केंद्रीय मंत्री जे. पी.नड्डांसह उपमुख्यमंत्री फडणवीस गुरुवारी कराडात; विंगात भाजपचा होणार भव्य जनसंवाद मेळावा

Karad News 38

कराड प्रतिनिधी । भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री जे. पी. नड्डा गुरुवारी, दि. २२ रोजी कराड दौऱ्यावर येत आहेत. यानिमित्त त्यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी दुपारी ३ वाजता कराड तालुक्यातील विंग येथील आदर्श विद्यामंदिरच्या पटांगणावर भव्य जनसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी जे. पी. नड्डा यांच्यासोबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस … Read more

आ. पृथ्वीराज चव्हाणांच्या माध्यमातून कराड दक्षिणेतील 22 किलोमीटर रस्त्यांना दर्जोन्नती

Karad News 35

कराड प्रतिनिधी । कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील विकासाचे मार्ग भक्कम करणारे नेतृत्व अशी ओळख असणाऱ्या आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून मतदारसंघातील २२ किलोमीटर अंतराच्या रस्त्यांना दर्जोन्नती मिळाली आहे. आ. चव्हाण यांनी विकासाचे हे आणखी एक पाऊल उचलले असल्याने त्यांच्या कार्याबद्दल कौतुक होत आहे. आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी दि. १४ फेब्रुवारी २०२३ रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य … Read more

रेल्वे मार्गाच्या बाजूने रस्ता द्या, अन्यथा रेलरोको; ‘रयत क्रांती’चा पोलिसांना निवेदनाद्वारे इशारा

Karad News 34

कराड प्रतिनिधी । रेल्वेलाईनच्या दुहेरीकरणानंतर रेल्वे मार्गाच्या बाजूने शेतकऱ्यांसाठी रस्ता करून देण्याचे आश्वासन रेल्वे प्रशासनाच्या वतीने देण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र रेल्वे प्रशासनाने रस्ता केला नसल्याने शेतकऱ्यांना शेतमालाची ने- आण करण्यात अडचण येत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने रेल्वे मार्गाच्या बाजूने शेतकऱ्यांसाठी रस्ता करावा; अन्यथा रेलरोको करण्याचा इशारा रयत क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन नलवडे … Read more

पृथ्वीराज चव्हाणांचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र; ‘मंकीपॉक्स’बाबत केली ‘ही’ मागणी

Karad News 20240819 151122 0000 scaled

कराड प्रतिनिधी | जगभरात प्रादुर्भाव वाढणाऱ्या ‘मंकीपॉक्स’च्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. ‘मंकीपॉक्स’ विषाणू जगभरात पसरत आहे. तो आपल्या शेजारील देशात पोहोचला आहे. त्यामुळे संसर्गीत देशांतून येणाऱ्या प्रवाशांसाठी मुंबई विमानतळावर कठोर चाचणी आणि विलगीकरण प्रोटोकॉल लागू करावेत, अशी मागणी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज … Read more

सातारा शहरात पालिकेतर्फे 4 ठिकाणी 150 किलोवॅटचा सोलर प्रकल्प

Satara News 20240819 143325 0000 scaled

सातारा प्रतिनिधी | सद्यस्थितीत विजेची मागणी वाढत चालली असल्यामुळे केंद्र व राज्य शासनाने पारंपरिक ऊर्जा साधनांचा कमीत कमी वापर करून अपारंपरिक ऊर्जा साधनांचा वापर वाढावा, यासाठी कृषी सौर वाहिनी, पीएम सूर्यघर अशा योजना हाती घेतल्या आहेत. पालिकेने ‘माझी वसुंधरा अभियान ३.०’ अंतर्गत शहरात चार ठिकाणी १५० किलोवॅट क्षमतेचे सोलर प्रकल्प कार्यान्वित करण्याचे काम हाती घेतले … Read more

लाडकी बहिण योजनेबाबत मंत्री तटकरेंनी बँकांना दिल्या ‘या’ महत्वाच्या सूचना

Satara News 20240819 121907 0000 scaled

सातारा प्रतिनिधी | बँक खाती वापरात नसल्‍याने मुख्‍यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून जमा झालेले पैसे बँकांनी दंडापोटी कापून घेतल्याचे समजत आहे. शासकीय योजनांच्‍या लाभातून अशी दंड वसुली न करण्‍याबाबत आम्‍ही विभागीय आयुक्‍त तसेच सर्व जिल्‍हाधिकाऱ्यांना बँक व्‍यवस्‍थापनास सूचना करण्‍यास सांगणार असल्‍याची माहिती महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी रविवारी दिली. सातारा येथे रविवारी लाडकी बहिण … Read more

