कराड बाजार समितीतील संरक्षक भिंतीच्या वादावरून बाजार समिती सभापती-मुख्याधिकारी भिडले

Karad Market Commitee News jpg

कराड प्रतिनिधी । कराड बाजार समिती सभापती, संचालक मंडळ आणि कराड पालिका मुख्याधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये शुक्रवारी चांगलीच जुंपली. विषय होता बाजार समितीतील संरक्षण भिंत पाडण्याचा. या विषयावरून दोन्ही संस्थेतील लोकप्रतिनिधी, अधिकारी आमनेसामने आले. भिंत पाडण्यास सुरुवात करणार इतक्यात सभापतींसह संचालक मंडळ, व्यापारी दाखल झाले. अगोदर जिल्हाधिकाऱ्यांकडून भींत पाडण्याचा व रस्त्याबाबतचा आदेश दाखवा आणि मगच भींत … Read more

साताऱ्यातील ‘या’ महत्वाच्या प्रश्नावरून शिवेंद्रराजेंनी थेट दिलं उदयनराजेंना आव्हान; म्हणाले की…

Shivendraraje Bhosale Udayanraje Bhosale News

सातारा प्रतिनिधी । सातारा शहरात सध्या एका महत्वाच्या विषयावरून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शहरातील घरपट्टीबाबत सध्या मोठा नागरिकांमध्ये गोंधळ सुरू असून, नागरिकांवर अन्याय केला जात आहे. या प्रश्नावरून आता भाजप खासदार शिवेंद्रराजे भोसले यांनी थेट खासदार उदयनराजे भोसले यांना आव्हान दिले आहे. “ज्यांनी पाच वर्षे सत्ता भोगली ती मंडळी आज कुठे गायब … Read more

जरांगे-पाटलांच्या सभेला फलटणमधून जाणार 50 ट्रक, 100 बसेस, 200 कारचा ताफा…

Manoj Jarange Patil News jpg

सातारा प्रतिनिधी । जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटीत उद्या शनिवारी दि. 14 होणार्‍या मनोज जरांगे-पाटील यांच्या सभेला सातारा जिल्ह्यातून मराठा बांधव मोठ्या संख्येने हजेरी लावणार आहेत. एकट्या फलटण तालुक्यातून 50 ट्रक-टेम्पो, 100 बसेस, 200 कार आणि 300 दुचाकी असा ताफा घेऊन 5 हजार तरूण सभेला जाणार असल्याची माहिती फलटण मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी दिली आहे. मराठा … Read more

सातारा जिल्ह्यातील 175 ग्रामसेवकांना तडकाफडकी नोटीसा; नेमकं कारण काय?

Satara ZP News 20230914 173000 0000 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील तब्बल 175 ग्रामपंचायतींमधील ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकार्‍यांना जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागामार्फत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. संबंधित ग्रामसेवकांनी फेरआकारणीची प्रक्रिया विहीत कालावधीत पूर्ण केली नसल्याने तरतुदीचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले आहे. आठ दिवसात खुलासा करण्याचे आदेश नोटीसद्वारे देण्यात आले आहेत. सातारा जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींनी दर चार वर्षांनी कराची फेरआकारणी करणे बंधनकारक … Read more

सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला!

Gram Panchayat Elections News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या निवडणूक आणि पोट निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. जिल्ह्यातील 133 ग्रामपंचायती आणि 172 ग्रामपंचायतीचा पोटनिवडणुक कार्यक्रम जाहीर निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (महसूल) प्रशांत आवटे यांनी आज जाहीर केला. जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी तसेच रिक्त जागांच्या पोट निवडणुकांसाठी पारंपारिक … Read more

कराड बाजार समितीच्या ‘त्या’ रस्त्याच्या प्रश्नी त्रिशंकू भागातील रहिवाशी आक्रमक; पालिकेवर काढला थेट धडक मोर्चा

Karad News jpg

कराड प्रतिनिधी । कराड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील त्रिशंकू भागात असलेली संरक्षक भिंती पाडून रस्ता खुला करून द्यावा असे आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून कराड नगरपालिकेस काही दिवसापूर्वी आदेश दिले होते. पालिकेकडून देखील सुरुवातीला थोडी भिंत पाडत कारवाई करण्यात आली. मात्र, नंतर पालिकेकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे लक्षात आल्यानंतर त्रिशंकू भागातील रहिवाशांनी आज आक्रमक पावित्रा घेत … Read more

