पुसेसावळी दंगल प्रकरणी विक्रम पावसकरच्या सहभागाचा अहवाल 6 आठवड्यात सादर करा; High Court चे पोलिसांना आदेश

Satara News 7 1

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील पुसेसावळीत घडलेल्या दंगल आणि हत्येप्रकरणी उच्च न्यायालयाने सातारा पोलिसांना आदेश दिला आहे. पुसेसावळी दंगलीत भाजपचे नेते विक्रम पावसकर यांच्या सहभागाबाबतचा अहवाल 6 आठवड्यात सादर करावा, असे न्या. रेवती मोहिते डेरे आणि न्या. श्याम चांडक यांच्या बेचने आदेशात म्हटले आहे. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे पावसकर यांच्या समोरील अडचणीत वाढ होऊ शकते. … Read more

…तर उदयनराजेंसह शिवेंद्रराजेंनी पक्षाचा राजीनामा देऊन बाहेर पडावे; लक्ष्मण मानेंचा राजे बंधूंवर निशाणा

Satara News 6 1

सातारा प्रतिनिधी | भटक्या विमुक्त जाती, जमाती संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण माने यांनी आज साताऱ्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर निशाणा साधला. लोकसभा सभागृहाच्या आवारातील थोर नेत्यांचे पुतळे मोदी सरकारने हटविले आहेत. ते मूळ जागेवर पुन्हा बसविण्यासाठी उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोघांनी रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारावा. … Read more

विजयश्रीचे खरे श्रेय महायुतीमधील कार्यकर्त्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे – खासदार उदयनराजे भोसले

Masur News

सातारा प्रतिनिधी । जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या ऋणात राहून त्यांच्या विषयी आदरभाव व्यक्त करण्यासाठी लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदार संघानिहाय आभार दौरा सुरू केला आहे. सामान्य मतदारांच्या जोरावर मिळालेल्या विजयश्रीचे खरे श्रेय महायुतीमधील कार्यकर्त्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे आहे, असे प्रतिपादन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील मसूर येथे अश्वमेध मंगल कार्यालयात आभार मेळावा झाला. यावेळी … Read more

विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज : पृथ्वीराज चव्हाण

Karad News 16

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील सैदापूर येथे गव्हर्नमेंट आयटीआय कॉलेज, नुकताच छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचा कार्यक्रम पार पडला. यावेळी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. “तंत्रज्ञानात दिवसेंदिवस बदल होत नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. अशावेळी विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे,” असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. यावेळी … Read more

टेम्पो चालकाला खाली ओढून ‘त्यांनी’ शिवीगाळ करत केला धारदार शस्त्रहल्ला

Crime News 20240622 104122 0000

सातारा प्रतिनिधी | शिवीगाळ करत ’35 हजार रुपये देणार आहे की नाही,’ म्हणत टेम्पो अडवून चालकाला मारहाण करून लुटण्यात आल्याची घटना सातारा तालुक्यातील लिंब खिंड येथे घडली होती. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात चाैघांविरुद्ध दुखापतीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. रूपेश गुलाबराव चव्हाण (रा. दहिगाव, ता. कोरेगाव) आकाश चव्हाण (पूर्ण नाव आणि पत्ता नाही) अशी गुन्हा … Read more

कोरेगावातील जाहीर मेळाव्यात उदयनराजे आक्रमक; म्हणाले, यापुढे जिल्ह्याचे राजकारण…

Satara News 20240622 064257 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभेच्या खासदारकीच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले निवडून आले. निवडून आल्यानंतर त्यांचा आज आमदार महेश शिंदे यांच्यावतीने कोरेगाव येथे सत्कार करण्यात आला. यावेळी उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटावर निशाणा साधला. “यापुढे सातारा जिल्ह्याचे राजकारण मी आणि शिवेंद्रराजे करणार आहोत,” अशा शब्दात उदयनराजेंनी आपल्या हटके स्टाईलमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार … Read more

