काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन

Satara News 20240519 121218 0000

सातारा प्रतिनिधी | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे वयाच्या नव्वदाव्या वर्षी वृद्धापकाळाने भुईंज येथील निवासस्थानी आज पहाटे निधन झाले. भुईंज गावचे सरपंच म्हणून राजकीय कारकिर्दीला प्रारंभ करणाऱ्या प्रतापराव भोसले यांनी ४ वेळा आमदार म्हणून वाई खंडाळा विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करताना कॅबिनेट मंत्री म्हणून यशस्वी काम केले. ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या निधनाने रिक्त … Read more

रखरखत्या उन्हात ‘त्यांनी’ काढला हक्काच्या घरकुलासाठी कराडच्या तहसील कार्यालयावर मोर्चा

Karad News 4

कराड प्रतिनिधी । सन २०१८ पासून कराड तालुक्यातील सर्व गावातील प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेतील प्रतिक्षा यादीत असलेल्या सर्व वंचित कुटुंबाना घरकुल मिळनेबाबत तसेच घरकुलाच्या अनुदान मागणीसाठी आज घरकुल संघर्ष समितीच्या वतीने कराडच्या तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी रखरखत्या उन्हात कराड तालुक्यातील नागरिक, महिलांनी आक्रोश व्यक्त करत प्रशासनाकडे घरकुलाचा प्रश्न मार्गी लावण्याची निवेदनाद्वारे मागणी … Read more

माझ्या प्रमुख कार्यकर्त्यांवर ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न; शशिकांत शिंदेंचा थेट आरोप

Satara News 2024 05 13T124534.331

सातारा प्रतिनिधी । सातारा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावर महायुतीतील भाजप नेत्यांकडून गंभीर आरोप करण्यात आले. त्यांच्या आरोपांना शिंदेनी प्रत्युत्तर देखील दिले. आता प्रत्यक मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आमदार शशिकांत शिंदे यांनी एक गंभीर आरोप करत थेट तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. “लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पराभवाच्या भीतीने किंवा विरोधात मतदान … Read more

पंकजा मुंडेंसाठी उदयनराजे उतरले मैदानात; साताऱ्यातून विशेष हेलिकॉप्टरने बीडकडे रवाना

Udayanraje Bhosale News 20240511 150840 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी संपल्यानंतर तसेच मतदान झाले आहे. त्यानंतर खासदार उदयनराजे भोसले आज शनिवारी बीड येथे पंकजा मुंडेंसाठी आयोजित केलेल्या सभेसाठी साताऱ्यातून विशेष हेलिकॉप्टरने रवाना झाले आहेत. सातारा लोकसभेसाठी 7 मे रोजी मतदान झाले. आता तब्बल 24 दिवस निकालाची प्रतीक्षा आहे. मतदानानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी दोन, चार दिवस विश्रांती घेतली. … Read more

महाविकास आघाडीला राज्यात किती जागा मिळतील? शरद पवारांनी थेट आकडाच सांगितला!

Sharad Pawar News 20240509 182358 0000

सातारा प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीचं तिसऱ्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर आता निकालाचे अंदाज आणि आकडेमोड सुरू झाली आहे. अशातच खासदार शरद पवार यांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठं यश मिळेल, असं म्हटल आहे. आम्हा सर्वांना मिळून ३० ते ३५ जागा मिळतील, असा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे. लोकांना बदल हवा आहे मागील लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांचे सहा उमेदवार … Read more

शरद पवार आज अचानक सातारा दौऱ्यावर; नेमकं कारण काय?

Sharad Pawar News 20240509 073715 0000

सातारा प्रतिनिधी | राज्यात तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा मतदार संघातील निवडणुकीसाठी नुकतेच मतदान पार पडले आहे. निवडणुकीची रणधुमाळी निर्णायक टप्प्यावर असूनही आणि त्यातही सातारचे मतदान पार पडल्याने विजयाचा गुलाल कुणावर पडणार? याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे आज अचानक सातारा दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याकडे व … Read more

साताऱ्यातील कोरेगावसह कराड दक्षिण आणि उत्तरेत मतदानाचा टक्का वाढला, फायदा कुणाचा?

