देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करा : जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम

Karad News 59

कराड प्रतिनिधी । भाजपचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यात महायुतीच्या आठही उमेदवारांनी घवघवीत यश मिळाले आहे. तसेच राज्यातही भाजपने १२८ जागा मिळवल्या आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावे, अशी एकमुखी मागणी सातारा भाजप पदाधिकाऱ्यांनी बैठकीत ठरावाद्वारे केली आहे. पदाधिकाऱ्यांचा हा ठराव वरिष्ठाला नेतृत्वाला कळवण्यात येणार असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष … Read more

शरद पवार आज कराडला येणार; निकालावर नेमकं काय बोलणार?

Karad News 20241124 093155 0000

कराड प्रतिनिधी | राज्यातील विधानसभा निवडणुकीचा काल निकाल लागला. सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीने महाविकास आघाडीचा सुपडासाफ केला. या निकालानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार आपला पहिला दौरा करत असून ते आज कराड येथे मुक्कामी येत आहेत. या दौऱ्यावेळी ते निकालाबाबत नेमकं काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. सातारा जिल्ह्यात … Read more

कोणत्याही परिस्थितीत कराडकरांचा विश्वास सार्थ ठरवणार; विजयानंतर डॉ. अतुलबाबा भोसलेंची पहिली प्रतिक्रिया

Karad News 20241123 223545 0000

कराड प्रतिनिधी | कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा दारुण पराभव केल्यानंतर भाजप महायुतीचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी माध्यमांशी संवाद साधला. “विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती आला आहे. माझ्या मनात कोणाबद्दलही द्वेष भावना, सुड भावना नाही. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून आपल्याला एक लोकप्रतिनिधी, मोठा नेता म्हणून खूप अपेक्षा होत्या. मात्र, त्यांनी … Read more

माण-खटावमध्ये गोरे बंधूंनी केला करेक्ट कार्यक्रम; जयकुमार गोरे विजयी प्रभाकर घार्गे पराभूत

Political News 15

सातारा प्रतिनिधी । जिल्ह्यातील कायम दुष्काळी भागातील माण-खटाव विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार जयकुमार गोरे चौथ्या विजयासाठी निवडणूक लढवली. आणि 49 हजार 478 मतांची आघाडी घेत पुन्हा विजय मिळवला आहे. या ठिकाणी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी आमदार प्रभाकर घार्गे यांचा त्यांनी द्रूण पराभव केला आहे. माण खटाव विधानसभा निवडणुकीत जयकुमार गोरे यांना 1 … Read more

फलटणात सचिन पाटील तर कोरेगावात महेश शिंदेंनी मिळवला विजय

Political News 13

सातारा प्रतिनिधी । आज सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघातील निवडणुकीसाठीचा निकाल लागला असून कोरेगाव विधानसभा मतदार संघात शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते महेश शिंदे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते शशिकांत शिंदे यांचा दारुण पराभव केला आहे. या ठिकाणी महेश शिंदे यांना 1 लाख 46 हजार 166 मते पडली असून शशिकांत शिंदे यांना 1 … Read more

कराड दक्षिणेत फुललं कमळ!; पृथ्वीराज चव्हाण यांच्या पराभवाची 5 कारण

Karad News 58

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील काँग्रेसचा हक्काचा बालेकिल्ला कोणता म्हणाला लागेल तर तो कराड दक्षिण विहंसभा मतदार संघ होय. या ठिकाणी काँग्रेसची एकहाती सत्ता होती. मात्र, विधानसभा निवडणूक २०२४ लागली आणि निवडणुकीत भाजपच्या डॉ. अतुल भोसलेंनी हा बालेकिल्ला काबीज केला. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांचा विचारांचा वारसा सांगणाऱ्या कराडचा कृष्णाकाठ होय. मागच्या काही दिवसात हा कृष्णाकाठ … Read more

कराड उत्तरमध्ये 25 वर्षानंतर परिवर्तन! मनोज घोरपडे विजयी तर बाळासाहेब पाटील पराभूत

