काँग्रेसमध्ये सर्वात मोठा भूकंप होणार, एक बडा नेता भाजपात जाणार; प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्फोट

Karad News 20240502 091649 0000

कराड प्रतिनिधी | स्वतःला विरोधी पक्ष म्हणवणारा काँग्रेस संघटनात्मक पातळीवर क्षीण होत चालल्याने हा पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अंगावर घेऊ शकत नाही अशी टीका करताना, आता तर सातारा जिल्ह्यातील एक बडे प्रस्थ भाजपच्या वाटेवर असून, त्यांना राज्यपालपद कधी मिळणार हे केवळ बाकी असल्याचा गौप्यस्फोट वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी काल केला. … Read more

कराड उत्तर भाजपाची किरोली वाठार ते चाफळपर्यंत बाईक रॅली, घरोघरी पोहचवला मोदींचा नमस्कार!

Karad News 20240501 192806 0000

कराड प्रतिनिधी | महायुतीचे उमेदवार खा. उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ कराडमध्ये झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपला नमस्कार घरोघरी सांगा, असं आवाहन भाजप कार्यकर्त्यांना केलं होतं. त्यानुसार कराड उत्तरमध्ये भाजपचे प्रदेश सचिव ॲड. भरत पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाठार किरोली ते चाफळ दरम्यान कार्यकर्त्यांनी ‘नमस्कार बाईक रॅली’ काढली. मोटरसायकल रॅलीत ॲड. महादेव साळुंखे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष … Read more

कराड बार असोसिएशन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ॲड. एम. टी. देसाई यांचा भरघोस मतांनी विजय

20240430 201332 0000

कराड प्रतिनिधी | कराड बार असोसिएशनच्या वार्षिक निवडणुकीत ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. एम. टी. देसाई हे अध्यक्षपदी भरघोस मतांनी निवडून आले. दरम्यान, उपाध्यक्ष, सचिव आणि खजिनदार या पदांची निवडणूक बिनविरोध झाली होती. त्यामुळे मंगळवारी अध्यक्षपदासाठी मतदान झाले. दुपारी मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाला. कराड बार असोसिएशनच्या वार्षिक निवडणुकीत अध्यक्षपदासाठी ॲड. एम. टी. देसाई आणि ॲड. पी. … Read more

इंडिया आघाडी अन् काँग्रेस सत्तेत आल्यास संविधान बदलतील; नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

Narendra Modi News 20240429 190218 0000

कराड प्रतिनिधी | कराड येथे सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खा. उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा पार पडली. यावेळी त्यांनी काँग्रेससह इतर इंडिया आघाडीवर हल्लाबोल केला. “सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोधक समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातून समाजात फूट पाडत आहेत. इंडिया आघाडी आणि काँग्रेस तिसऱ्यांदा सत्तेत आले तर संविधान … Read more

Narendra Modi : कराडातील महाविराट सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल; हात जोडत केला नमस्कार

Karad News 20240429 164440 0000

कराड प्रतिनिधी | सातारा लोकसभा निवडणूक 2024 (Satara Lok Sabha Election 2024) मधील सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची कराड येथे आज सोमवार, दि. 29 विराट महाविजय सभा होत आहे. या सभेसाठी पंतप्रधान मोदी थोड्यावेळापूर्वीच दाखल झाले. यावेळी या ठिकाणी त्यांचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत … Read more

कराडात नरेंद्र मोदी तर वाईत शरद पवारांची सभा; कोणाची सभा गाजणार?

