कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात कंत्राटी सुरक्षा रक्षकांना मिळेना पगार; 6 महिन्यांपासून वेतनाच्या प्रतीक्षेत

Karad News 7 jpg

कराड प्रतिनिधी । राज्यात कंत्राटी भरतीच्या जीआरवरून चांगलच राजकारण तापले आहे. अशात आता कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात सध्या कंत्राटी स्वरूपात कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांवर एन दिवाळीत शिमगा करण्याची वेळ आली आहे. कारण येथील कार्यरत असलेल्या सांगली सुरक्षा रक्षक मंडळातील सुरक्षा रक्षक अजित पाटील यांच्यासह सात सुरक्षा रक्षकांना गेल्या सहा महिन्यापासून पगारच मिळालेला नाही. … Read more

Satara News : मराठा आरक्षण कुणाच्या काळात अन् कुणामुळे मिळणार?; राजेश क्षीरसागर यांचे मोठे विधान

Satara News 7 1 jpg

सातारा प्रतिनिधी । राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मागणीचा आणि त्यासाठी जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेल्या इशाऱ्याचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. सध्याच्या राज्य सरकारकडून मराठा समाजबांधवांना आरक्षण दिले जावे, अशी सर्वत्र मागणी होत असता सातारा येथे आज राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर मराठा आरक्षण कुणामुळे आणि कुणाच्या काळात मिळणार याबाबत एक मोठे विधान केले … Read more

‘आता तुमच्या पापाचा घडा भरलाय…’; आमदार शशिकांत शिंदेंचा BJP ला थेट इशारा

Shashikant Shinde News jpg

सातारा प्रतिनिधी । भाजपच्यावतीने महाविकास आघाडीच्या निषेधार्थ नुकतेच आंदोलन करण्यात आले. या आंदोलनावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. कंत्राटी भरती रद्द केल्यानंतर भाजपकडून महाविकास आघाडीच्या विरोधात झालेले आजचे आंदोलन म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. मागील अधिवेशनात कंत्राटी भरतीचे बिल तुम्हीच मंजूर केले होते, आता का बदलत आहात. हे तुमचे पाप … Read more

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराबाबांच्या उपस्थितीत जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत झाला ‘हा’ महत्वाचा निर्णय; आता प्रत्येक तालुक्यात…

Satara News 20231022 125248 0000 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात काँग्रेस पक्ष अधिक बळकट करण्यासाठी लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या दृष्टीने सातारा जिल्हा काँग्रेसच्या नुकत्याच पार पडलेल्या महत्वपूर्ण बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात आला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत बूथ, मंडळ आणि ग्राम समिती स्थापन करण्यासाठी सर्व तालुक्यांना विशेष प्रभारी (निरीक्षक) नियुक्त करण्यात आले … Read more

पुण्यात पार पडली केंद्रीय कृषी खर्च किम्मत आयोगाची बैठक; ‘या’ महत्वाच्या मागण्यांवर झाली चर्चा!

Karad News 6 jpg

कराड प्रतिनिधी । पुढील वर्षीच्या ऊस दर किमतीचे धोरण ठरवण्याबाबत पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयात केंद्रीय कृषी खर्च, किंमत आयोगचे अध्यक्ष विजय शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील प्रगतशील शेतकरी व ऊस नियंत्रण मंडळाचे सदस्य यांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत सन 2024 – 25 सालासाठी उसाची किंमत किती असावी? ऊस शेतीला येणारा खर्च किती आहे? … Read more

पालकमंत्री शंभूराजेंच्या घरासमोर दाम्पत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न, साताऱ्यात खळबळ

Satara News 3 jpg

सातारा प्रतिनिधी । गुटखा व्‍यावसायिकाने धमकी देऊन दोन लाखांची खंडणी मागितल्‍याची तक्रार करुनही कारवाई होत नसल्‍याने आज दुपारी सदर बझारमधील लक्ष्‍मी प्रकाश डागा, प्रकाश डागा यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्‍या पोवई नाक्यावरील निवासस्‍थानासमोर आत्‍मदहनाचा प्रयत्‍न केला. पोलिसांनी त्‍या दोघांना ताब्‍यात घेतले आहे. सातारा शहरातील सदर बझारमध्‍ये लक्ष्‍मी डागा या आपले पती प्रकाश डागा व कुटुंबियासोबत … Read more

इंदोलीतील कै. रामराव निकम शिक्षण शास्त्र महाविद्यालयात ‘संविधान बचाव कार्यशाळा’ उत्साहात

