सातारा लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून मनाई आदेश जारी

Satara News 9

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया उद्या मंगळवार, दि. ४ रोजी पार पडणार आहे. त्या अनुषंगाने विविध पक्ष, संघटनांचे कार्यकर्ते पदाधिकारी, नागरीक यांना जिल्हादंडाधिकाऱ्यांच्या वतीने मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यांचे नागरिकांनी तंतोतंत पालन न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. या आदेशामध्ये सातारा जिल्ह्यात … Read more

सातारा, सांगली, नागपूरचे ‘मविआ’चे अनेक नेते भाजपात जाणार या अनिल पाटलांच्या दाव्यावर जयंत पाटलांनी दिलं ‘हे’ उत्तर

Satara News 8

सातारा प्रतिनिधी । लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर आता उद्या प्रत्यक्ष मतमोजणी केली जाणार आहे. संपूर्ण जगाचं या निवडणुकीकडे लक्ष लागलं असताना दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर सातारा, सांगली, नागपूरसह मराठवाड्यातील महाविकास आघाडीचे अनेक नेते भाजपात जाणार आहेत, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटातील नेते अनिल पाटील यांनी केला आहे. अनिल पाटील यांच्या या दाव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस … Read more

सातारा लोकसभा निवडणूकीची मतमोजणी अशा प्रकारे केली जाणार; जिल्हाधिकाऱ्यांची महत्वाची माहिती

Satara News 7

सातारा प्रतिनिधी । सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने ४५ सातारा लोकसभा मतदार संघातील (Satara Lok Sabha Election) सर्व विधानसभा मतदार संघाची मतमोजणी प्रक्रिया दि. ४ जून रोजी सकाळी 8 वाजल्यापासून सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी पत्रकार परिषद घेत महत्वाची माहिती दिली. सकाळी आठ वाजल्यापासून जिल्हा मार्केटिंग फेडरेशन गोडाऊन एम.आय.डी.सी. … Read more

लोकसभा मतमोजणी प्रक्रियेसाठी सातारा जिल्हा प्रशासनाचा कडक बंदोबस्त !

Satara News 20240603 091808 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी ४ जून या दिवशी वखार महामंडळाच्या कोठारामध्ये (गोडाऊनमध्ये) होणार आहे. या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाने त्रिस्तरीय बंदोबस्त ठेवला आहे. या परिसरामध्ये ६१ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून त्यापैकी ४३ कॅमेरे मतदान यंत्रे ठेवलेल्या खोल्यांवर, तर उर्वरित १८ कॅमेरे आजूबाजूच्या परिसरावर लक्ष ठेवणार आहेत. जिल्हा प्रशासनाकडून महसूल विभागाच्या कर्मचार्‍यांद्वारे मतमोजणी … Read more

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला राज्यात ‘इतक्या’ जागा मिळणार; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे मोठे विधान

Karad News 5

कराड प्रतिनिधी । लोकसभा निवडणुकीच्या सात टप्प्यांतील मतदान पूर्ण झाले असून आता दि. 4 जून रोजी थेट निकाल जाहीर केला जाणार आहे. या निकालानंतर देशात कोणाचे सरकार येणार, हे स्पष्ट होईल. आज कराड येथे काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत जिंकणाऱ्या जागांबाबत अंदाज व्यक्त केला आहे. 2014 मध्ये … Read more

घंटागाडी चालकांचे साताऱ्यातील हुतात्मा स्मारक परिसरात काम बंद आंदोलन

Satara News 20240602 092942 0000

सातारा प्रतिनिधी | किमान वेतन कायद्याप्रमाणे पगाराची मागणी करणार्‍या तीन घंटागाडी चालकांना संबंधित ठेकेदाराने कामावरून अचानक कमी केल्याने, संतप्त घंटागाडी चालकांनी हुतात्मा स्मारक परिसरात शनिवारी काम बंद आंदोलन केले. त्यामुळे सकाळच्या सत्रात एकही गाडी बाहेर न पडल्याने शहराच्या काही भागात कचरा संकलन होऊ शकले नाही. सातारा पालिकेने कचरा संकलनाचा ठेका स्वातंत्र्यवीर सावरकर मजूर सेवा संस्थेला … Read more

