जातीय दंगली केल्याशिवाय निवडणुका जिंकता येणार नाहीत हेच BJP अन् RSS चं धोरण; पृथ्वीराज चव्हाण यांची टीका

Prithviraj Chavan News

सातारा प्रतिनिधी । कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापुरामध्ये हिंसाचाराची घटना घडली. या ठिकाणी प्रचंड नासधूस करण्यात आली होती. प्रार्थनास्थळावरही हल्ला करण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून विशाळगड अतिक्रमणामुळे चांगला वादामध्ये आला आहे. या सर्व प्रकरणावरून माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आज भाजप आणि आरएसएसवर निशाणा साधला. “राज्यात जातीय दंगली केल्याशिवाय निवडणुका जिंकता … Read more

कराड पालिकेच्या सर्वपक्षीय बैठकीत खडाजंगी; पाणी प्रश्नावरून अधिकाऱ्यांना नागरिकांचा रास्ता रोकोचा इशारा

Karad News 33

कराड प्रतिनिधी । कराड शहराच्या पाणी प्रश्नाबाबत चर्चा करण्यासाठी आज करात नगर पालिकेच्या सभागृहात सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत अधिकारी आणि नागरिक यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. यावेळी नागरिकांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तसेच कराड शहरातील पाणीपुरवठा तात्काळ पूर्ववत न झाल्यास रास्तारोको करून कराडमध्ये येणारी सर्व वाहतूक रोखण्याचा इशारा … Read more

शरद पवार पुण्यातील पक्ष कार्यालयात दाखल; बैठकीतून सातारा जिल्ह्यासह वाई मतदार संघाचा घेणार आढावा

Satara News 70

सातारा प्रतिनिधी । आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. येणाऱ्या निवडणुकीची रणनिती आखण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे आज पुण्यात आढावा बैठक घेत आहेत. या बैठकीसाठी पुण्यातील पक्ष कार्यालयात पवार दाखल झाले असून या बैठकीत सातारा जिल्हयाचा ते आढावा घेणार आहेत. वाई विधानसभा मतदार संघाचे आमदार मकरंद पाटील हे अजित … Read more

विशाळगडावरील अतिक्रमाणाला विरोधच पण राज्य शासन अपयशी : जयंत पाटील

Satara News 20240718 093302 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा येथील राष्ट्रवादी भवनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बुधवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विशाळगडावरील अतिक्रमणावरून राज्य सरकारवर निशाणा साधला. विधानसभा निवडणुकीतही जनतेचा कौल महाविकास आघाडीला राहील. तिन्ही पक्षात चर्चा करुन जागा वाटपाचा निर्णय होईल. सातारा जिल्ह्यातही मागीलपेक्षा चांगली स्थिती आघाडीची राहील, असा विश्वास व्यक्त करत विशाळगडावरील … Read more

कराडकरांचा पाणी प्रश्न अखेर मिटला, सायंकाळी होणार पाणी पुरवठा

Karad News 32

कराड प्रतिनिधी | पाईपलाईन वाहून गेल्यानं गेली पाच दिवस बंद असलेला पाणी पुरवठा बुधवारी सायंकाळपासून सुरळीत होणार आहे. जुने पंपिंग स्टेशन कार्यान्वित केल्यामुळे तब्बल पाचव्या दिवशी कराडकरांना पाणी मिळणार आहे. दरम्यान, गेली दोन दिवस बॅनर लावून कराडच्या प्रभागांमध्ये पाण्याचे टँकर फिरत होते. त्यामुळे कराडकरांना पाण्याचं राजकारण देखील पाहायला मिळालं. राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणांतर्गत सध्या नवीन कोयना … Read more

दिव्यांग मेळाव्यातून बच्चू कडूंचा राज्य सरकारवर निशाणा; म्हणाले,”तुम्हारी क्या औकाद”

Satara News 68

सातारा प्रतिनिधी । खटाव तालुक्यातील कातरखटाव येथे रयत आधार सोशल फाउंडेशन व प्रहार जनशक्ती पक्षाचा नुकताच दिव्यांग मेळावा पार पडला. या मेळाव्यातून प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक व दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष बच्चु कडू यांनी “जिसका कोई नही, उसका प्रहार है यारो”असे गौरवोद्गार काढले. मात्र, लाडकी बहीण योजनेवरून राज्य सरकारवर देखील निशाणा साधला. “शेतकऱ्यांना शेतातील पिकाला चांगला … Read more

