‘हट्ट कुणाचाही असो, हक्क तुमचाच’; साताऱ्याच्या उमेदवारीसाठी कार्यकर्त्यांचा अजितदादांसमोर आग्रह

Ajit Pawar News 20240328 113345 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभा उमेदवारीवारीवरील दावा सोडायला अजितदादा गट तयार नाही. ‘हट्ट कुणाचाही असो, हक्क तुमचाच असून साताऱ्याचा उमेदवार राष्ट्रवादीचाच असावा ‘, अशी भूमिका मांडत साताऱ्यातील कार्यकर्त्यांनी अजितदादांसमोर उमेदवारीचा आग्रह धरला. उमेदवार राष्ट्रवादीचाच असावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातारा लोकसभा उमेदवारीच्या संदर्भात मते जाणून घेण्यासाठी बुधवारी (दि. २७) पुण्यात कार्यकर्त्यांची बैठक घेतली. बैठकीला वाईचे … Read more

खासदार उदयनराजे भोसले यांचं शिरवळमध्ये जंगी स्वागत; साताऱ्यात पोहचताच केली निवडणूक लढण्याची गर्जना

Udaynraje Bhosale News 20240327 191838 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | उमेदवारी संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत तळ ठोकून बसलेले खासदार उदयनराजे भोसले आज साताऱ्यात आगमन झाले. जिल्ह्याच्या हद्दीवरील नीरा नदीच्या पुलावर राजे समर्थकांनी जेसीबीमधून त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. तसेच एक लाख फुलांचा तयार करून आणलेला हार घालून जल्लोषात स्वागत करण्यात आलं. खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर 5 जेसीबीमधून फुलांची उधळण … Read more

शरद पवार शुक्रवारी साताऱ्यात, चाचपणी करुन लोकसभेच्या उमेदवाराची करणार घोषणा?

Sharad Pawar News 20240327 182440 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण देखील चांगलच तापले आहे. हे वातावरण तापवायला अनेक घडामोडी सद्या सातारा जिल्ह्यात घडत आहेत. दरम्यान, महाविकास आघाडी तसेच महायुतीचाही सातारा लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार अजून ठरलेला नाही. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार शुक्रवारी साताऱ्याला धावती भेट देणार आहेत. तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन उमेदवारीची  चाचपणी करणार आहेत. त्यामुळे साताऱ्याचा आघाडीचा उमेदवार कोण असणार हे शुक्रवारीच स्पष्ट होणार आहे. शरद पवार हे शुक्रवारी … Read more

पाटणला महाविकास आघाडीचा शनिवारी संवाद मेळावा

Patan News 20240327 172028 0000 jpg

पाटण प्रतिनिधी | सातारा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील मित्र पक्षांचा ‘संवाद मेळावा’ शनिवार दि. ३० मार्च रोजी ऋचा हॉल, काळोली (कराड-चिपळूण रोड) येथे दुपारी १२:३० वा. होणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे पाटण तालुका अध्यक्ष राजाभाऊ शेलार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. या संवाद मेळाव्यासाठी माजी मुख्यमंत्री व राष्ट्रीय कॉंग्रेसचे प्रमुख नेते पृथ्वीराज … Read more

लोकसभा निवडणुकीतच काँग्रेसने महिला जिल्हाध्यक्ष बदलला; सुषमा राजेघोरपडे यांची नियुक्ती

Satara News 20240327 152709 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीमुळे सद्या राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. अशात राष्ट्रीय काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षात बदल करण्यात आला आहे. महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांनी जिल्हाध्यक्षा अल्पना यादव यांच्या जागी सुषमा राजेघोरपडे यांची आता नियुक्ती केली आहे. महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष संध्या सव्वालाखे यांनी राजेघोरपडे यांना नियुक्तीपत्र दिले … Read more

अदानींच्या वीज प्रकल्‍प रद्द मागणीसाठी प्रकल्पग्रस्त थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा

Tarale News 20240327 121432 0000 jpg

पाटण प्रतिनिधी | तारळे ता. पाटण येथे मंगळवारी प्रकल्पबाधित व श्रमिक मुक्ती दलाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यातून श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी अदानी यांच्या वीज निर्मितीच्या प्रकल्पास विरोध दर्शवत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढणार आहे. त्यापूर्वी मेळावा घेणार असल्याची घोषणा डॉ. पाटणकर यांनी यावेळी केली. तारळे येथील मेळाव्यातून डॉ. पाटणकर म्हणाले … Read more