पाचगणी येथील टेबललँन्ड पठारावर अतिक्रमण हटवले

Pachagani News 20231010 111456 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | पाचगणी गिरीस्थान पालिकेने अनधिकृत बांधकामांवर कडक कारवाईची धडक मोहीम सुरू केली आहे. आज सोमवारी टेबललॅंन्ड पठारावरील अनधिकृत पत्र्याचे स्टाॅल पालिकेच्या अतिक्रमण विभागाने दुपारी जेसीबीच्या साहाय्याने काढून टाकले. यामुळे येथील व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली. ही मोहीम अचानक राबवल्यांने काही काळ तणावाचे वातावरण झाले होते. दरम्यान, काल सकाळी पांचगणी गिरिस्थान पालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक मुख्याधिकारी … Read more

आ. बाळासाहेब पाटील यांच्या निकटवर्तीय उपसरपंचाविरोधात अविश्वास ठराव दाखल

Balasaheb Patil News 2 jpg

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील हजारमाचीचे उपसरपंच तथा आमदार बाळासाहेब पाटील यांचे निकटवर्तीय असलेल्या प्रशांत यादव यांच्याविरोधात तहसिलदार विजय पवार यांच्याकडे अविश्वास दर्शक ठराव दाखल करण्यात आला आहे. सरपंचांसह 14 सदस्यांनी उपसरपंचांवर अविश्वास दर्शक ठराव आणला आहे. हा आमदार बाळासाहेब पाटील यांच्यासाठी धक्का असल्याचे मानले जात आहे. हजारमाची ग्रामपंचायतीच्या 17 पैकी 14 सदस्यांनी नुकतीच कराडचे … Read more

पाटण तालुक्यातील 26 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर

Gram Panchayat Elections News jpg

पाटण प्रतिनिधी । राजकीयदृष्टया स्थानिक पातळीवर महत्वाच्या असलेल्या पाटण तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रमी निवडणूक अधिकाऱ्यांनी नुकताच जाहीर केला आहे. त्यानुसार जानेवारी ते डिसेंबर २०२३ या कालावधीत मुदत संपलेल्या पाटण तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होणार असून, थेट सरपंच पदासह सदस्य पदांसाठी पंचवार्षिक आणि २४ ग्रामपंचायतींमधील सदस्य व सरपंच या रिक्त पदांसाठी पोट निवडणुका होत आहेत. … Read more

साताऱ्यातील 14 कोटी 65 लाखांच्या विकास कामांना प्रशासकीय मंजूरी : खा. उदयनराजे भोसले

Satara News 1 1 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा नगरपरिषदेसाठी शासनाकडून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करुन सातारा शहराचा समतोल सर्वंकष विकास साधत विविधांगी सेवा-सुविधा सातारकरांना पुरवण्यावर सातारा विकास आघाडीचा भर राहीला आहे. त्यानुसार जिल्हा नियोजन समितीमधुन एकूण 19 अशा सुमारे 14 कोटी 65 लाख रुपयांच्या विकास कामांना प्रशासकीय मंजूरी मिळाली असल्याची माहिती खा. उदयनराजे भोसले यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे. . … Read more

छत्रपती शिवाजी महाराज सोडले तर कोणत्या राजाने वाघनखांनी कोथळा काढलाय? : आ. शिवेंद्रराजे भोसले

Shivendraraje Bhosale News jpg

सातारा प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनख्यांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला याची इतिहासात नोंद आहे. त्यांच्या व्यतिरिक्त अन्य कुठल्याच राजाची अशी नोंद कुठेही आढळून येत नाही. याचाही कुठेतरी विचार करायला हवा. जो काही चुकीचा इतिहास पसरवला जातोय तो थांबविण्यासाठी श्री रामदासस्वामी संस्थान व आपल्या सर्वांच्या माध्यमातून प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा भाजप आमदार शिवेंद्रराजे यांनी व्यक्त … Read more

“मी पवारांचा चमचा नाही, माझ्या नादाला लागू नका”; आ. जयकुमार गोरेंचा नेमका कुणाला इशारा?

Jaykumar Gore News 20231008 110720 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | मी तालुक्‍यात आलो तेव्हाही चांगली गाडी घेऊनच आलो होतो. माझे जे काही आहे ते व्यवसायातून आणि खुल्या किताबाप्रमाणे आहे. मी प्रांत, कलेक्‍टर, आयुक्त, सचिव आणि पवारांचा चमचा नाही. पवारांनी माझी पाच वेळा चौकशी लावली होती. मात्र, ज्या दिवशी तुमची चौकशी लावू त्यादिवशी तुमची जागा कुठे असेल याचा विचार करा. जयकुमारला डिवचू नका. … Read more