साताऱ्यात लाडकी बहिण सन्मान सोहळ्याप्रसंगी उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा विरोधकांवर निशाणा; म्हणाले की, सावत्र भाऊ तुम्हाला…

Satara News 20240819 113809 0000 scaled

सातारा प्रतिनिधी | राज्य सरकारच्यावतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांचा सन्मान सोहळा साताऱ्यात घेण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी फडणवीसांनी विरोधकांवर निशाणा साधला. “आज आपण महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली. विरोधक या योजनेच्या विरोधात बोलत आहेत. याविरोधात कोर्टात गेले, या सावत्र भावांवर विश्वास ठेवू नका. हे सावत्र भाऊ … Read more

सातारचे नवीन शासकीय विश्रामगृह सर्व सोयी सुविधेसह सज्ज ठेवावे; मुख्यमंत्री शिंदेंच्या अधिकाऱ्यांना निर्देश

Satara News 20240819 092754 0000

सातारा प्रतिनिधी | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा येथील नवीन शासकीय विश्रामगृहाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी नवीन शासकीय विश्रामगृह सर्व सोयी सुविधेसह सज्ज ठेवावे, असे निर्देश दिले. सातारा येथील नवीन बांधण्यात आलेल्या शासकीय विश्रामगृहाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, ,कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष … Read more

शेतकरी व घरगुती वीजग्राहकांना मोठा आर्थिक दिलासा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Satara News 20240818 201254 0000

सातारा प्रतिनिधी | राज्य शासनाने गेल्या अडीच वर्षांत सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून वीजक्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे. राज्यातील ४४ लाख शेतकऱ्यांना एप्रिलपासून पुढील पाच वर्ष मोफत वीज देण्यात येत आहे. तर मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना व मागेल त्यांना सौर कृषिपंप योजनेतून दिवसा वीजपुरवठा करण्यात येणार आहे. सोबतच केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेतून घरगुती … Read more

बहिणींच्या खात्यात पैसे जमा होताच विरोधकांची थोबाडं पांढरी फटक झाली; साताऱ्यात मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सणसणीत टोला

Satara News 20240818 171220 0000

सातारा प्रतिनिधी | योजना फसवी आहे, चुनावी जुमला आहे, पैसे येणारच नाहीत, अशी टीका करत सावत्र भावांनी ही योजना बंद पाडण्याचे प्रयत्न केले. मात्र, लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाल्याचे मेसेज पाहून विरोधकांच्या छातीत धडकी भरली. त्यांची थोबाडं पांढरी फटक झाली असल्याचा सणसणीत टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला. या योजनेमुळं वेडे झालेल्या विरोधकांना … Read more

लाडकी बहीण योजनेच्या मुदतीची अट काढून टाका; माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाणांची मुख्यमंत्री शिंदेकडे मागणी

Karad News 20240818 142436 0000

कराड प्रतिनिधी | शासनाची मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा सर्व्हर वारंवार बंद असल्याने योजनेमध्ये नोंदणीला विलंब होत असून काही ठिकाणी नोंदणीच होत नसल्याचे प्रकार निदर्शनास येत आहेत. ६-६ तास ओटीपी येत नाही. त्यामूळे लाभार्थीना दिवस-दिवसभर आधार केंद्रात ताटकळत बसावे लागत आहे. त्यामुळे अंतिम तारखेपर्यंत नाव नोंदणी होऊ शकणार नाही ही चिंता निर्माण झाली आहे. त्यामुळे या … Read more

साताऱ्यात लाडकी बहीण योजनेचा सन्मान सोहळ्यासाठी वाहतुकीत मोठा बदल

Satara News 20240818 105253 0000

सातारा प्रतिनिधी | साताऱ्यात आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सन्मान सोहळा, वचनपूर्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि अजित पवार आज दुपारी सैनिक स्कूलच्या मैदानावर कार्यक्रम पार पडणार आहे. यानिमित्ताने सकाळी ८ ते सायंकाळी ६ पर्यंत वाहतुक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. या कार्यक्रमास पालकमंत्री शंभूराज देसाई, … Read more