आई-बाबा, कृपया मतदान करा; मतदान जागृतीसाठी विद्यार्थ्यांनी लिहिली पत्र

Phalatan News 20240327 110655 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीत मतदार जागृतीसाठी फलटण विधानसभा मतदारसंघात विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर मतदार जागृतीसाठी तडवळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नुकताच कार्यक्रम झाला. यावेळी “आपली लोकशाही जगप्रसिद्ध आहे. ही लोकशाही अधिक प्रगल्भ होण्यासाठी आई आणि बाबा, प्लीज मतदान करा”, असे आवाहन तडवळे, ता. फलटण येथील विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना पत्रे लिहून … Read more

Ajit Pawar : उदयनराजेंच्या साताऱ्यातील उमेदवारीबाबत अजितदादांनी केलं मोठं विधान; म्हणाले की…

Satara News 2024 03 26T200231.428 jpg

सातारा प्रतिनिधी | उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीची पुण्यात ‘बोट क्लब’ येथे आज बैठक पार पडली. या बैठकीत बारामती, शिरूर, सातारा, धाराशिव, नाशिक, रायगड, परभणी लोकसभा मतदारसंघांबाबत चर्चा झाली. यावेळी सातारा लोकसभा मतदार संघ भाजपकडे गेला असून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी मिळाल्याच्या चर्चेवर अजितदादांनी महत्वाचे विधान केले. “साताऱ्याच्या बाबतीत जो काही निर्णय … Read more

कराडात रविवार होणार इंडिया आघाडीचा संयुक्त मेळावा, आ. बाळासाहेब पाटलांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती

Karad News 83 jpg

कराड प्रतिनिधी | इंडिया आघाडीचा संयुक्त मेळावा रविवारी सायंकाळी ४ वाजता पंकज हॉटेलच्या मल्टिपर्पज हॉलमध्ये होणार असल्याची माहिती माजी सहकार मंत्री, आमदार बाळासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष हर्षद कदम, सातारा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व अर्थ समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस … Read more

मसूरच्या मुख्य चौकातील सीसीटीव्ही यंत्रणा बंद

Masur News 1 1 jpg

कराड प्रतिनिधी । मसूर परिसरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि विविध गुन्ह्यांची उकल करण्यासाठी मसूरच्या मुख्य चौकात चारही दिशेला लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र, ते सध्या अनेक दिवसांपासून बंद असून नादुरुस्त आहेत. चौकात बंद अवस्थेतील सीसीटीव्ही कॅमेरे हे शोपीस बनून राहिले आहेत. मसूर परिसरातील वाढत्या गुन्हेगारीला आणि चोरीच्या घटनांना आळा बसून घटना कॅमेरात कैद … Read more

साताऱ्यात भाजपकडून उदयनराजेंनाच उमेदवारी, ‘या’ खासदाराने केला दावा

Satara News 20240326 140850 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | महायुतीत सातारा लोकसभा मतदारसंघाची जागा भाजप आणि राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी ठरत असली तरी महायुतीकडून साताऱ्यात उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्यावर एकमत झाले आहे. अशात भाजपचे खासदार रणजीत नाईक निंबाळकर यांनी मोठा दावा केला आहे. सातारा लोकसभेसाठी छत्रपती उदयनराजे भोसले यांची भाजपकडून उमेदवारी निश्चित करण्यात आली असल्याचे खा. निंबाळकरांनी म्हंटले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस … Read more

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने पृथ्वीराजबाबांवर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

Prithviraj Chavan News 20240324 210316 0000 jpg

कराड प्रतिनिधी | काँग्रेसकडून आगामी लोकसभा निवडणुकांसाठी प्रचार आणि व्यवस्थापनाची जय्यत तयारी केली जात आहे. या तयारीसाठी काँग्रेसकडून काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकांसाठी कॅम्पेन समिती स्थापन केली असून या कमिटीच्या अध्यक्षपदी पृथ्वीराज चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या … Read more