शामगावातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटला; ग्रामस्थांनी केली फटाक्यांची आतिषबाजीसह गुलालाची उधळण

Karad News 40

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील शामगाव या गावातील ग्रामस्थांनी शेतीच्या पाण्यासाठी अनेकवेळा आंदोलने केली. एकदा तर पायी चालत कराड तहसिलदार कार्यावर मोर्चा काढला.त्यांच्याकडून शेतीच्या पाण्याची करण्यात आलेली मागणीची दाखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून त्यांनी मंगळवार, २४ सप्टेंबर रोजी पाणी प्रश्नास मान्यता दिली. त्यामुळे शामगावच्या शेतीस पाणी मिळण्याचा मार्ग सुकर … Read more

हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन घेतल्यास कारवाई करणार; बाजार समितीचा इशारा

Karad News 39

कराड प्रतिनिधी । राज्य शासनाच्या वतीने सोयाबीनसाठी किमान आधारभूत किंमत ठरवून देण्यात आलेली आहे. ठरवून देण्यात आलेल्या किमतीपेक्षा कमी दराने सोयाबीन खरेदी केल्यास संबंधित व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा कराड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने देण्यात आला आहे. याबाबत सचिवांनी बाजार समिती कार्यक्षेत्रातील खरेदीदार व्यापाऱ्यांना सूचनापत्र दिले असून दक्षता घेण्यास … Read more

सातारा जिल्ह्यातील 3 हजार 293 अंगणवाड्यांना टाळा; 6,125 सेविका आणि मदतनीस बंदमध्ये सहभाग

Satara News 20240925 194817 0000

सातारा प्रतिनिधी । मानधना ऐवजी वेतन द्यावे, मासिक पेन्शन मिळावी यासह असंख्य मागण्यांसाठी सातारा जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी आज बुधवारी आक्रमक पावित्रा घेतला. सातारा जिल्ह्यातील ३ हजार २९३ अंगणवाड्यांना टाळा लागला. तर ६ हजार १२५ सेविका आणि मदतनीस बंदमध्ये सहभाग घेतला. सेविका आणि मदतनीसांनी विविध मागण्यांसाठी ५२ दिवस अंगणवाड्या बंद ठेवून गेल्या नऊ महिन्यांपूर्वी … Read more

येणाऱ्या विधानसभा निवडणूकीसाठी सर्व यंत्रणानी सज्ज रहावे -जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Satara News 20240925 190454 0000

सातारा प्रतिनिधी । विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे. एकमेकांशी समन्वय ठेवावा. निवडणूकीशी संबधीत कामकाजाबाबत अधिकारी , कर्मचारी यांना अनुषंगीक प्रशिक्षण द्यावे असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिले. कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने निवडणूक विषयक कामकाजाचा आढावा जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत घेतला. यावेळी पोलिस अधीक्षक समीर शेख, अप्पर जिल्हाधिकारी जीवन … Read more

कृष्णा दिव्यांग मित्र योजनेंतर्गत ओंडमध्ये दिव्यांगांना कृत्रिम अवयवसह साहित्याचे वितरण

Karad News 20240925 161856 0000

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील ओंड येथे दिव्यांग मेळावा पार पडला. यावेळी पंडित दिनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त कृष्णा दिव्यांग मित्र योजनेंतर्गत कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले व भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते कराड दक्षिण मधील दिव्यांगांना कृत्रिम अवयव व साहित्याचे वितरण करण्यात आले. “दिव्यांगाना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कृष्णा हॉस्पिटल … Read more

महाराणी येसूबाई स्फूर्ती स्थळासाठी साताऱ्याच्या माजी उपनगराध्यक्षाचे अजितदादांना साकडे

Satara News 20240925 155143 0000

सातारा प्रतिनिधी । सातारचे माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चिपळूण येथील जनसंवाद यात्रेदरम्यान भेट घेतली. यानंतर राजेशिर्के यांनी मंत्रालयात जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना रत्नागिरी जिल्ह्यातील शृंगारपूर येथील महाराणी येसूबाई यांच्या स्फूर्ती स्थळासाठी लवकर निधी उपलब्ध करून द्या, अशा मागणीचे निवेदन देत साकडे घातले. यावेळी चिपळूणचे आमदार शेखर निकम, शृंगारपूरचे … Read more

