उदयनराजेंच्या दिल्लीतील मुक्कामावरून सुप्रिया सुळेंचा भाजपवर निशाणा

Satara News 2024 03 24T193659.240 jpg

सातारा प्रतिनिधी । राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यातून उमेदवारी मिळावी यासाठी दिल्लीत तीन दिवस मुक्काम ठोकला. त्यानंतर शनिवारी रात्री त्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत भेट झाली. शाह यांच्यासोबत भेटीमध्ये दोघांच्यात सकारात्मक चर्चा पार पडली. मात्र, यासाठी खा. उदयनराजेंना दिल्लीत तीन दिवस थांबावे लागले. या घडामोडीवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया … Read more

साताऱ्यातील राष्ट्रवादी भवनमध्ये झाली महत्वाची बैठक; ‘या’ तारखेपासून पदाधिकारी विधानसभा मतदारसंघनिहाय दौऱ्यावर

Satara News 2024 03 23T194144.231 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा येथील राष्ट्रवादी काँग्रेस भवनामध्ये नुकतीच महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर देखील चर्चा करून काही निर्णय घेण्यात आले. महाविकास आघाडीचा कोणीही उमेदवार असला तरीही दि. २६ पासून विधानसभा मतदारसंघात एकत्रित प्रचार करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. सातारा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतून राष्ट्रवादीचा शरद पवार गट लढणार आहे. तर महायुतीत … Read more

Abhijit Bichukle : बिग बॉस फेम अभिजित बिचुकले सातारा लोकसभेची निवडणूक लढणार…

Satara News 2024 03 23T175049.467 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. एकीकडे उदयनराजेंची उमेदवारीसाठी पळापळ सुरु असताना दुसरीकडे महायुतीत अजित पवार गटाने देखील सातारा लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे. या दरम्यान, आता बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukle) यांनी मी सातारा लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे सांगत उदयनराजे भोसले यांच्यावर निशाणा … Read more

Udayanraje Bhosale : उदयनराजे शाहांच्या भेटीसाठी दिल्लीत ठाण मांडून; इकडं नरेंद्र पाटलांनी भाजपकडं मागितलं तिकीट

Narendra Patil News jpg

सातारा प्रतिनिधी । सध्या सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छूक असलेले माजी खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) हे सध्या दिल्लीत गेल्या दोन दिवसांपासून ठाण मांडून बसले आहेत. उदयनराजेंचा दिल्लीतील आजचा तिसरा दिवस असून आज त्यांची भेट अमित शाह यांच्याशी होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, इकडे साताऱ्यात वेगळ्याच घडामोडी घडत आहेत. 2019 लोकसभेला शिवसेनेच्या … Read more

सातारा जिल्हा परिषदेच्या ‘मी जबाबदारी घेणार’ कार्यशाळेत अधिकाऱ्यांनी घेतली प्रतिज्ञा

Satara zp News 1 jpg

सातारा प्रतिनिधी । भारत निवडणूक आयोग आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ घोषणा केली असून याची आचार संहिता दि. 16 एप्रिल रोजी सायं 4 वाजल्यापासून जाहीर झाली आहे. या निवडणूक काळात जिल्हा प्रशासनाकडून अनेक उपक्रम तसेच निवडणूक कार्यक्रम राबविले जात आहेत. या अनुषंगाने सातारा जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी हे प्रत्येकी १० मतदारांची जबाबदारी घेणार आहेत. … Read more

पाटणच्या 540 दरडग्रस्तांसाठीचा घरांचा आराखडा शासनाकडे सादर; 165 कोटी रुपयांचा निधी मंजूर

Patan News 1 1 jpg

पाटण प्रतिनिधी । पाटण तालुक्यात तीन वर्षांपूर्वी मुसळधार पावसाने 8 ठिकाणी भूस्खलन होऊन दरड कोसळल्याची घटना घडली होती. या गावातील 540 दरडग्रस्त कुटुंबांना कायमस्वरुपी घरे देण्याचा शुभारंभ नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमात करण्यात आला. शासनाच्या नगर विकास खात्याचा एमएमआरडीए विभाग त्यांना घरे बांधून देणार असल्याचे शासनाने जाहीर केले होते. परंतु, केवळ तीन दिवसांत हा निर्णय … Read more