Satara News 20240508 160653 0000

सातारा प्रतिनिधी | संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या साताऱ्यात मंगळवारी (७ मे) हाय व्होल्टेज लढत झाली. मतदानात कोरेगाव विधानसभा मतदार संघात सर्वाधिक ६७.५१ टक्के मतदान झालं, तर कराड दक्षिणमध्ये ६५.६८ आणि कराड उत्तरमध्ये ६५.३३ टक्के मतदान झालंय. हा वाढलेला टक्का निकालात कोणाला फायद्याचा ठरणार, याचे आडाखे आता बांधले जात आहेत. सातारा लोकसभा मतदार संघात १८ … Read more

भर दुपारी ‘या’ कारणामुळे तासभर मतदान होतं बंद, ताटकळून मतदार गेले घरी

Karad News 20240508 090046 0000

कराड प्रतिनिधी | मतदान यंत्रात बिघाड होवून मतदान प्रक्रिया थांबल्याच्या घटना यापूर्वी अनेकदा पाहिल्या आणि ऐकल्या असतील. परंतु, लोकसभा निवडणुकीत एका वेगळ्याच कारणाने तासभर मतदान प्रक्रिया थांबल्याने अनेक मतदारांना भर l दुपारी ताटकळावे लागले. ताटकळून काही मतदार मतदान न करताच घरी गेले. काल मंगळवारी दुपारी १ ते २ च्या सुमारास पाटण विधानसभा मतदार संघात येणाऱ्या … Read more

जिल्ह्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 54.1 टक्के मतदान, पारा कमी होताच वाढल्या मतदारांच्या रांगा

Satara News 20240507 180957 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी सकाळी सात पासून मतदान प्रक्रियेस सुरूवात झाली. सकाळच्या वेळी जिल्ह्यात राजकीय मंडळींनी व काही ठिकाणी मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावला तर काही ठिकाणी उन्हामुळे निरुत्साह दिसून आला. दुपारी तीन वाजेपर्यंत सातारा लोकसभा मतदारसंघासाठी सायंकाळीं पाच वाजेपर्यंत 54.1 टक्के मतदानाची नोंद झाली. कराड तालुक्यात मतदानासाठी महिलांमध्ये चांगला उत्साह वाढलेला … Read more

पत्नी सत्वशिला समवेत मतदान केल्यानंतर पृथ्वीराजबाबांनी व्यक्त केला ‘हा’ विश्वास

Karad News 20240507 130234 0000

कराड प्रतिनिधी | सातारा लोकसभा निवडणूक 2024 साठी सातारा जिल्ह्यात आज मंगळवारी दि. ७ रोजी रखरखत्या उन्हात चुरशीने मतदान होत आहे. या दरम्यान, आज दुपारी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड येथील नगरपालिका शाळेत पत्नी सत्वशिलासमवेत मतदान केले. जनता इंडिया आघाडीला साथ देऊन आणि देशात सत्तांतर होईल याची मला खात्री आहे, असा विश्वास माजी … Read more

श्रीनिवास पाटीलांनीही सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क;जनतेला केलं ‘हे’ आवाहन

Karad News 20240507 120625 0000

कराड प्रतिनिधी | सातारा लोकसभा मतदारसंघातही आज मतदान पार पडत आहे. खासदार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी कुटुंबीयांसमवेत आपला मतदानाचा हक्क बजावला. लोकशाही बळकट करण्यासाठी नागरिकांनी मतदान करावे. सामान्य जनतेचे प्रश्न सोडवणारा माणूस दिल्लीला पाठवावा,” असे आवाहन खा. श्रीनिवास पाटील यांनी केले. यावेळी पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. … Read more

महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदेंनी कुटुंबीयासमवेत बजावला मतदानाचा हक्क

Satara News 20240507 105508 0000

सातारा प्रतिनिधी | महाविकास आघाडीचे (शरद पवार गट) उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांनी कोरेगाव तालुक्यातील ल्हासुर्णे येथील मतदान केंद्रात मतदान केलं. पत्नी वैशाली, मुले तेजस आणि साहिल शिंदे यांच्या समवेत त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. तत्पूर्वी त्यांनी देवदर्शन घेतलं. पत्नी वैशाली यांनी त्यांचं औक्षण केलं. त्यानंतर कुटुंबासोबत त्यांनी मतदान केलं. मी लोकशाहीच्या मंदिरात जावून मतदान केलं … Read more