मेढावासीयांचा पाणी प्रश्न कायमचा सुटणार; पाणीपुरवठा प्रकल्पासाठी 15.49 कोटी निधी उपलब्ध

Medha News 20240925 111915 0000

सातारा प्रतिनिधी । सातारा- जावली मतदारसंघातील मेढा नागरपंचायतीच्या हद्दीतील नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा व्हावा आणि नागरिकांचा पाणी टंचाईचा प्रश्न कायमचा सुटावा यासाठी पाणीपुरवठा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पासाठी शासनाच्या नगरोत्थान योजनेतून तब्बल १५ कोटी ४९ लाख रुपये निधी उपलब्ध करण्यात आला आहे. यामुळे मेढावासीयांचा पाणीप्रश्न कायमचा सुटणार आहे. मेढा नगरपंचायतीची पाणीपुरवठा योजना जुनी झाली … Read more

जलसंपदा विभागाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत साताऱ्याच्या ‘सिंचन भवन’च्या प्रस्तावाला मंजुरी

Satara News 20240925 085728 0000

सातारा प्रतिनिधी | उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत काल मंगळवारी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या जलसंपदा विभागाच्या नियामक मंडळाच्या महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत सातारा शहरातील कृष्णानगर मध्ये भव्य आणि दिव्य ‘सिंचन भवन’ उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ … Read more

जिल्ह्याच्या विकासासाठी उद्योग, पर्यटन क्षेत्राच्या वाढीला विशेष चालना द्या: राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

Satara News 20240925 075911 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी उद्योग व पर्यटन क्षेत्राच्या वाढीला विशेष चालना द्यावी आणि पर्यटन वाढीसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमध्ये परदेशी पर्यटक आकर्षित करण्यासाठीही प्रयत्न करावेत, असे निर्देश राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी दिले. सातारा येथील शासकीय विश्रामगृहात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मंगळवारी रात्री अधिकाऱ्यांची प्रशासकीय बैठक घेतली. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, पुणे विभागीय … Read more

ग्रामसेवक नाही तर आता ग्रामपंचायत अधिकारी…; साताऱ्यात ग्रामसेवक संघटनेच्यावतीने आनंदोत्सव

Satara News 20240924 204218 0000

सातारा प्रतिनिधी | ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांची ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी नावाने ओळख होती. मात्र, आता दोन्ही पदे रद्द करुन यापुढे केवळ ग्रामपंचायत अधिकारी या पदनामाने नवी ओळख या अधिकाऱ्यांना मिळाली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे ग्रामसेवक संघटनेनेनेही याचा फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. ग्रामपंचायतीला शासकीय प्रतिनिधी म्हणून काम करणारे … Read more

तीर्थक्षेत्र विकासांच्या 305 कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजूरी; सातारा जिल्ह्यात ‘या’ ठिकाणांच्या कामास अतिरिक्त निधीस मान्यता

Satara News 20240924 183338 0000

सातारा प्रतिनिधी | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्यस्तरीय शिखर समितीची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासाच्या सुमारे 305 कोटी 63 लाख रुपयांच्या आराखड्यांना मंजूरी देण्यात आली असून या आराखड्यात सातारा जिल्ह्यातील काही तीर्थस्थळ व ठिकाणांचा समावेश आहे. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत … Read more

‘अशांना गोळ्या घालून नाही तर…’; अक्षय शिंदे ‘एन्काऊंटर’वर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया

Satara News 20240924 172941 0000

सातारा प्रतिनिधी । राज्याला हादरवून टाकणाऱ्या बदलापूरमधील खासगी शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी सायंकाळी अचानक पोलिसांशी झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. या घटनेनंतर सत्ताधारी महायुती सरकारमधील शिवसेनेसह इतर पक्षांनी या कारवाईचं समर्थन केलं. तसंच पोलिसांच्या कारवाईचं जोरदार कौतुकही केलं आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षांनी पोलिसांच्या कारवाईवर संशय व्यक्त करत महायुती सरकारवर … Read more