शिंदेवाडी – विंग येथे शुक्रवारी भव्य बांधकाम कामगार संमेलन; कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते लाभार्थींना होणार साहित्य वितरण

Karad News 20240919 194110 0000

कराड प्रतिनिधी | भारतीय जनता पार्टी कराड दक्षिणच्यावतीने शुक्रवारी (ता. २०) शिंदेवाडी – विंग येथे दुपारी ३ वाजता भव्य बांधकाम कामगार संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात राज्याचे कामगार मंत्री ना. डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते पात्र लाभार्थींना साहित्य वितरण केले जाणार आहे. याप्रसंगी भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले प्रमुख उपस्थित राहणार … Read more

मविआच्या उमेदवाराचा 74 हजारांच्या मताधिक्याने पराभव झाला असता; नेमकी कुणी केली टीका?

Koregaon News 20240919 125427 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे अधिकृत उमेदवार संजय गाडे यांच्या ‘एबी’ फॉर्ममध्ये स्वतः माझ्याकडून चूक झाली नसती, तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा ३७ हजार नव्हे, तर ७४ हजारांच्या मताधिक्याने पराभव झाला असता आणि तोंड दाखवायला जागा उरली नसती, असा टोला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष राजेंद्र गवई यांनी लगावला. रिपब्लिकन पार्टी ऑफ … Read more

मराठा आरक्षणप्रश्नी संभ्रम निर्माण करून राजकीय पोळी भाजून घेण्याचे सरकारचे काम – शशिकांत शिंदे

Satara News 20240919 102805 0000

सातारा प्रतिनिधी | मनोज जरांगे- पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा आंदोलन सुरू केले आहे. कोणत्याही समाजाच्या नेत्याला आंदोलनास बसण्याची हौस असते काय? सरकार म्हणून तुम्ही दिलेल्या ग्वाहीची अंमलबजावणी व्हावी, एवढीच आंदोलकांची अपेक्षा असते. नक्की आरक्षण कसे देणार, हे सरकारनेच जाहीर करायला हवे. आरक्षणाच्या बाजूला असल्याची भूमिका विरोधकांनी आधीच स्पष्ट केली आहे. पन्नास टक्क्यांच्या वरील आरक्षण … Read more

रामराजेंमुळे तालुक्याचा कायापालट : प्रितसिंह खानविलकर

Satara News 20240918 123334 0000

सातारा प्रतिनिधी | “आजवर तालुक्यात जल क्रांती, औद्योगिक क्रांती व फलटण तालुक्याचा कायापालट हा श्रीमंत रामराजे यांनी केला आहे! हे संपूर्ण तालुक्याला ज्ञात आहे. माजी नगरसेवक अनुप शहा यांनी भान ठेवून आरोप करावेत. आमच्या नेत्यांवर केलेली टीका आम्ही सहन करणार नाही”; असे मत राजे गटाचे कट्टर समर्थक प्रितसिंह खानविलकर यांनी व्यक्त केले. यावेळी खानविलकर म्हणाले … Read more

बारामतीचे पाणी फलटणला आणल्यामुळेच खासदारकी गेली – माजी खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर

Phalatan News 20240918 102741 0000

सातारा प्रतिनिधी | सासवड, ता. फलटण येथील धोम बलकवडी मायनर 37 व 33 च्या उदघाटन रणजितसिंह नाईक निंबाळकर व ज्येष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी पराभवामागचे कारण बोलून दाखवले. बारामतीचे पाणी फलटणला आणल्यामुळेच आपली खासदारकी गेली आहे. परंतु, फलटण खासदारकी गेली, तरी फलटण तालुक्याच्या विकासाबाबत कसलीही … Read more

विधानसभा निवडणूक लागण्यापूर्वीच जिल्हा प्रशासन सज्ज

Satara News 20240917 174215 0000

सातारा प्रतिनिधी | विधानसभेचा बिगुल वाजला नसला तरी सातारा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. मतदारसंघाची मतमोजणी डिस्ट्रिक मार्केटिंग फेडरेशनच्या गोडावूनमध्ये होणार असल्याचे निश्चित झाले आहे. या निवडणुकीत सातारा आणि जावली तालुक्यांतील 464 मतदान केंद्रांवर सुमारे 3 लाख 41 हजार 833 मतदार हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीसाठी सुमारे 3 हजार 600 कर्मचार्‍यांची व्यवस्था करण्यात … Read more

