कराडच्या कार्वे गावातील मराठा बांधवांनी जरांगे पाटलांसाठी केले एकदिवसीय उपोषण; शाळकरी मुलांनीही दिला पाठिंबा

Karave News 20240924 155843 0000

कराड प्रतिनिधी | अंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सहाव्यांदा उपोषण सुरु केले आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी काल कराड तालुका मराठा बांधवांनी दत्त चौकात आंदोलन केले. त्यानंतर आज तालुक्यातील कार्वे गावातील ग्रामस्थांसह मराठा बांधवांनी एक दिवसाचे उपोषण करीत पाठिंबा दिला. त्यांच्या पाठिंब्यासाठी शाळकरी मुलांनी देखील उपोषणस्थळी हजेरी लावली तर ग्रामस्थांनी देखील … Read more

सातारा जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात उमेदवार देणार; RPI गवई गटाच्या डॉ. राजेंद्र गवईंची घोषणा

Koregaon News 20240924 151507 0000

सातारा प्रतिनिधी | आगामी विधानसभा निवडणुकीत सातारा जिल्ह्यात सर्व विधानसभा मतदार संघात आरपीआय गवई गटाचे उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा गवई गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजेंद्र गवई यांनी नुकतीच केली. कोरेगाव येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचा निर्धार मेळावा पार पडला. या मेळाव्याला राष्ट्रीय नेते राजेंद्र गवई यांनी मेळाव्यात बोलताना म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत … Read more

कराड तालुक्यातील ‘या’ गावातील शेतकऱ्यांचा विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा

Karad News 20240924 141654 0000

कराड प्रतिनिधी | येत्या १५ दिवसात बाधीत जमिनींचा मोबदला न मिळाल्यास सुपने व पश्चिम सुपने येथील टेंभू प्रकल्प बाधीत संतप्त शेतकऱ्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांनी याबाबतचे निवेदन देखील काल प्रशासनास दिले आहे. शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बाधीत जमिनींचा सर्वे होऊन १३ वर्षे उलटून गेली मात्र अद्याप या जमिनींचा … Read more

… तर पालकमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर बेमुदत आंदोलन करणार; व्यसनमुक्त युवक संघाचा इशारा

Satara News 20240924 121410 0000

सातारा प्रतिनिधी । फलटण तालुक्यातील आळजापूर येथील परमिट रूम बारचा परवाना तात्काळ रद्द करावा अन्यथा उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या सातारा येथील निवासस्थानासमोर गांधी जयंतीच्या दिनी, दि. २ ऑक्टोबर रोजी आंदोलन करू, असा इशारा व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र यांचे वतीने संघटनेचे प्रमुख संयोजक विलास बाबा जवळ यांनी दिला आहे. निवेदनात म्हटले आहे की, आळजापूर … Read more

शेतीपंपांचे सरसकट वीजबिल माफ करा; स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

Satara News 20240924 105322 0000

सातारा प्रतिनिधी | महाराष्ट्र शासनाने साडे सात अश्वशक्तीपर्यंतच्या शेतीपंपाचे वीजबील माफ केलेले आहे. यामुळे सुमारे ४५ लाख शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. पण, साडेसात अश्वशक्तीच्यावर शेतीपंप असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या एकदम कमी आहे. त्यामुळे त्यांनाही न्याय द्यावा. त्यांची चिंता दूर करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आलेली आहे. संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले … Read more

जिल्ह्यातील 3 हजारांवर अंगणवाड्या बुधवारी बंद; नेमकं कारण काय?

Satara News 20240924 073523 0000

सातारा प्रतिनिधी । मानधनाएेवजी वेतन द्यावे, मासिक पेन्शन मिळावी यासह अन्य मागण्यांसाठी जिल्ह्यातील सेविका आणि मदतनीस बुधवारी (दि. २५) अंगणवाड्या बंद ठेवून मुंबईतील महाआंदोलनात सामील होणार आहेत. यामुळे जिल्ह्यातील तीन हजारांवर अंगणवाड्यांना टाळा लागण्याचा अंदाज आहे. मागील नऊ महिन्यांपूर्वी सेविका आणि मदतनीसांनी विविध मागण्यांसाठी ५२ दिवस अंगणवाड्या बंद ठेवून आंदोलन केले होते. त्यावेळी राज्य शासनाने … Read more

रेवंडे पाणी योजनेचे काम निकृष्ट; महिलांचा गटविकास अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन

