एपीएमसी शौचालय घोटाळ्यावरून आरोप-प्रत्यारोप, खा. उदयनराजे अन् शशिकांत शिंदेंनी काय दिली प्रतिक्रिया…

Udayanraje Bhosale News 20240426 085447 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | नवी मुंबई बाजार समितीतील शौचालय घोटाळ्यावरून साताऱ्यातील महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. साताऱ्याची निवडणूक महायुतीच्या हातून गेल्यामुळेच आपल्यावर भ्रष्टाचाराचे खोटे आरोप केले जात असल्याची प्रतिक्रिया मविआचे उमेदवार शशिकांत शिंदेंनी दिली आहे, तर शशिकांत शिंदेंवर त्यांच्या कर्मामुळे ही वेळ आली असल्याची टीका खा. उदयनराजेंनी केली आहे. आ. शशिकांत … Read more

आश्वासने देऊन खोऱ्यानं मते घेणाऱ्या काँग्रेस नेत्यांनी जनतेकडं दुर्लक्ष केलं; उदयनराजेंचा हल्लाबोल

Udayanraje Bhosale News 20240425 190839 0000 jpg

पाटण प्रतिनिधी | काँग्रेसच्या नेत्यांनी निवडणुकांमध्ये जनतेला भरघोस आश्वासने देऊन खोऱ्याने मते मिळवली. निवडून आल्यानंतर मात्र जनतेकडं साफ दुर्लक्ष केलं. त्यामुळे देशाला प्रगतीपथावर नेणाऱ्या भाजप सरकारच्या हाती सत्ता देण्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केलं. पाटण तालुक्यातील ढेबेवाडी, गुढे येथील संवाद मेळाव्यात ते बोलत होते. सत्तेत असताना धरणांची कामे का केली नाहीत पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या … Read more

सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये, अन्यथा जशास तसे उत्तर देवू; आ. शिवेंद्रराजेंचा इशारा

Shivendraraje Bhosale News 20240425 115109 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | देगाव एमआयडीसीचे शिक्के उठवणाऱ्यांनी सातारकरांचे नुकसान केले आहे. बाहेरच्या लोकांनी येऊन सातारा जिल्ह्यातील जनतेला स्वाभिमान शिकवू नये. विकासाच्या आड येणारे सातारकरांना स्वाभिमान शिकवत असतील तर त्यांना त्याच भाषेत उत्तर देवू, असा इशारा आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी दिला. खा. उदयनराजे भोसले यांच्या प्रचारानिमित्त सोनगाव (ता. सातारा) येथील सप्तपदी मंगल कार्यालयात झालेल्या शेंद्रे जिल्हा … Read more

एकनाथ शिंदेंच्या गावाशेजारील मुनावळे जलपर्यटनस्थळी बोटीतून 100 टक्के मतदानाचा संदेश

Munawale News 20240425 054053 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीत १०० टक्के मतदान होण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विविध पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. अशाचप्रकारे जावळी तालुक्यातील मुनावळे या जलपर्यटनस्थळीही प्रशासनाने बोटींचा वापर करुन निवडणुकीची ७ मे ही तारीख आणि १०० टक्के मतदान करणारच अशा संदेशाचा अभिनव उपक्रम राबवून पर्यटक तसेच नागरिकांत जागृती करण्याचे महत्वपूर्ण काम केले. सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक होत … Read more

…तर सातारा जिल्ह्यात मोदी अन् पवारांची एकाच दिवशी झाली असती विराट सभा

Satara District Political News 20240424 185836 0000 jpg

कराड प्रतिनिधी | संपूर्ण देशासह राज्याचे लक्ष लागलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या आखाड्यात प्रचारासाठी दिग्गज नेत्यांनी आपले दंड थोपटले आहे. शरद पवार यांच्या सातारा जिल्ह्यात तीन सभा होत आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील महाराष्ट्रात सभा आयोजित केल्या असून त्यांची सातारा जिल्ह्यातील कराड येथे सभा होत आहे. यात विशेष म्हणजे दि. 30 एप्रिल रोजी … Read more

नरेंद्र मोदींच्या कराडातील प्रचार सभेची तारीख बदलली; 30 ऐवजी होणार ‘या’ दिवशी सभा

Modi News 20240424 120821 0000 jpg

कराड प्रतिनिधी | पंतप्रधान नरेंद्र गोदी यांच्या कराडमध्ये होणाऱ्या सभेत बदल करण्यात आलेला आहे. जी सभा ३० एप्रिल रोजी होणार होती ती आता २९ एप्रिल रोजी सोमवारी सैदापूर येथे दुपारी दोन वाजता होणार आहे. पुणे व बारामती येथील सभांची कार्य व्यस्तता लक्षात घेऊन हा बदल करण्यात आलेला आहे. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली … Read more

मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप हा देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ, उदयनराजेंचा हल्लाबोल

Satara News 20240424 073541 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज, महायुतीचे उमेदवार छ. उदयनराजे भोसले आणि महाविकास आघाडीचे उमेदवार तथा माथाडी नेते शशिकांत शिदे यांच्यातील हाय व्होल्टेज लढतीकडे राज्याचं लक्ष लागून आहे. साताऱ्यात दोन्ही उमेदवारांसाठी राष्ट्रीय नेत्यांच्या सभाही होणार आहेत. तत्पूर्वी उदयनराजेंनी भाजप हा देशाचे भविष्य आणि काँग्रेस हा भूतकाळ असल्याचा जोरदार हल्लाबोल केला आहे. सातारा : … Read more

लोकसभा मतदानाची वेळ वाढवून देण्याची सातारा शहर भाजपाची मागणी, काय आहेत कारणे?

Satara News 20240423 172433 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा शहर भाजपच्या वतीने उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन लोकसभा मतदानाची वेळ वाढवून मिळावी, अशी मागणी शहराध्यक्ष विकास गोसावी यांनी उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी भगवान कांबळे यांच्या मार्फत जिल्हाधिकारी तथा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी, सातारा यांच्याकडे केली आहे. आत्ताची परिस्थिती पाहता, उन्हाचा तडाखा वाढला असून, उष्माघाताने अनेक नागरिकांना खूप त्रास होत आहे, अनेक … Read more

लेक उदयनराजेंसाठी राजमाता कल्पनाराजे भोसले उतरल्या मैदानात, व्यापारी पेठेत जाऊन वाटली प्रचार पत्रके

Satara News 20240423 161926 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले यांनी साताऱ्यातील व्यापारी पेठेमध्ये जाऊन व्यापाऱ्यांना महायुतीचे उमेदवार छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांचे प्रचार पत्रक सर्व व्यापाऱ्यांना वाटप केले. दरम्यान, पोवई नाक्यावरील सुशांत नावंधर यांच्या नेतृत्वाखाली व्यापारी (PNVM) यांचा उदयनराजे यांना जाहीर पाठींबा दर्शवला. शिवेंद्रसिंहराजे यांच्या शहारातील कट्टर समर्थकांनी दिली उदयनराजे यांची साथ. राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे … Read more

सातारा मतदारसंघात 10 अपक्षांसह 16 उमेदवार निवडणूक रिंगणात

Satara News 20240423 065959 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी अर्ज माघार घेण्याचा दिवस होता. या दिवशी निवडणुकीच्या रिंगणातून पाच उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे व महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्यासह एकूण 16 उमेदवार निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये तब्बल दहा अपक्षांचा समावेश आहे. या उमेदवारांना लागलीच निवडणूक चिन्हेही दिली गेली … Read more

सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

Karad News 20240422 170607 0000 jpg

कराड प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील कराड येथील द यशवंत को-ऑपरेटिव्ह बँकेतील करोडो रुपयांच्या अपहार प्रकरणी सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्यासह रोहित भीमराव लभडे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज पुण्यातील विशेष न्यायाधीश (एमपीआयडी) के.पी नांदेडकर यांनी फेटाळला आहे. द यशवंत कोऑपरेटिव्ह बँक (शाखा कराड, जि. सातारा) चे अध्यक्ष शेखर सुरेश चरेगावकर व द चिखली अर्बन … Read more

पालकमंत्र्यांच्या घराशेजारील भिंतीवर रेखाटलेलं उदयनराजेंचं तैलचित्र पुसलं, नेमकं कारण काय?

Satara News 20240422 113634 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | साताऱ्यात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या घराबाहेरील भिंतीवर रेखाटल्या गेलेल्या खासदार उदयनराजे भोसले यांच्या तैलचित्राचा ‘ईश्यू’ झाल्याने हे तैलचित्र रातोरात पुसले गेले आहे. लोकसभा निवडणुकीत याचा फटका बसू नये म्हणून चित्र पुसून ‘डॅमेज कंट्रोल’चा प्रयत्न केल्याचे मानले जात आहे. सातारा शहरात पोवई नाक्यावर पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे घर आहे. या घराच्या बाजूलाच असलेल्या … Read more