाते. यानंतर गेल्या ३८ वर्षात राज्यात हजारो शेतकऱ्यांनी दुर्दैवी आत्महत्या केल्या. त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त कराड तालुक्यातील शेतकऱ्यांनी मंगळवारी दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी अभिवादन करत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना … Read more

अजित पवारांसह खासदार, आमदारांनी जात्यांध पक्षांबरोबर जाणं देश हिताचं नाही – श्रीनिवास पाटील

Satara News 2024 03 19T110108.189 jpg

सातारा प्रतिनिधी । “ईडी, इन्कम टॅक्सची भीती आणि राजकीय दबावातून अजित पवारांसह खासदार, आमदारांनी जात्यांध पक्षांबरोबर जाणं राजकीयदृष्ट्या देश हिताचं नाही,” असं वक्तव्य खासदार श्रीनिवास पाटील यांनी निष्ठावतांच्या मेळाव्यात केलं आहे. वाई विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला आमदार शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, सुनील माने, सारंग पाटील, डॉ. सुनील सावंत, … Read more