साताऱ्यात नगरपालिकेची होर्डिंग्ज जप्तीची कारवाई जोमात

Satara News 4

सातारा प्रतिनिधी । मुंबईतील घाटकोपर दुर्घटनेनंतर राज्यातील सर्वच महानगर पालिका, नगरपालिकांनी शहरात अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाईचा बडगा उगारला आहे. यामध्ये सातारा पालिकेनेही सहभागी होत साताऱ्यात अनधिकृत होर्डिंग्जधारकांना नोटिसा दिल्या. तर 8 दिवसात १५ होर्डिंग्ज जप्तीची कारवाई केली आहे. पालिकेच्या या कारवाईबाबत नागरीकातून समाधान व्यक्त केले जात आहे. सातारा पालिकेच्यावतीने केल्या जात असलेल्या कारवाईमुळे सातारा शहराला लागलेले … Read more

लोकसभेला महाराष्ट्रात महाविकास आघाडी किती जागा जिंकणार?; साताऱ्यात शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Satara News 3

सातारा अप्रतिनिधी । देशभरातील लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) मतदान प्रक्रिया संपल्यानंतर आता सर्वांना निकालाची प्रतीक्षा आहे. दि. 4 जून रोजी निकालाचे चित्र स्पष्ट होईल. त्यातच अनेक राजकीय नेते विजयाचे दावे करताना दिसत आहेत. असाच दावा शरदचंद्र पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी केला आहे. “देशात झालेल्या लोकसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी जनतेने निवडणूक हाती … Read more

पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचे सर्व आमदार करणार दुष्काळ पाहणी दौरा; कराडात समितीची उद्या बैठक

Karad News 1

कराड प्रतिनिधी । वाढत्या दुष्काळाची दाहकता लक्षात घेता प्रदेश काँग्रेस कमिटीने विभागवार “दुष्काळ पाहणी समिती” गठीत केली आहे. पश्चिम महाराष्ट्र विभागाच्या समिती प्रमुख पदी माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांना जबाबदारी दिली आहे. या समितीची नियोजन मिटिंग उद्या दि. 2 जून 2024 रोजी दुपारी 12 वाजता शासकीय विश्रामगृह, कराड येथे आयोजित केली आहे. या बैठकीस समितीमधील … Read more

साताऱ्यात लोकसभा मतमोजणी दिवशी वाहतुकीत बदल

Satara News 1

सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभा मतदारसंघ निवडणुकीची मतमोजणी दि. ४ जून रोजी सातारा आैद्योगिक वसाहतीतील डीएमओ गोदामात होणार आहे. यामुळे नागरिकांची गर्दी होणार असल्याने गोदाम परिसरात वाहतूक व्यवस्थेत पोलिसांकडून बदल करण्यात आलेला आहे. याबाबत पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी आदेश काढला आहे. हा आदेश दि. ३ जून रोजीच्या रात्री ११ वाजून ५५ मिनिटांपासून लागू होणार … Read more

सातारा लोकसभेसाठी ‘इतक्या’ फेऱ्यातून होणार मतमोजणी; प्रशासनाकडून तयारी पूर्ण

Satara News 20240531 213711 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ७ मे रोजी मतदान पार पडले. या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासह १६ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. लोकसभा मतदारसंघ निवडणुकीची मतमोजणी ४ जून रोजी होत असून एकूण २३ फेऱ्या होणार आहेत. सायंकाळी सहा ते सातपर्यंत निकाल घोषित होईल यासाठीही प्रशासनाकडून तयारी केली जात आहे, तसेच … Read more

ललित पाटील अन् अग्रवाल प्रकरणात मोठी डील; सरकारमधील प्रमुख मंत्र्याचा हात; आ. शशिकांत शिंदेंचा गौप्यस्फोट

Satara News 8 2

सातारा प्रतिनिधी । पुणे येथील कल्याणीनगरमध्ये अपघातानंतर तेथील ससून हॉस्पिटलमधील घडलेल्या प्रकारावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सातारा लोकसभेचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनीसरकारवर निशाणा साधला आहे. “ससून रुग्णालयात सक्तीच्या रजेवर असलेले डॉक्टर ट्रीटमेंट करतात, रक्ताचे नमुने तपासतो, याबाबतची चौकशी समितीची नेमणूक हा केवळ फार्स असून यापूर्वी घडलेले ललित पाटील प्रकरण आणि आत्ताच्या अग्रवाल प्रकरणात फार … Read more