दुष्काळी भागाच्या पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही : देवेंद्र फडणवीस

Man News jpg

सातारा प्रतिनिधी । तारळी, धोम, बलकवडी, टेंभू, म्हैसाळ, निरा देवधर या प्रकल्पांवरील दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या सर्व योजना मोठ्या प्रमाणावर गतीने पूर्ण करण्यात येतील. गेल्या दीड वर्षाच्या कालखंडात 121 कामांना मंजुरी दिली आहे. यातून महाराष्ट्रातील 15 लाख हेक्‍टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. दुष्काळी भागाच्या पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही … Read more

प्रशासनाने प्रभावीपणे पाणी टंचाई परिस्थिती हाताळावी; आ. पृथ्वीराज बाबांच्या महत्वाच्या सूचना

Karad News 46 jpg

कराड प्रतिनिधी । माजी मुख्यमंत्री तथा कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली कराड येथील शासकीय विश्रामगृहात आज कराड तालुका प्रशासनाची पाणी टंचाईची आढावा बैठक पार पडली. “यावेळी “सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्याने येणाऱ्या काही दिवसात पाणी टंचाईचे भीषण संकट उभा राहू शकते. काही ठिकाणी पाणी टंचाई परिस्थिती आत्ताच निर्माण झाली आहे. त्यामुळे तालुका प्रशासनाने प्रभावीपणे … Read more

उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिली जरांगेंच्या आरोपांवर दोनच वाक्यात प्रतिक्रिया, म्हणाले की…

Satara News 2024 02 25T155712.607 jpg

सातारा प्रतिनिधी । माण तालुक्यातील आंधळी येथील गुरुवर्य कै. लक्ष्मणरावजी इनामदार उपसा सिंचन योजनेचे आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते जल पूजन करण्यात आले. या दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी जालन्यातील अंतरवाली सराटीत पत्रकार परिषद घेत फडणवीस यांच्यावर टीका केली. या टीकेवर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली … Read more

घारेवाडीत बूथ अध्यक्षांच्या प्रशिक्षण शिबीरात सारंग बाबांनी केला निर्धार

Karad News 44 jpg

कराड प्रतिनिधी । “बूथ कमिटीचे महत्व हे अनन्यसाधारण आहे. याची प्रणाली व प्रक्रिया बूथच्या समन्वयक पदाधिकाऱ्यांनी समजून घेतली पाहिजे. पक्षाचे अध्यक्ष आदरणीय खा.शरदचंद्र पवार यांचे विचार तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असा निर्धार केला असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष आ. … Read more

साताऱ्यात येताच उपमुख्यमंत्री फडणवीसांचा थोरल्या पवारांवर निशाणा

Satara News 2024 02 25T131634.268 jpg

सातारा प्रतिनिधी । गुरुवर्य कै. लक्ष्मणरावजी इनामदार उपसा सिंचन योजनेचा जल पूजन सोहळा आज आंधळी येथे आयोजित करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते सोहळ्यात जलपूजन करण्यात येणार असून आज साताऱ्यात त्यांनी भाजप खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. “चिन्हाच्या अनावरणासाठी खा. शरद पवार यांना … Read more

साताऱ्यातील ‘जलमंदिरा’त मुख्यमंत्र्यांच्या बॉडीगार्डलाच देण्यात आली ‘नो एन्ट्री’

Satara News 2024 02 25T105451.095 jpg

सातारा प्रतिनिधी । भाजप खासदार उदयनराजे भोसले यांची काल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली. तसेच त्यांच्याशी महत्वाच्या विद्यांवर देखील चर्चा केली. दरम्यान, खा. उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्या ठिकाणी मुख्यमंत्री गेले असता एका पोलिस अधिकाऱ्यांनी चक्क मुख्यमंत्री यांच्यात बॉडीगार्डला नो एन्ट्री केली. त्यामुळे साताऱ्यात … Read more

मध्यप्रदेशच्या माजी मुख्यमंत्र्यांनी घेतला कराड दक्षिणमधील BJP च्या संघटनात्मक वाटचालीचा आढावा

