कराडचा पाणी प्रश्न गंभीर; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबांनी सांगितले ‘हे’ 5 पर्याय

Karad News 27

कराड प्रतिनिधी । कराड नगरपरिषदेच्या वारुंजी येथील जॅकवेलकडून पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्याने आज माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड व मलकापूरचे मुख्याधिकारी, NHAI चे अधिकारी, डीपी जैन कंपनीचे अधिकारी तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. यामध्ये कराडकरांना टॅंकरची संख्या वाढवून पाणीपुरवठा सुरू ठेवावा लागणार असून पर्यायी व्यवस्था म्हणून पुलावरून 500 एमएमची … Read more

पर्यटनस्थळांवर सुरक्षिततेच्या आवश्यक त्या उपाययोजना करा; शिवेंद्रसिंहराजेंच्या महत्वाच्या सूचना

Satara News 63

सातारा प्रतिनिधी । सातारा आणि जावळी तालुक्यात प्रतिवर्षी पावसाळी पर्यटन प्रारंभ होतो. भांबवली, वजराई, ठोसेघर आदी धबधबे पहाण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते; मात्र गोंधळ आणि हुल्लडबाजी यांमुळे सातत्याने दुर्घटना घडत असतात.अशा पर्यटनस्थळी पर्यटनास बंदी करण्यात आली आहे; मात्र त्याचा परिणाम स्थानिक भूमीपुत्रांच्या उद्योग-व्यवसायावर होऊन त्यांचे व्यवसाय धोक्यात आले आहेत. स्थानिकांचे हाल होऊ नयेत; त्यांचा चरितार्थ सुरळीत … Read more

नदीपत्रातील पाण्याच्या पाइप गेल्या वाहून गेल्यामुळे कराडातील पाणीपुरवठा ठप्प

Karad News 26

कराड प्रतिनिधी । कराड शहरासह परिसराला पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याने नागरिकांना पाणी पुरवठा होण्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत. परिणामी शहरातील नागरिकांवर मोठे जलसंकट उभे राहिले आहे. अचानक ही परिस्थिती उद्भवल्याने सोमवारी शहरात सकाळ व सायंकाळचा पाणीपुरवठा होऊ शकला नाही. येथील अडचण दूर करेपर्यंत जुने पंपिंग स्टेशन कार्यान्वित करून शहराला पाणीपुरवठा करावा, अशी … Read more

‘महायुतीत गडबड, बरेच नेते…’; भुजबळांच्या पवार भेटीवर बाळासाहेब थोरातांचं खळबळजनक वक्तव्य

Karad News 20240716 075529 0000

कराड प्रतिनिधी | राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांनी घेतलेल्या शरद पवारांच्या भेटीवरून वेगवेगळे तर्क लढवले जात आहेत. अशातच काँग्रेसचे विधीमंडळ गटनेते आ. बाळासाहेब थोरात यांनी महायुतीत बरीच गडबड असून अनेक नेते आमच्या संपर्कात यायला सुरूवात झाली असल्याची प्रतिक्रिया कराडमध्ये माध्यमांशी बोलताना दिली आहे. पवार भेटीचं दुसरंही कारण असू शकतं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, … Read more

टिपू सुलतानच्या तलवारीवर आक्षेप नाही मग वाघनखांवर का?; शिंवेंद्राराजेंचा सवाल

Satara News 20240716 072455 0000

सातारा प्रतिनिधी | छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्यावर चाल करून आलेल्या अफजलखानाचा वध केला, या पराक्रमाची इतिहासात नोंद आहे. गणेशोत्सवात या प्रसंगावरील देखाव्यावर कुणी आक्षेप घेऊ नये. विजय मल्ल्याने इंग्लंडमधून टिपू सुलतानच्या तलवारीची खरेदी करून ती भारतात आणली. त्यावर कुठल्या इतिहासकार, इतिहासतज्ज्ञांनी आक्षेप घेतला नाही. मात्र, छ. शिवाजी महाराज यांनी ज्या वाघनखांनी इतिहास घडवला, त्याबाबत … Read more

केंद्रातील BJP सरकार बदलाबाबत कराडात ‘शेकाप’च्या जयंत पाटलांचे मोठे विधान; थेट तारीखचं सांगून टाकली

Karad News 20240715 222620 0000 scaled

कराड प्रतिनिधी | केंद्रातील भाजप सरकार चार महिन्यांतच बदलणार आहे. त्यानंतर दिल्लीतील सरकारमध्ये पृथ्वीराज चव्हाण जातील. मी इंडिया आघाडीचा सदस्य आहे म्हणून सांगतोय, असे सूचक विधान शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी आज कराडात केले. कराड येथे आज एका कार्यक्रमास शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील व राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी उपस्थिती … Read more