Satara News 20240923 205451 0000

सातारा प्रतिनिधी । सातारा तालुक्यातील रेवंडेत आठ महिन्यांपूर्वी झालेल्या पाणीपुरवठा योजनेचे काम निकृष्ट झाले आहे. लोकांना पाणी मिळत नाही, असा आरोप करत गावातील महिलांनी उद्धवसेनेच्या नेतृत्वाखाली सातारा गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या मारला. यावेळी पाण्यावरून महिला आक्रमक झाल्या. यादरम्यान, योजनेची दुरुस्ती करुन दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन देण्यात आले. त्यानंतरच हे आंदोलन मागे घेण्यात आले. रेवंडे गावात … Read more

कराडच्या बुधवार पेठेतील भाजी मंडई हलवा, अन्यथा ठिय्या आंदोलन करू; नागरिकांसह डॉक्टरांचा मुख्याधिकाऱ्यांना इशारा

Karad News 20240923 190634 0000

कराड प्रतिनिधी । कराड शहरातील बुधवार पेठेतील जुना पटेल दवाखाना ते औंधकर हॉस्पिटल पर्यंतच्या भाजी मंडईवरून स्थानिक नागरिकांसह डॉक्टरांनी सोमवारी कराड नगर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना घेराव घातला. आक्रमक झालेल्या नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांना भाजीमंडई तत्काळ हटवावी अन्यथा येत्या काळात तीव्र स्वरूपात ठिय्या आंदोलन करू, अशा इशारा दिला. कराड येथील बुधवार पेठेतील रस्त्याकडेला बसणाऱ्या व्यापाऱ्यांमुळे स्थानिक नागरिकांना तसेच येथील … Read more

मनोज जरांगे पाटील यांच्या केसालाही धक्का लागला तर…; कराडात मराठा समाज बांधवांचा आंदोलन करत सत्ताधारी विरोधकांना इशारा

Karad News 20240923 180330 0000

कराड प्रतिनिधी । मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषण केले असून उपोषणामुळे जरांगे पाटील यांची प्रकृतीही खालावत चालली आहे. दरम्यान, वडीगोद्रीत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी आज कराड येथील दत्त चौकात कराड तालुका मराठा समाज बांधवांच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी 50 टक्याच्या आतील मराठा … Read more

वाईतील प्रस्तावित औद्योगिक वसाहत रद्द; सरकारकडून अधिसूचना जारी

Wai News 20240923 114819 0000

सातारा प्रतिनिधी । वाई तालुक्यातील वेळेमध्ये औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे तालुक्यातील तरुणांच्या हाती रोजगार प्रप्त होणार होता. मात्र, शासनाने नुकतीच एक अधिसूचना काढत प्रस्तावित असलेली औद्योगिक वसाहत रद्द केली आहे. यामुळे वाई तालुक्यासह परिसरात तरुणांसह ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. याबाबतची अधिसूचना राजपत्राद्वारे प्रसिद्ध झाली असून, सरकारला या ठिकाणी औद्योगिक वसाहत … Read more

कराड उत्तर मतदारसंघाबाबत आढावा बैठकीत विक्रांत चव्हाणांच्या अधिकाऱ्यांना सूचना

Karad News 20240923 102416 0000

कराड प्रतिनिधी | कराड उत्तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मतदारसंघातील तयारीचा आढावा निवडणूक निर्णय अधिकारी विक्रांत चव्हाण यांनी घेतला आहे. यासाठी आयोजित बैठकीत विविध ३० समित्यांची स्थापना करण्यात आली असून निवडणुकीसाठी अधिकाऱ्यांनी सज्ज राहावे, असे आवाहन विक्रांत चव्हाण यांनी केले आहे. कराडमधील यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात झालेल्या बैठकीत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध समित्यांच्या मध्यवर्ती अधिकारी व … Read more

अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्याध्यक्षाने घेतली शरद पवारांच्या भेट

Satara News 20240923 095705 0000

सातारा प्रतिनिधी | राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महायुतीत सहभागी झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष व अजितदादांचे कट्टर समर्थक असलेल्या अमित कदम यांनी रविवारी सातार्‍यात खा. शरद पवार यांची भेट घेतली. काही महत्वाच्या गोष्टींवर चर्चा केल्यानंतर अमित कदम यांनी पवारांकडे सातारा-जावली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीची मागणी केली असल्याने राजकीय वर्तुळात … Read more