Karad News 40 jpg

कराड प्रतिनिधी । भाजपचे ज्येष्ठ नेते तथा मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आ. शिवराजसिंह चौहान आज सातारा लोकसभेच्या दौऱ्यावर आले होते. या पार्श्वभूमीवर त्यांनी कराड येथे भाजप पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कराड दक्षिणमधील भाजपाच्या संघटनात्मक वाटचालीचा आढावा घेतला. तसेच महत्वाच्या सूचना देखील केल्या. लोकसभा संपर्क अभियानाअंतर्गत मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आ. शिवराजसिंह चौहान कोल्हापूर, हातकणंगले व सातारा … Read more

कलेसह संस्कृतीच्या क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी समिती नियुक्त करणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Mahabaleshwar News 1 jpg

सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्राला कला आणि संस्कृतीचा अत्यंत गौरवशाली वारसा लाभला आहे. कला आणि संस्कृतीशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. नाट्य संस्कृतीला अधिक बळकट करण्यासाठी राज्यात 75 नाट्यगृहे अद्ययावत करण्यात येणार आहेत. यामध्ये 52 नाट्यगृहांचे अद्ययावतीकरण करण्यात येणार असून उर्वरित नाट्यगृहे नव्याने उभारण्यात येणार आहेत. ती सर्व सुविधा संपन्न असावीत व परिपूर्ण असावी यासाठी … Read more

मराठा समाजाने संयम बाळगावा तर विरोधकांनी आरक्षण टिकण्यावर सकारात्मक चर्चा करावी : CM एकनाथ शिंदे

Satara News 2024 02 24T171122.869 jpg

सातारा प्रतिनिधी । “आम्ही मराठा समाजबांधवांच्या आरक्षणाबाबत नुकताच एक महत्वाचा निर्णय घेतला. मात्र, मराठा समाजाला दिलेले आरक्षण टिकणार नाही, असे काहीजण सांगत आहेत. परंतु, का टिकणार नाही?, याची कारणे मात्र त्यांच्याकडून दिली जात नाहीत. वास्तविक, आरक्षण कसं टिकेल यावर विरोधाकानी आमच्यासोबरोबर सकारात्मक चर्चा केली पाहिजे. हातात संधी होती, त्यावेळी त्यांनी संधीचे सोने केले नाही,” असा … Read more

आयुष्यभर काँग्रेससोबत राहून चव्हाणांनी काँग्रेसचा खासदार आणून ठेवला; साताऱ्यात पटोलेंची घणाघाती टीका

Satara News 2024 02 24T160614.731 jpg

सातारा प्रतिनिधी । आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्व ओकशा कामाला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे यांनी सातारा जिल्हा दौऱ्यावर आले असताना महत्वाचे विधान केले तसेच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर टीकाही केली. लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाचे काम जवळपास निश्चित झाले असून ४२ मतदारसंघात महाविकास आघाडी जिंकण्याचा कल आहे, असा दावा करत … Read more

राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचे निवडणुक विषयक प्रशिक्षण संपन्न

Satara News 99 jpg

सातारा प्रतिनिधी | जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांच्या आदेशान्वये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चे अनुषंगाने, सातारा जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत काल दि. 23 फेब्रुवारी रोजी राजकीय पक्षांचे प्रशिक्षण पार पडले. यावेळी आदर्श आचार संहिता एक खिडकी यंत्रणा, सीव्हिजील, नामनिर्देशन प्रक्रिया, मतदार नोंदणी ईईएम, ईएस एम एस, पेड न्युज, माध्यम प्रमाणिकरण आणि सनियंत्रण आदि विषयावर … Read more

मराठा बांधवांनी रोखला विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्ग, अर्धातास वाहतूक ठप्प

KARAD NEWS 20240224 121459 0000 jpg

कराड प्रतिनिधी | मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी कराड तालुक्यात मराठा बांधवांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. कोकणचे प्रवेशद्वार असणारा विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्ग मराठा बांधवांनी आज सुमारे अर्धा तास रोखून धरला. यामुळे या महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. सध्या बारावीच्या परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांना … Read more