Karad North News 1

कराड प्रतिनिधी । उत्तर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र शरद पवार गटाकडून राज्याचे माजी सहकार मंत्री व विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील विरुद्ध भाजपचे मनोज घोरपडे असा सामना रंगला. बाळासाहेब पाटील आतापर्यंत पाच वेळा कराड उत्तरचे आमदार राहिलेत. मात्र, यावेळेस त्यांचा महायुती भाजपचे उमेदवार मनोज घोरपडे यांनी दारुण प्राभाव केला आहे. उत्तरेत पंचवीस वर्षे असणारी बाळासाहेब … Read more

पाटणमध्ये पुन्हा शंभू’राज’ देसाई; सत्यजित पाटणकर अन् हर्षद कदमांचा दारुण पराभव

Patan News 9

पाटण प्रतिनिधी । पाटण विधानसभा मतदार संघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते तथा साताऱ्याचे पालकमंत्री व उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. या ठिकाणी अपक्ष म्हणून सत्यजित पाटणकर तर उद्धवसेनेचे हर्षद कदम यांनी मंत्री देसाई यांच्यासमोर आव्हान उभे केले होते. मात्र, या ठिकाणी त्यांचा फारसा प्रभाव पाडता आला नाही आणि मंत्री … Read more

वाईत पुन्हा मकरंद आबांचा विजय; पवार गटाच्या अरुणादेवी पिसाळ यांचा पराभव

Wai News 2

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात विधानसभेच्या आठही जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळविल्यामुळे जिल्ह्यात शरद पवार आणि काँग्रेसचा एकेकाळचा गड ढासळला असून महायुतीचाच बालेकिल्ला तयार झाला आहे. भाजपच्या चार, शिंदेसेनेच्या दोन आणि अजित पवार गटाने दोन जागांवर विजय मिळवत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना देखील विजयापर्यंत पोहोचू दिले नाही. वाई विधानसभा मतदारसंघातही अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या … Read more

कराड दक्षिणेत डॉ. अतुलबाबा भोसले विजयी; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा दारुण पराभव

Karad News 57

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यासह संपूर्ण राज्याच लक्ष लागून राहिलेल्या आणि कॉँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात भाजप महायुतीचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी हॅट्ट्रीक साधण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या महाविकास आघाडीचे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा दारुण पराभव केला आहे. सुमारे 38 हजार 366 मतांनी डॉ. अतुलबाबा भोसले (Atul Bhosale) यांनी आपला 15 वर्षाचा … Read more

साताऱ्यात मिळवला शिवेंद्रराजे भोसलेंनी विजय; दोन्ही मिशा पिरळत विजयानंतर दिली ‘हि’ पहिली प्रतिक्रिया

Satara News 86

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघापैकी केवळ सातारा विधानसभा मतदार संघातील निवडणूक एकतर्फी होती. या ठिकाणी भाजपाचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी याठिकाणी मोठी आघाडी घेत नुकताच विजय मिळवला आहे. निवडणुकीत त्यांना 1 लाख 76 हजार 849 इतकी मते पडली. त्यांनी विरोधात असलेल्या शिवसेनेचे (उबाठा) अमित कदम यांचा खूप मोठ्या फरकाने पराभव केला … Read more

कराड दक्षिणेत अतुलबाबा भोसले तर उत्तरेत मनोजदादा घोरपडे आघाडीवर

Karad News 56

कराड प्रतिनिधी । कराड दक्षिण आणि कराड उत्तर विधानसभा मतदार संघात अत्यंत चुरशीची लढत झाली असून या ठिकाणी आतापर्यंत झालेल्या फेरीच्या मतमोजणीत महायुतीचे उमेदवार आघाडीवर राहिले आहेत. कराड दक्षिण मतदार संघाची मतमोजणीची बारावी फेरी पार पडली असून या फेरीत पृथ्वीराज चव्हाण यांना 6742 मते तर डॉ. अतुल भोसले यांना 9384 इतकी मते मिळालेली आहेत. या … Read more