पुणे – कोल्हापूर ‘वंदे भारत’ चे कराडात जल्लोषात स्वागत

Karad News 20240917 103412 0000

कराड प्रतिनिधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हर्च्युअलद्वारे देशातील १२ ‘वंदे भारत’ एक्सप्रेस रेल्वेचे काल लोकार्पण करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्राला ३ ‘वंदे भारत’ एक्सप्रेस रेल्वे मिळाल्या आहेत. दरम्यान, पुण्याला मिळालेल्या पहिल्या ‘वंदे भारत’ एक्सप्रेस रेल्वेचेही लोकार्पण करण्यात आले असून या कार्यक्रमाअंतर्गत कराड – ओगलेवाडी रेल्वे स्थानकावर या ‘वंदे भारत’ एक्सप्रेसचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. … Read more

आ. शशिकांत शिंदे हे फरार गुन्हेगार, खोट्या प्रतिज्ञापत्रावर त्यांनी वाशीमध्ये 6 कोटींचं घर घेतलं; आ. महेश शिंदेंचा गंभीर आरोप

Satara News 20240916 201554 0000

सातारा प्रतिनिधी | विधान निवडणुकीच्या तोंडावर कोरेगाव विधानसभा मतदार संघात आरोप-प्रत्यारोप शिगेला पोहचले आहेत. कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष आणि शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी शरद पवार गटाचे विधान परिषद आमदार शशिकांत शिंदेंवर गंभीर आरोप केले आहेत. कोरेगावचे आमदार पोलिसांना हाताशी धरून सुडबुध्दीने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना तडीपार करायला लावत असल्याचा आरोप आ. शशिकांत शिंदे यांनी केला … Read more

‘दक्षिण मांड’च्या सिंचन सर्वेक्षणासाठी 1 कोटी 65 लाख निधी मंजूर; डॉ. भारत पाटणकर

Dr. Bharat Patanakar News 20240915 145114 0000

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील महत्त्वाकांक्षी येवती उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणासाठी शासनाकडून एक कोटी ६५ लक्ष रुपये मंजूर असून, लवकरच सर्वेक्षण सुरू होणार असल्याचे श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष व समान पाणी वाटप चळवळीचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी म्हंटले. कोल्हापूर येथील सिंचन भवन येथे कृष्णा खोरे कोल्हापूर अधीक्षक अभियंता व अधिकारी यांच्यासोबत डॉ. पाटणकर … Read more

संभाजी काकडे यांची बाजार समितीच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड

Karad News 20240915 095643 0000

कराड प्रतिनिधी | शेती उत्पन्न बाजार समिती कराडच्या उपसभापतीपदी कराड तालुक्यातील कोरेगाव गांवचे संभाजी श्रीरंग काकडेयांची बिनविरोध निवड करणेत आली. उपसभापती पदाकरिता नुकत्याच झालेल्या निवडणुकीत एकच अर्ज आल्याने निवडणूक निर्णय तथा अध्यासी अधिकारी यांनी निवड बिनविरोध झाल्याचे घोषित केले. सदर निवडणूक कामी निवडणूक निर्णय अधिकारी तथा अध्यासी अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक सह.संस्था कराड चे संजय … Read more

अडीच वर्षात 52 हजार लोकांवर हल्ला! 10 जणांचा मृत्यू

Satara News 20240914 212758 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा शहरात पिसाळलेल्या कुत्र्याने ३३ जणांना चावा घेतल्याची घटना आता घडली असलीतरी मागील अडीच वर्षांत जिल्ह्यातील ५२ हजारांवर नागरिकांवर कुत्र्यांचा हल्ला झालाय. त्यातील १० जणांचा मृत्यू झाला आहे. यातील चावा घेणाऱ्या कुत्र्यांमध्ये भटक्या कुत्र्यांचा समावेश आहे. मोठे बंगले, घरी असणाऱ्या कुत्र्यांची काळजी घेण्यात येते. त्यासाठी आवश्यक लसीकरण करण्यात येते. पण, मोकाट कुत्र्यांच्याबाबत … Read more

आमदार शिवेंद्रराजे अनेक वर्षांनी जलमंदिर पॅलेसमध्ये, उदयनराजेंना दिलं हे ‘गोड’ गिफ्ट!

Satara News 20240914 114018 0000

सातारा प्रतिनिधी | भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची साताऱ्यातील जलमंदिर पॅलेसमध्ये राजकीय खलबते झाली‌. अनेक वर्षानंतर आ.शिवेंद्रराजे भोसले जलमंदिर पॅलेसमध्ये आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. सातारच्या राजकारणात देखील दोन्ही भावांच्या भेटीची चर्चा लागली रंगू आहे. या भेटीत बाबाराजेंनी उदयनराजेंना त्यांच्या आवडीचं कॅडबरी चॉकलेटही दिलं. आमदार शिवेंद्रराजे भोसले हे काही दिवसापूर्वी आजारी होते. … Read more