कराडचा पाणी प्रश्न भीषण; नुकसान भरपाई न दिल्यास DP जैन कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करणार; पालकमंत्र्यांचा इशारा

Karad News 9

कराड प्रतिनिधी । कराड येथील पाणीपुरवठा प्रश्नाबाबतीत झालेल्या नुकसानीस डीपीजैन कंपनी कारणीभूत आहे अशी माहिती कराड येथील नागरिकांकडून मिळालेली आहे. सदर कंपनीस संबंधित विभागाकडून नोटीस देण्यात येई. नोटीसीनंतर देखील त्याची दखल न घेतल्यास डीपी जैन कंपनीवर फौजदारी दाखल करू, असा इशारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज दिला. कराड येथील नवीन शासकीय विश्रामगृहात कराड मधील … Read more

प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवप्रतापाचे शिल्प आचार संहितेपूर्वी उभारा; ‘या’ माजी आमदाराची मुनगंटीवारांकडे मागणी

Satara News 5

सातारा प्रतिनिधी | किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझलखानाचा वध झालेल्या ठिकाणी शिवप्रतापाचे शिल्प राज्य सरकारकडून लवकरच उभारले जाणार आहे. या शिल्पाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. आता हे शिल्प आचारसंहिता लागण्यापूर्वीच उभे करण्यात यावे, अशी मागणी माजी आमदार नितीन शिंदे यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे. माजी आमदार नितीन शिंदे यांनी मुंबईतील सह्याद्री अथितीगृहामध्ये वनमंत्री … Read more

पाटण तालुक्यातील नागरिकांच्या गैरसोयी होऊ नये याची प्रशासनाने दक्षता घ्यावी; पालकमंत्री शंभूराज देसाई

Patan News 20240727 081545 0000

पाटण प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. पाटण तालुक्यात देखील पावसाचे प्रमाण खूप आहे. त्यामुळे नागरिकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी फिल्डवर उतरून काम करावे, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रशासनास दिले. पाटण तालुक्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शुक्रवारी घेतला. पाटण पंचायत समितीच्या लोकनेते … Read more

पूरस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनास सज्ज राहण्याबाबत डॉ. अतुल भोसलेंच्या सूचना

karad News 6

कराड प्रतिनिधी । कराडमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होण्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन, भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांनी शहरात विविध ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. तसेच पूरस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाला सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या. कराडमध्ये गेल्या २-३ दिवसांपासून पावसाचा जोर वाढू लागला आहे. तसेच कोयना धरणातून विसर्ग सुरु असल्याने कराड परिसरात पूरपरिस्थिती उद्भवण्याची शक्यता … Read more

सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई

Satara News 4

सातारा प्रतिनिधी । सैन्यदल, माजी सैनिक, शहिदांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी राज्य शासन सदैव कटिबध्द आहे. ज्या शहिदांच्या परिवारांना अद्यापही जागा मिळाली नाही त्यांच्या जागेचा प्रश्न येत्या 27 ऑगस्ट या शहिद गजानन मोरे यांच्या हौतात्म दिनाच्या पुर्वी मार्गी लावू, या विषयासाठी मंत्रालय स्तरावर आढावा घेऊ व या परिवारांना लवकरात लवकर जागा मिळवून देण्यासाठी कसोशिने प्रयत्न करु अशी … Read more

संवेदनशील क्षेत्रातील अदानींच्या प्रकल्पाला कायदेशीर नोटीस; पर्यावरण कार्यकर्ते यांचा पुढाकार

Sushant More News 20240726 095616 0000

सातारा प्रतिनिधी | तारळी येथील अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडद्वारे बांधकामाधीन असलेल्या तारळी पंपिंग स्टोरेज हायड्रो प्रकल्पाच्या कायदेशीरतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पर्यावरण कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी जिल्हाधिकारी सातारा, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, वन विभाग तसेच अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. नोटीसमध्ये सुशांत मोरे यांनी प्रकल्पाच्या कायदेशीरतेवर गंभीर प्रश्न उपस्थित … Read more

पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज; पालकमंत्री देसाईंच्या प्रशासनाला अलर्ट राहण्याच्या सूचना

Shambhuraj Desai News

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु असून जिल्ह्यास रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर मुसळधार पावसामुळे कोयना धरणातून आज सायंकाळी चार वाजता पाणी सोडण्यात येणार असलयामुळे धरण क्षेत्रातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेत पूर … Read more

फलटणमध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी दोन्ही राजे बंधूंवर साधला निशाणा; म्हणाले, त्यांचे मानसिक स्वास्थ्य…

Ranjit Naik Nimbalakar News 20240724 203651 0000

सातारा प्रतिनिधी | नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये फलटण तालुक्यामधून जे मला मताधिक्य मिळालेले आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये फलटण तालुक्याचा रखडलेला विकास मार्गी लावण्याचे काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. यामुळे श्रीमंत रामराजे व त्यांच्या दोन्ही बंधूंसह संपूर्ण राजे गटाचे मानसिक स्वास्थ्य बिघडत चालले असल्याची बोचरी टीका माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली. … Read more

जिल्ह्याधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उद्या खासदार, आमदारांची महत्वाची बैठक; नेमकं कारण काय?

Satara News 3

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील सर्व विद्यमान खासदार, आमदार तसेच मान्यता प्राप्त राजकीय पक्षाचे प्रतिनिधी यांची बैठक उद्या गुरुवार दि. 25 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी 10 वा आयोजित केली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दि. 1 जुलै 2024 या अहंता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्या … Read more

सातारा जिल्ह्यात आल्याचा प्रश्न पेटला…! स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, आले वाहतूक करणाऱ्या गाड्यांची तोडफोड

Satara News 20240724 093646 0000

सातारा प्रतिनिधी | राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनामध्ये विधिमंडळामध्ये घोषणा करून सुद्धा सातारा सांगली औरंगाबाद या ठिकाणी अजूनही व्यापाऱ्यांकडून प्रतवारी करूनच आल्याची खरेदी केली जाते. त्यामध्ये शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच सातारा जिल्ह्यामध्ये त्यांच्याच सरकारने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याचा निषेध म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ठिकठिकाणी प्रतवारी केलेलं आलं जप्त करत … Read more

नवीन महाबळेश्वर प्रकल्पास जावळीसह महाबळेश्वरमधून विरोध; ‘या’ गोष्टींवर झाली महत्वाची चर्चा

new Mahabaleshwar project News

सातारा प्रतिनिधी । राज्य सरकारने नवीन महाबळेश्वर प्रकल्पासाठी एमएसआरडीसीची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती केली आणि हा प्रकल्प पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. दरम्यान या प्रकल्पामुळे पर्यावरण, वन्यजीव व जैवविविधतेची मोठ्या प्रमाणावर हानी होणार हे स्पष्ट असल्याने या प्रकल्पास विरोध करून तो रद्द करण्याची मागणी मेढा व महाबळेश्वर येथील नवीन महाबळेश्वर गिरीस्थान क्षेत्र … Read more

भाजप आमदार जयकुमार गोरेंवरील आरोप गांभीर्याने घ्या; हायकाेर्टाच्या पोलिसांना सक्त सूचना

Jayakumar Gore News

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात सध्या गाजत कोरोनाकाळातील एका घोटाळ्याची चांगलीच चर्चा सुरु आहे. हि चर्चा सुरु असताना उच्च न्यायालयाने पोलिसांच्या तपास कार्यावरून ओढलेले ताशेरे हे विचार करायला लावणारे आहे. कोरोनाकाळात २०० पेक्षा अधिक मृत रुग्णांना जिवंत असल्याचे दाखवून निधीवाटपात घोटाळा केल्याचा आरोप असलेले भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप गांभीर्याने घ्या, अशी सक्त … Read more