जानकरांनी घेतली संजीवराजेसह रघुनाथराजे नाईक-निंबाळकरांची भेट; 2 तास कमराबंद केली चर्चा

Mahadev Janakar News 20240322 073050 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | भाजप ‘हायकमांड’ने माढा लोकसभेसाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवला आहे. त्यामुळे दुखावलेले गेलेले धैर्यशील मोहिते-पाटील यांची नाराजी अजुनही दूर झालेली नाही. त्यामुळे त्यांनी मतदारसंघातील गावभेटीवर जोर दिला आहे. तर ‘रासप’चे महादेव जानकर यांनीही संजीवराजे आणि रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांची भेट घेतली. तिघांच्यामध्ये सुमारे दोन तास कमराबंद चर्चा पार पडली. तिघांच्या … Read more

फलटणच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात रामराजेंची खोचक टीका; म्हणाले की…

Phaltan News 20240322 065801 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | नरेंद्र मोदी, अमित शहा आम्हाला माहिती नाहीत. आम्ही तेवढे मोठे पण नाही. आमचं देणं घेणं अजितदादांशी आहे, असं सांगत देवेंद्र फडणवीस यांच्या ऐवजी रणजितसिंह निंबाळकरांनाच मुख्यमंत्री करा, अशी खोचक टीका आमदार रामराजे नाईक-निंबाळकरांनी कोळकी (ता. फलटण) येथील मेळाव्यात केली. मतदान कमी झाल्यास आम्ही जबाबदार नाही भावनेच्या भरात तुतारी धरु, मशाल धरु, शिट्टी … Read more

साताऱ्याहून मुंबईला जाताना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या मोटारीला अपघात, आठवले सुखरूप

Ramdas Athawale News 20240321 201115 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | साताऱ्याहून मुंबईकडे जात असताना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मोटारीला कंटेनरने धडक दिली. पुणे-बंगळुरू महामार्गावरील भुईंज (ता. वाई) हद्दीतील बोगद्यात ही घटना घडली आहे. या अपघातात आठवले यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले असून रामदास आठवले हे सुखरूप आहेत. दुसऱ्या वाहनाने ते मुंबईकडे रवाना झाले. आठवलेंच्या गाडीचे मोठे नुकसान घटनास्थळावरून मिळालेल्या … Read more

फडणवीसांसोबतच्या चर्चेनंतर रामराजे आज घेणार मेळावा; काय भूमिका स्पष्ट करणार?

Ramraje Nimbalakr News 20240321 103952 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी होवू घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन आज दि. 21 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता अनंत मंगल कार्यालय, कोळकी येथे केले आहे. विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी काही महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने … Read more

खासदार उदयनराजे अचानक दिल्लीला रवाना, उमेदवारीचा गुंता सुटणार?

Satara News 20240321 064244 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचा गुंता सुटायला तयार नाही. तो गुंता सोडवण्यासाठी आणि उमेदवारीच्या संदर्भात निर्णायक चर्चा करण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले दिल्लीला रवाना झाले आहेत. राजे समर्थकांचे फोन अचानक आऊट ऑफ कव्हरेज लागू लागल्याने राजांच्या दिल्लीवारीच्या शक्यतेला पुष्टी मिळाली आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी यंदा लोकसभेत पुढच्या दाराने सभागृहात पोहोचण्याचा चंग बांधला आहे. … Read more

सातारा जिल्ह्यातून 1400 मुली, महिला बेपत्ता; आ. शिवेंद्रसिंहराजेंनी दिले पोलीस अधीक्षकांना निवेदन

Satara News 2 jpg

सातारा प्रतिनिधी । गेल्या काही दिवसांपासून सातारा जिल्ह्यामध्ये मुली किंवा महिला बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झालेली पहायला मिळत आहे. वृत्तपत्रांमध्ये दररोज मुली अथवा महिला बेपत्ता झाल्याच्या बातम्या येत असतात. मिळालेल्या महितीनुसार आज अखेर आपल्या सातारा जिल्ह्यामधून सुमारे १४०० मुली, महिला बेपत्ता झाल्या असल्याचे समजत आहे. ही बाब अतिशय गंभीर आणि चिंताजनक आहे. बेपत्ता महिला, … Read more