Karad News 5 jpg

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील इंदोली येथील कै. रामराव निकम बी.एड. महाविद्यालयातील व्दितीय वर्ष ‘यशवंत गट’ कराड गटाच्या छात्राध्यापकांच्यावतीने नुकतेच संविधान बचाव कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी कापील गोळेश्वर येथील जवाहर विद्यामंदिर विद्यालयात कार्यशाळेचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पाडला. यावेळी कै.रामराव निकम शिक्षण शास्त्र बी. एड कॉलेज इंदोलीचे प्राचार्य. एस. ए. पाटील आणि नृसिंह शिक्षण संस्थेचे … Read more

Satara News : कोल्हापूरसारखाच साताऱ्यातही साजरा होणार उदयनराजेंचा शाही दसरा

Udayanraje Bhosale News 2 jpg

सातारा प्रतिनिधी । दरवर्षी मराठमोळा सण दसरा हा सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र,कोल्हापूरचा शाही दसऱ्याचा थाट काही वेगळाच असतो. असाच शाही दसऱ्याचा थाट यंदा सातारकरांना पहायला मिळणार आहे. कोल्हापूरच्या दसरा उत्सवाच्या धर्तीवर साताऱ्यातही शाही दसरा उत्सव साजरा होणार आहे. या उत्सवात शासनाचाही सहभाग असणार आहे. हा उत्सव मोठ्या दिमाखात साजरा होण्यासाठी सर्व विभाग … Read more

ललित पाटील प्रकरणी सुषमा अंधारेंनी वक्तव्य मागे घ्यावे, अन्यथा कायदेशीर कारवाई करणार; देसाईंचा इशारा

Shambhuraj Desai News 20231019 093230 0000 jpg

कराड प्रतिनिधी | ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणाशी माझा तीळ मात्र संबंध नाही. माझा कोणताही संबंध आढळल्यास आपण राजकारण सोडू, असा खुलासा उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केला आहे. सुषमा अंधारेंनी माझ्याबद्दल केलेले वक्तव्य चोवीस तासात मागे घ्यावे, अन्यथा कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशाराही देसाईंनी दिला आहे. ललित पाटील प्रकरणाचा तपास करायला हवा. या … Read more

आजचे राजकर्ते नालायक आणि टाकाऊ स्वरूपाचे…; शेतकरी नेते रघुनाथदादांचा हल्लाबोल

Raghunathdada Patil News jpg

कराड प्रतिनिधी । शेतकरी संघटनेच्यावतीने कराड उत्तर तालुकाध्यक्ष वसिम इनामदार यांनी कराड येथील तहसिल कार्यालय समोर ऊसाला FRP अधिक 500 रूपये भाव मिळावा या मागणीसाठी आंदोलन सुरु केले आहे. आंदोलनाच्या 6 व्या दिवशी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी सरकारवर निशाणा साधला. “मंत्रालय म्हणजे एकमेकांची धुणी धुवायचा घाट झालेला आहे. याठिकाणी … Read more

सातारा पालिकेची ईडी चौकशी व्हावी यासाठी खा. उदयनराजेंनी…; आ. शिवेंद्रराजेंचे महत्वाचे विधान

Shivendraraje Bhosale Udayanraje Bhosale News

सातारा प्रतिनिधी । सातारा शहरातील विकासकामावरून व पालिकेतील भ्रष्टाचाराच्या मुद्यांवरून आता साताऱ्यातील दोन्ही राजे खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात चांगलीच जुंपली आहे. दरम्यान, खा. उदयनराजे यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेत सातारा नगरपालिकेत पूर्वी आणि आत्ता ज्यांची सत्ता आहे त्यांची ईडीची चौकशी लावावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर आ. शिवेद्रराजेंनी त्यांच्यावर पुन्हा निशाणा … Read more

…तोपर्यंत मी विधानसभा निवडणूक लढणार नाही; आ. जयकुमार गोरेंची मोठी घोषणा

BJP MLA Jayakumar Gore Elections News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच पक्षांकडून तयारी केली जात आहे. अशा परिस्थितीत आता भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी थेट विधानसभा निवडणूक न लढवण्याबाबत महत्वाचे विधान केले आहे. “माण-खटावच्या मातीला दुष्काळमुक्त करायचे आहे. हेच स्वप्न घेऊन मी मतदारसंघात आलो. आज उरमोडी योजनेतून ९५ गावांना पाणी जातेय. उत्तर माणमधील १६ … Read more