तारळी व मोरणा (गुरेघर) प्रकल्पातील उपसा सिंचन योजनांच्या कामासंदर्भात मुंबईत बैठक

patan News jpg

सातारा प्रतिनिधी । तारळी प्रकल्पातील उपसा सिंचन योजनेच्या, तसेच मोरणा (गुरेघर) मध्यम प्रकल्पातील डावा व उजवा कालवा येथील बंदिस्त नलिका प्रणालीच्या कामांबाबत मुंबईत नुकतीच एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी सातारा जिल्ह्यातील तारळी प्रकल्पातील उपसा सिंचन योजनेची कामे येत्या १५ मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रशासनाला दिले. यावेळी प्रकल्पांतील प्रलंबित कामांच्या सद्य:स्थितीचा … Read more

खा. निंबाळकरांनी घेतली नड्डांची भेट; केली ‘या’ महत्वाच्या विषयांवर चर्चा

Satara News 42 jpg

सातारा प्रतिनिधी । सध्या दिल्लीत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. महाराष्ट्रातील खासदार दिल्लीत अधिवेशनासाठी गेले आहेत. या दरम्यान, दिल्ली येथे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी भाजपच्या कार्यालयात पक्षाध्यक्ष नड्डा यांची नुकतीच भेट घेतली. तसेच त्यांना माढा लोकसभा मतदारसंघात केलेल्या विकासकामांची व प्रकल्पांची माहिती दिली. यावेळी झालेल्या चर्चेत खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी संसदेमध्ये व विकासकामांच्या मंजुरी व निधी … Read more

खा. श्रीनिवास पाटलांच्या खंबाटकी घाटातील महत्वाच्या प्रश्नावर नितीन गडकरींनी दिलं उत्तर

Satara News 41 jpg

कराड प्रतिनिधी । पुणे – सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटातील नवीन सहापदरी बोगदाचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. हे काम यावर्षी डिसेंबर अखेर पुर्ण होणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज लोकसभा अधिवेशनात दिली. सातारा लोकसभा मतदारसंघाचे खा. श्रीनिवास पाटील यांनी बोगद्याच्या बांधकामाबाबत प्रश्न अधिवेशनात उपस्थित केला असता त्यावर मंत्री गडकरी यांनी उत्तर दिले. … Read more

‘गुंडाराज हटाव, महाराष्ट्र बचाव’, साताऱ्यात राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक

Satara News 39 jpg

सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असताना ट्रिपल इंजिन सरकारच्या सत्तेतील भाजपचे आमदार उल्हासनगर पोलीस स्टेशनमध्ये गोळ्या झाडून व्यक्तीला जीवे मारण्याचा प्रयत्न करतात. तिथे पोलिस अधिकारी उपस्थित असताना ते बघ्याची भूमिका घेतात. हे अत्यंत खेदजनक आहे. गृहमंत्र्यांनी आपल्या पदाचा ताबडतोब राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी (शरद पवार गट) महिला काँग्रेसने केली आहे. … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली ‘ही’ मागणी

Satara News 20240208 122811 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी 19 फेब्रुवारी रोजी गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजनेच्या जलपुजनाला येणार आहेत. माण तालुक्यातील आंधळी धरणातून माणगंगा नदी प्रवाहित केली जाणार आहे. मोदींचे गुरुवर्य इनामदार यांचे मूळ गाव खटाव असून त्यांच्या तालुक्यातून आणि गावातून वाहणारी येरळामाई नदी देखील प्रवाहीत करावी. यानिमित्ताने पंतप्रधान मोदींनी खटाला येण्याचे साकडे स्वाभिमानी शेतकरी … Read more

साताऱ्यात मानधनवाढीसाठी आशा अन् गटप्रवर्तकांकडून निदर्शने

Satara News 37 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियनच्यावतीने आज सातारा जिल्हा परिषदेसमोरआंदोलन करण्यात आले. मानधनवाढीचा अध्यादेश काढावा, यासह विविध मागण्या यावेळी आशा सेविका आणि गटप्रवर्तकांच्या वतीने करण्यात आल्या. यावेळी आंदोलनात मोठ्या संख्येने महिला कर्मचारी सहभागी झाल्या होत्या. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. यावेळी संघटनेच्या अध्यक्षा काॅ. आनंदी अवघडे यांच्या मार्गदर्शनाखालील आंदोलनात कल्याणी मराठे, … Read more