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांच्या स्वागतासाठी सातारानगरी उत्सुक

Satara News 67

सातारा प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे शाहूनगरी सातारा येथे दि. 19 जुलै 2024 रोजी प्रदर्शनासाठी दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर आज पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रमुख अधिकाऱ्यांसह छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन दालनांची पाहणी केली व सूचना केल्या. या ऐतिहासिक घटनेचे स्वागत करण्यासाठी सातारा जिल्हा सज्ज असून हा सोहळा अत्यंत दिमाखदार … Read more

राज्य कबड्डी असोसिएशनची निवडणुक कायद्याच्या कचाट्यात

Karad News 30

कराड प्रतिनिधी । कार्यकारी समितीची वयोमर्यादा, कार्यकाल मर्यादा तसेच मतदानाच्या हक्काबाबत राष्ट्रीय क्रीडा संहितेत असलेले नियम पायदळी तुडवत आपल्याला सोयिस्कर पडणाऱ्या नियमानुसार महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या रविवार, दि. २१ जुलैला होत असलेल्या चौवार्षिक निवडणुकीला तात्काळ स्थगिती दिली जावी म्हणून सातारा जिल्हा हौशी कबड्डी असोसिएशनचे प्रा. अशोककुमार चव्हाण व राष्ट्रीय खेळाडू फिरोज पठान यांनी उच्च न्यायालयात … Read more

पाईपलाईन वाहून गेल्यानं कराड शहरात ‘पाणीबाणी’, कॉंग्रेस, भाजपचे नेते पोहोचले थेट ‘पंपिंग स्टेशनवर!’

Karad News 29

कराड प्रतिनिधी । कराड शहराला पाणी पुरवठा करणारी साईपलाईन नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याने तीन दिवसांपासून कराडकरांना पाणी पुरवठा होऊ शकलेला नाही. या पाणी समस्येवाट तोडगा काढण्यासाठी राजकीय नेत्यांनी थेट पंपिंग स्टेशन गाठलं. ऐन पावसाळ्यात कराडकरांवर पाणी टंचाईचा सामना करण्याची वेळ आली आहे. कराड शहर आणि परिसराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईनच नदीच्या प्रवाहात वाहून गेल्यामुळे ही … Read more

तोट्यातील महामंडळाची चौकशी करा;जिल्हा काँग्रेस कमिटीची मागणी

Satara News 20240717 081945 0000

सातारा प्रतिनिधी | महाराष्ट्रातील सार्वजनिक उपक्रम, महामंडळे, व कंपन्यांतील संचित तोट्यातील महामंडळाची चौकशी व्हावी, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटी चे वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. याबाबत अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांना जिल्हाध्यक्ष डॉ.सुरेशराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई, महिला प्रदेश सचिव धनश्री महाडिक, कोरेगाव तालुकाध्यक्ष अ‍ॅड. श्रीकांत चव्हाण, संदीप … Read more

जिल्हा वार्षिक योजनेतील कामांबाबत पालकमंत्री देसाईंचे यंत्रणांना निर्देश

Satara News 66

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सन 2024-25 चा 671कोटी 63 लाख रुपयांचा निधी अर्थसंकल्पीत असून यापैकी 223 कोटी 51 लाख 94 हजाराचीतरतूद बीडीएसवर प्राप्त झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 97 कोटी 41 लाख 65 हजार रुपये कामांच्या प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. मोठ्या रक्कमेची प्रशासकीय मान्यता जुलै महिन्याच्या सुरुवातीसच वितरित करण्यात सातारा जिल्हा … Read more

बच्चू कडूंचा विधान सभेसाठीचा पहिला उमेदवार ठरला; सातारा जिल्ह्यातून ‘या’ नेत्याला दिली संधी

Satara News 65

सातारा प्रतिनिधी | नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्या. आता विधानसभा निवडणुक जवळ आल्यामुळे त्याच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. या पक्षात प्रहार संघटना देखील मागे नाही. कारण प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार हे लोकसभा निवडणुकीनंतर आक्रमक बाणा घेतल्याचे दिसून येत आहे. त्यांनी महायुती सरकारमध्ये असतानाही भाजपसह, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाविरोधात विधानसभा … Read more