साताऱ्यात उपराकार लक्ष्मण माने झाले आक्रमक; म्हणाले की,

Laxman Mane News

सातारा प्रतिनिधी । सातारा येथे उपराकार लक्ष्मण माने यांनी आक्रमक होत सरकारवर निशाणा साधला. “सामान्य, कष्टकरी हेच देशाचे मालक आहेत. जी अडाणी प्रजा आहे ती फार सुजान नाही. ओबीसी नेते लक्ष्मण हाके व मराठा नेते मनोज जरंगे पाटील हे सरकारकडे जो न्याय मागत आहेत. पण त्यांना सरकार न्याय कुठे देत आहे? सरकार दहा टक्के लोकांच्या हितासाठी … Read more

अर्थसंकल्प अंदाजपत्रकपूर्व बैठकीचे रघुनाथदादांना निमंत्रण; दिल्लीत निर्मला सीतारामन यांच्याशी करणार चर्चा

Satara News

सातारा प्रतिनिधी । केंद्र सरकारच्या वतीने आज अर्थसंकल्प अंदाजपत्रकपूर्व आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. दिल्ली येथे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीचे निमंत्रण भारतीय किसान संघ परिसंघ राष्ट्रीय अध्यक्ष, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांना देण्यात आले आहे. या बैठकीस ते उपस्थित राहणार असून शेतकऱ्यांचे महत्वाचे प्रश्न आज ते बैठकीत मांडणार आहेत. शेतकरी … Read more

आमदार मकरंद पाटलांकडून आमदारपदाचा गैरवापर; विराज शिंदेची फाैजदारी गुन्हा दाखल करण्याचा मागणी

Mahableshwar News 20240620 201010 0000

सातारा प्रतिनिधी | झाडाणी गाव पुनर्वसित आहे. गावात एकही वस्ती नाही. तरीही वाईचे आमदार मकरंद पाटील यांनी आमदारपदाचा गैरवापर करुन वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना दबावाखाली झाडाणी येथे वीजट्रान्स्फर आणि वीजजोडणी करण्यास लावली. यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतील ५१ लाखांचा निधी वापरण्यात आला. त्यामुळे आमदार पाटील जननायक नसून लाभदायक आहेत, असा गंभीर आरोप युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विराज … Read more

पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर काँग्रेसकडून ‘या’ महत्वाच्या राज्याची जबाबदारी

Prithviraj Chavan News 20240620 180405 0000

कराड प्रतिनिधी | अखिल भारतीय काँग्रेस पक्षाकडून लोकसभा निवडणुकीत अपयश आलेल्या राज्यांतील निकालाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.मल्लिकार्जुन खर्गे यांनी राज्यनिहाय समिती स्थापन केल्या आहेत. मध्यप्रदेश राज्याची जबाबदारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर सोपविण्यात आली आहे. आ. चव्हाण यांच्यासह समितीमध्ये सप्तगिरी उल्का, आ. जिग्नेश मेवानी यांची नियुक्ती करण्यात … Read more

शाळा-महाविद्यालयात ‘महाराष्ट्र गीत’ लावा, मनसेची जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी

Satara News 20240620 150719 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा शहरातील विद्यालय, महाविद्यालयात महाराष्ट्राचे राज्य गीत ‘जय जय महाराष्ट्र माझा” हे गीत लावण्यात यावे यासाठी सातारा मनसे कडून जिल्हा प्रशासनाला मनसे शहराध्यक्ष राहुल पवार यांनी निवेदन दिले आहे. राज्य सरकारकडून १ फेब्रुवारी २०२३ रोजी ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आला, त्या नंतर राज्यातील सर्व विद्यालय, महाविद्यालयात तसेच … Read more

साताऱ्यातील विसावा जलशुद्धीकरण केंद्राचा आऊटलेट ओव्हरफ्लो, दुकान गाळ्यांमध्ये शिरले पाणी

Satara News 20240620 082020 0000

सातारा प्रतिनिधी | महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या विसावा आऊटलेटमधून पाणी ओव्हर फ्लो झाले. दरम्यन, दोन तास हे पाणी सुरु असल्याने हजारो लिटर पाणी वाया जाऊन वनवासवाडी येथील एका अपार्टमेंटमधील बेसमेंटमध्ये पाणी शिरले. दोन फूट पाणी शिरल्याने दुकान, मेडिकल मधील साहित्य भिजून मोठे नुकसान झाले. या घटनेनंतर शिवसेना ठाकरे गट या प्रकरणी आक्रमक झाला आहे. … Read more