खासदार उदयनराजेंनी वाईच्या गणपती घाटावर केली स्वच्छता, भिंतीवर रेखाटलं ‘कमळ’

Wai News 20240118 161155 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | अयोध्येतील मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील मंदिरांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्याचे आवाहन केल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील वाईतील गणपती घाटावर स्वच्छता केली. वाईच्या महागणपतीचे दर्शन घेऊन त्यांनी घाटावर स्वच्छता केली. साक्षात श्रीगणेशाची सेवा करत असल्याची भावना मनात निर्माण झाल्याची प्रतिक्रिया उदयनराजेंनी व्यक्त केली. मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद… अयोध्येत श्रीराम मंदिरात … Read more

‘उदयनराजे तब्बेत कशी आहे’, रामराजेंकडून विचारपूस, नेमकं घडलं काय?

20240118 142009 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काल सातारा जिल्हा दौरा पार पडला. त्यांनी कराड अन् फलटणमध्ये कार्यक्रमांना हजेरी लावली. एवढंच नाही तर जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांचं तोंड भरून कौतुक देखील केलं. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने फडणवीसांचा जिल्हा दौरा हा तसा महत्वाचाच मानला जात होता. कारण या दौऱ्यावेळी भाजपकडून लोकसभेच्या उमेदवाराची चाचपणी व घोषणा … Read more

अन् देवेंद्र फडणविसांनी केलं ‘निरा देवघर’च्या बंदिस्त नलिका कालव्याचे भूमिपूजन

Satara News 20240118 082928 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | निरा-देवघरच्या उजवा मुख्य कालव्याच्या बंदिस्त नलिका कालवा आणि निरा देवघर प्रकल्पामधून 0.93 टी.एम.सी. पाणी धोम बलकवडी प्रकल्पामध्ये टाकण्याच्या कामाचे बुधवारी शुभारंभ व भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. काळज ता. फलटण येथे झालेल्या कार्यक्रमास खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सर्वश्री रामराजे नाईक निंबाळकर, रणजितसिंह मोहिते पाटील, श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार … Read more

मोकाट रेड्यांचा उल्लेख करत देवेंद्र फडणवीसांनी डागली ठाकरे-राऊतांवर टीकेची तोफ

Karad News 20240117 162234 0000 jpg

कराड प्रतिनिधी | मुंबईत झालेल्या महा पत्रकार परिषदेचा उल्लेख टाळून कराडमधील कृषी प्रदर्शनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे. मुंबईत काही रेडे मोकाट सुटलेत. त्यांचा बंदोबस्त करण्याची योजना इथल्या कार्यक्रमात असेल तर सांगा, अशा शब्दांत फडणवीसांनी ठाकरे – राऊतांचा समाचार घेतला. फडणवीसांची ठाकरे-राऊतांवर टोलेबाजी कराड येथे एका … Read more

फडणवीस साहेब ‘आता राज्याचा कासरा हातात धरा’, खा. उदयनराजेंचं मोठं विधान

Karad News 20240117 150905 0000 jpg

कराड प्रतिनिधी | राज्यातील राजकारणात आगामी विधानसभा लोकसभा, विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सध्या राज्यात विविध राजकीय कार्यक्रमातून राजकीय नेतेमंडळी अनेक महत्वाची विधाने करीत आहेत. दरम्यान, आज कराड येथे आज 17 जानेवारी रोजी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेल्या भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून मोठं वक्तव्यं केलं आहे. ‘ज्याप्रकारे आज … Read more

जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो आशा-सेविकांचं आंदोलनं, केली ‘ही’ महत्वाची मागणी

Satara News 20240117 132217 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | आशा व गटप्रवर्तकांना मानधन वाढ आणि 2 हजार रुपये दिवाळी बोनस करण्याचे आश्वासन देऊन 2 महिने हाेऊनही याबाबतचा शासन निर्णय झाला नाही. त्यामुळे शेकडो आशा व गटप्रवर्तकांच्या वतीने जिल्हा परिषदेपासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. राज्यातील अंगणवाडीच्या आशा आणि … Read more

कास पाणी योजनेचा पंतप्रधान मोदी Online द्वारे करणार शुभारंभ

Copy of Satara News 20240117 102543 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा शहरास पाणीपुरवठा करणार्‍या कास जलवाहिनी वाढीव कामाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. खा. उदयनराजे भोसले, पालकमंत्री शंभूराज देसाई, आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत दि. 19 रोजी ऑनलाईन पद्धतीने हा सोहळा पार पडणार आहे. पंतप्रधान सोलापूर दौर्‍यावर असताना राज्यातील 6-7 प्रकल्पांच्या कामांचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात येणार … Read more

झोपडपट्टीवासियांचा लढा थांबणार नाही : डॉ. भारत पाटणकर

Satara News 20240117 070519 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन योजनेप्रमाणे आकाशवाणी झोपडपट्टीवासीयांचे अन्यत्र स्थलांतर करताना प्रशासनाने त्यांना सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधा द्याव्यात. प्रकल्प पूर्णत्वास आल्यानंतर त्यात मोफत घरे मिळायला हवीत. जो कायदा मुंबईत लागू आहे, तोच येथेही लागू पडतो. प्रशासन मोफत घरांबाबत लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत हा लढा थांबणार नाही, असा निर्धार श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. … Read more

‘देशाच्या लोकशाहीचं रक्षण करुयात’ म्हणत पृथ्वीराजबाबांनी काँग्रेसला दिली ‘इतकी’ देणगी…

Karad News 20240116 184721 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | काँग्रेसने डोनेट फॉर देश या मोहिमेंतर्गत १८ डिसेंबर २०२३ पासून क्राऊड फंडिंगची मोहिम सुरू केली होती. मात्र, काँग्रेसकडे फक्त ११ कोटी रुपयेच जमल्याची माहिती समोर आली होती. क्राऊड फंडिंगला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने देणगी जमा करण्यासाठी कार्यकर्ते आणि नेत्यांनी प्रयत्न वाढविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार या मोहिमेत सहभागी होत माजी मुख्यमंत्री … Read more

अजितदादांच्या गटाचे जिल्ह्यातील तालुका कारभारी ठरले!

Satara News 20240116 133302 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाकडून तालुकाध्यक्ष निवडी केल्या जात आहेत. दरम्यान, सातारा जिल्ह्यात कोरेगाव, वाई, खंडाळा, खटाव, महाबळेश्वर, कराड, फलटण आणि पाटण तालुकाध्यक्षांच्या निवडी नुकत्याच करण्यात आलेल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची बैठक जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, कार्याध्यक्ष अमित कदम, … Read more

मराठा समाजाच्या स्वतंत्र आरक्षणासाठी ‘रासप’चे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Satara News 20240116 111429 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्यातील अनेक संघटनांकडून मुख्यमंत्र्याकडे मागणी केली जात आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील गरीब मराठा समाजाला आरक्षण द्या मात्र ओबीसी कोट्यातून देऊ नये, अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे लोकसभा अध्यक्ष उमेश चव्हाण, जिल्हा सरचिटणीस डॉ. रमाकांत साठे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नुकतीच केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेल्या निवेदनात त्यांनी … Read more