Karad News 20240429 142344 0000

कराड प्रतिनिधी | सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आणि भाजप पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे भाजपने सातारा लोकसभा मतदारसंघ आपल्याकडे घेत राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांना उमेदवारी दिलेली आहे. उदयनराजे भोसले आणि सांगलीचे उमेदवार … Read more

आर्थिक स्थिरतेशिवाय सामाजिक सबलीकरण अशक्य आहे : लक्ष्मण माने

Satara News 20240429 123151 0000

सातारा प्रतिनिधी | जकातवाडी, ता. सातारा येथे शारदाश्रम, जकातवाडी येथे महिलांना शिलाईकाम व त्यासंदर्भातील इतर उद्योगांचे प्रशिक्षण व रोजगार निर्मिती केंद्राचे उद्घाटन पार पडले. यावेळी आर्थिक स्थिरतेशिवय सामाजिक सबलीकरण शक्य नाही, कुटुंबाला सुदृढ करण्यासाठी घरातील स्त्रियांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभ राहील पाहिजे व त्यासाठी कुटुंबाचा आर्थिक कणा मजबूत होणे गरजेचे आहे. जर कुटुंब सक्षम … Read more

महाराष्ट्रात पक्ष फोडून सरकार पाडायला पंतप्रधान नरेंद्र मोदींचाच राजाश्रय, पृथ्वीराज चव्हाणांचा थेट हल्लाबोल

Prithviraj Chavan News 20240429 080528 0000

कराड प्रतिनिधी | महाराष्ट्रातील सरकार पाडायला आणि पक्ष फोडायला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा स्पष्ट आशिर्वाद होता. मोदींच्या संमतीनेच सगळं झालेलं आहे. त्यांनी लॉजिस्टिकल मदत पुरवली असल्याचा खळबळजनक दावा माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. तसेच हा राजनैतिक भ्रष्टाचार असल्याचा आरोपही त्यांनी केला. सरकार पाडण्यात राजनैतिक भ्रष्टाचार भ्रष्टाचार हा दोन प्रकारचा आहे. … Read more

नरेंद्र मोदींच्या सभेमुळे कराडला उद्या वाहतुकीत बदल; ‘अशी’ असणार वाहतूक

20240428 105704 0000

कराड प्रतिनिधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सैदापूर (ता. कराड) येथील सभेच्या अनुषंगाने कराड शहरातील अंतर्गत वाहतुकीत बदल करुन वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी दि. २९ एप्रिल रोजी मध्यरात्रीचे एक वाजल्यापासून सभा संपेपर्यंत पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी अधिसूचना पारित केली आहे. या अधिसूचनेद्वारे वाहनांच्या वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. सोमवारी दि. २९ एप्रिल रोजी … Read more

शशिकांत शिंदेंना अटक झाली तर…; पाटणच्या भर सभेत शरद पवारांचं मोठं विधान

Patan News 20240427 184155 0000 jpg

पाटण प्रतिनिधी । नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील शौचालय घोटाळा प्रकरणी सातारा लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्यावर गंभीर आरोप विरोधकांनी केलेत. याप्रकरणी फळ मार्केटचे माजी संचालक संजय पानसरे यांना अटक करण्यात आली असून शशिकांत शिंदे यांनाही अटक होईल कि काय अशी चर्चा जिल्ह्यात सुरु असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad … Read more

छत्रपती उदयनराजेंचा ‘संकल्पनामा’ पाहिला का?; मतदारांना केलं थेट ‘हे’ आवाहन

Satara News 20240427 160759 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) पायाला भिंगरी लावून संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत आहेत. आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. उदयनराजे भोसले यांचा २०१९ च्या पोटनिवडणुकीत पराभव झाला होता. आता पुन्हा एकदा त्यांच्या समोर शरद पवार गटाचे आव्हान आहे. शशिकांत शिंदे यांच्याशी त्यांचा थेट सामना होणार आहे. कोणत्याही परिस्थितीत यंदा … Read more

निवडणूक पारदर्शक व निर्भयपणे पाडण्यावर प्रशासनाचा भर : जितेंद्र डुडी

Jitendra Dudi News 20240426 184239 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | 45 सातारा लोकसभा मतदार संघात निवडणूक पारदर्शक व निर्भयपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाचा भर असून आचारसंहितेचा कोणी भंग किंवा प्रलोभन देत असल्यास त्याची तक्रार नागरिकांनी 1950 या क्रमांकावर किंवा सी व्हीजल ॲपवर तात्काळ तक्रार करावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. या … Read more