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून परळी विभागात कोट्यावधीची कामे : सारंग पाटील

Satara News 36 jpg

कराड प्रतिनिधी | दुर्गम भागात विकासाकामे झाली तरच लोकांचे राहणीमान सुधारेल आणि खऱ्या अर्थाने भागाच्या विकासाला चालना मिळेल, या विचारातून खा. श्रीनिवास पाटील यांनी विकासासाठी प्रयत्न केला. त्यामुळेच परळी विभागात कोट्यावधीची विकासकामे झाली असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील यांनी केले. सातारा तालुक्याच्या परळी विभागातील परळी, चिखली, जांभे, चाळकेवाडी, वावदरे, रेवंडी, राजापुरी, बोरणे, … Read more

वांग मध्यम प्रकल्प – जलसंपदा विभागाने प्रस्ताव सादर करावा – अनिल पाटील

Satara News 35 jpg

सातारा प्रतिनिधी | वांग मध्यम प्रकल्पांतर्गत अंशतः बाधित जिंती व निगडे ता.पाटण (जि. सातारा) गावातील प्रकल्पग्रस्तांना रोख रक्कमेच्या अनुषंगाने जलसंपदा विभागाने प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिले. सातारा जिल्ह्यातील वांग मध्यम प्रकल्पांतर्गत अंशतः बाधित गावातील प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमिनीऐवजी रोख रक्कम द्यावयाच्या प्रस्तावाबाबत व तारळी प्रकल्पामध्ये 100 टक्के बाधीत … Read more

खासदार रणजितसिंह निंबाळकरांसह जयकुमार गोरेंनी घेतली रेल्वेमंत्र्यांची भेट

Satara News 2024 02 07T170701.973 jpg

सातारा प्रतिनिधी । सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यातील विठ्ठल भक्तांची गेल्या 75 वर्षांपासून सांगली, सातारा जिल्ह्यातील रेल्वे स्टेशनवरून पंढरपूरला जाणारी रेल्वे गाडी (Indian Railway) सुरू करण्याची मागणी होती. ही मागणी पूर्ण झाली असून खासदार संजय पाटील यांनी हे प्रयत्न केले आहेत. त्यानंतर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे व ॲड. आ. राहुल कुल यांनी … Read more

जिल्ह्यात सलग चार दिवस रंगणार राजधानी महासंस्कृती महोत्सव

Satara News 2024 02 07T130415.655 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा, फलटण, कराड, वाई, महाबळेवर या तालुक्यांच्या ठिकाणी सांस्कृतीक कार्यविभाग, सांसकृतीक संचालनालय व सातारा जिल्हा प्रशासन यांच्यावतीने राजधानी महासंसकृतीचे आयोजन करण्यात आले आहे. राजधानी महासंस्कृती महोत्सवाला पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. हे कार्यक्रमांना प्रवेश विनामूल्य त्याचा लाभ मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे. … Read more

राष्ट्रवादीच्या विजय निश्चय मेळाव्यात पवार गटाच्या नेत्याकडून अजितदादांवर हल्लाबोल

b2ca3421 37f3 4756 9d12 f6499ba0f158 jpg

सातारा प्रतिनिधी | पावडर खाऊन तयार केलेली बॉडी, जमीन विकून आलेला पैसा आणि पवार साहेबांना सोडून गेलेला नेता हा राजकारणात जास्त काळ टिकत नाही. २०१९ साली सोडून गेलेल्या लोकांच्या बाबतीत जे झालं तेच २०२४ साली त्यांच्या बाबतीत होणार आहे. ज्या लोकांना पवार साहेबांनी लाल दिवे दिले त्या लोकांनी नागपूरचे मांडलीकत्व पत्करले. असं म्हणत शरद पवार … Read more

कोयना जलाशयाच्या पर्यटनाला मंजुरी; 45.38 कोटी रुपयांची तरतूद

koyna news 20240207 075659 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा-जावलीचे भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या पाठपुराव्याला आणखी एक मोठे यश मिळाले आहे. कोयना जलाशयात मुनावळे (ता. जावली) येथे जागतिक दर्जाचे जलपर्यटन, वॉटर स्पोर्ट्स प्रकल्प सुरु करण्यासाठी राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने मंजुरी दिली आहे. त्यासाठी ४५.३८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या प्रकल्पाला मंजुरी दिल्याबद्दल आमदार शिवेंद्रराजेंनी मुख्यमंत्री … Read more