अंगणवाडी सेविका आक्रमक; जिल्हा परिषदेपुढे विविध मागण्यासाठी केले छत्री आंदोलन

Satara News 58

सातारा प्रतिनिधी | साताऱ्यात अंगणवाडी सेविकांच्या वतीने आज अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. त्यांच्या या आंदोलनाची चांगलीच चर्चा दिवसभर सुरू होती. अंगणवाडी सेविका आणि मदतनीसही शासनाचे काम करत आहेत. त्यामुळे पेन्शन योजना लागू करावी, मानधनाएेवजी वेतन द्यावे यासह अन्य मागण्यांसाठी सेविका – मदतनीसांच्या वतीने सातारा जिल्हा परिषदेसमोर शेकडोच्या संख्येने उपस्थित राहत छत्री आंदोलन करण्यात आले. … Read more

राज्यात परत एकदा महायुतीचे सरकार आणण्यासाठी…; कराडात आ. सदाभाऊ खोत यांचे महत्वाचे विधान

Karad News 23

कराड प्रतिनिधी । विधान परिषदेच्या निवडणुकीत विजय झाल्यानंतर रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी आज कराड येथील दिवंगत यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी भेट देत अभिवादन केले. यावेळी त्यांनी “राज्यात परत एकदा महायुतीचे सरकार आणण्यासाठी सर्वांगीण प्रयत्न निश्चितपणाने केले जातील. शेतकरी, शेतमजूर, बारा बलुतेदार, गावगाडा यांच्या प्रश्नावरती काम करण्याचा प्रयत्न या आमदारकीच्या माध्यमातून करू,” असे महत्वाचे … Read more

महाबळेश्वरमध्ये विविध मागण्यासाठी दलित विकास आघाडीच्या वतीने आंदोलन

Mahabaleshwar News

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वर येथे विविध मागण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दल दलित विकास आघाडीच्यावतीने पालिकेपुढे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनातून झोपडपट्टी सुरक्षा दल दलित विकास आघाडीच्यावतीने पालिका प्रशासनास निवेदन देण्यात आले. पालिकेने उभारलेल्या सांस्कृतिक भवनाला लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे नाव द्यावे, झोपडपट्टीवासीयांना 8अचे उतारे द्यावेत, रामगड रस्त्यावर … Read more

साताऱ्यात भाजप जिल्हा कार्यालयात झळकले दोन्ही राजेंचे फोटो

Satara News 20240714 103221 0000

सातारा प्रतिनिधी | भाजप जिल्हा कार्यालयात खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे फोटो लावण्यात आले आहेत. उदयनराजे समर्थक व जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्यामध्ये वाद पेटला असताना अशात दोन्ही राजेंचे फोटो लावण्यात आल्याने त्यांच्या या फोटोंची चर्चा सद्या सुरू आहे. आमदार जयकुमार गोरे हे जिल्हाध्यक्ष असताना, विसावा नाका येथे भाजपचे जिल्हा कार्यालय सुरू करण्यात … Read more

ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर केलेल्या विश्वासघातामुळेच भाजपची घसरगुंडी; भास्कर जाधवांचा भाजपवर निशाणा

Karad News 20240714 093525 0000

कराड प्रतिनिधी | महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना ज्यांच्या बरोबर असते. त्यांनाच महाराष्ट्र सर्वाधिक जागा मिळतात. शिवसेना होती तेव्हा त्यांना २३ जागा मिळाल्या होत्या. मात्र, आता ठाकरेंची शिवसेना नसल्याने ते आता ९ जागांवर घसरले आहेत. शिवसेनेबरोबर केलेल्या विश्वासघातामुळेच भाजपाची घसरगुंडी झाल्याची टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना विभागीय संपर्क नेते आमदार भास्कर … Read more

कराडात ठाकरे गटाच्या मेळाव्यात भास्कर जाधवांसमोरच पदाधिकाऱ्यांचा राडा; अगोदर शाब्दिक चकमक नंतर लावली कानाखाली

Karad News 20240713 223433 0000

कराड प्रतिनिधी | कराड येथे विभागीय संपर्क नेते तथा आमदार भास्करराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा सातारा, सांगली जिल्हास्तरीय मेळावा पार पडला. या मेळाव्यावेळी सांगली जिल्ह्यातील शिवसेनेचा पदाधिकारी आणि कार्यकर्तेमध्ये जोरदार खडाजंगी झाली. यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या एका पदाधिकाऱ्याचा पारा चांगलाच वाढला आणि त्याने संतापाच्या भरात माजी पदाधिकारी, कार्यकर्त्याच्या कानाखाली … Read more