सातारा जिल्ह्यातील BJP च्या ‘या’ नेत्याला पोलिसांनी घेतले ताब्यात; नेमकं प्रकरण काय?

BJP Satara News

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात एकीकडे पश्चिम भागात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात असताना दुसरीकडे जिल्ह्यातील राजकीय व्सर्तृकात खळबळ उडवून देणारी घटना घडली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे चेअरमन वसंत लोढा यांना लोणंद पोलिसांनी एका खासगी साखर कारखाण्याच्या मशिनरी देखभाली प्रकारणात लाखोंचा गंडा घातल्या प्रकरणी ताब्यात घेतले आहे. … Read more

सातारा शहरातील खड्ड्यांत तरंगल्या कागदी होड्या! AAP च्या कार्यकर्त्यांचं अनोख निषेध आंदोलन

Satara Protest AAP Workers News

सातारा प्रतिनिधी । सातारा शहरातील अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून ऐन पावसाळ्यात वाहनधारकांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या खड्ड्यांकडे पायिकेकडून दुर्लक्ष केले जात असल्याने मंगळवारी दुपारी आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यांनी चक्क खड्ड्यांत साचलेल्या पाण्यात कागदी होड्या सोडून व वृक्षारोपण करून पालिकेच्या कारभाराचा अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविला. … Read more

कराड उत्तरेत आम्हीच विकासकामे मंजूर केल्याची काहींकडून वल्गना; बाळासाहेब पाटलांची BJP नेत्यांवर टीका

Balasaheb Patil News

कराड प्रतिनिधी । राज्याचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. या अधिवेशनात आमदारांच्या मतदार संघातील प्रस्तावित असलेल्या विकासकामांना मंजुरी दिली जात आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या कराड उत्तर विधानसभा मतदार संघात भाजप नेत्यांकडून अनेक विकास कामे आम्हीच मंजूर करून आणल्याचे सांगितले गेले असल्याने यावर आमदार बाळासाहेब पाटील यांनी आक्षेप … Read more

शरद पवारांकडून केंद्रीय शिक्षण आयोगाच्या PGI (2.0) अहवालाचा आढावा; राज्यातील शिक्षणाबाबत केलं महत्वाचं विधान

PGI 2.0 Repor Sharad Pawar News

कराड प्रतिनिधी । गेल्या आठवड्यात केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी परफॉर्मेंस ग्रेडिंग इंडेक्स २.० म्हणजे पी.जी.आय. अहवाल प्रसिद्ध केला होता. यात महाराष्ट्राची दुसऱ्या स्थानावरून थेट सातव्या स्थानावर घसरण झाली आहे. याच मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारला पत्र लिहिले होते. त्यानंतर आज पवारांनी मुंबईत केंद्रीय शिक्षण आयोगाच्या PGI (2.0)अहवालाबाबत महत्वाची … Read more

जुना वाद विसरत उदयनराजे-अजितदादा पुन्हा एकत्र; दादांच्या वाढदिवशी राजेंनी दिल्या ‘खास’ शुभेच्छा

Udayanraje Bhosale Ajit Pawar

कराड प्रतिनिधी । साताऱ्याचे छत्रपती खासदार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व सध्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यातील वाद सर्वपरिचित आहे. राजकारणात कोणी कोणाचा मित्र नसतो आणि शत्रूही नसतो, असे भाजपचे खासदार उदयनराजे नेहमी उल्लेख करतात. त्या उल्लेखाप्रमाणे उदयनराजे यांनी आज तसे दाखवूनही दिले आहे. खासदार उदयनराजे यांनी फेसबुक पोस्ट करत अजितदादा आणि त्यांच्यातील वैरत्व … Read more

कराडच्या विमानतळाबाबत देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा; पृथ्वीराजबाबांनी भर सभागृहात मानले धन्यवाद

Devendra Fadnavis Karad Airport Prithviraj Chavan

कराड प्रतिनिधी । राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस आहे. आजच्या चौथ्या दिवशी राज्यातील 28 विमानतळांच्या कामांबाबत प्रश्न उपस्थित झालेल्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेतली. राज्याच्या मध्यवर्ती भागात एक एअरपोर्ट असणे आवश्यक असून राज्यातील 28 विमानतळांसह कराड येथे एअरपोर्ट सुरु करण्यासाठी सर्वेक्षण केले जाईल. यासाठी एक कमिटी देखील स्थापन करण्यात आली … Read more

डॉ. अतुल भोसलेंच्या प्रयत्नांतून कराड दक्षिणमधील रस्ता सुधारणेसाठी 30 कोटींचा निधी मंजूर

Atul Bhosale News

कराड प्रतिनिधी । कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातील विविध गावांमधील रस्त्यांसह अन्य विकासकामांसाठी राज्याच्या पुरवणी अर्थसंकल्पात तब्बल ३० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या या निधीमुळे कराड दक्षिणमधील रस्त्यांचे जाळे आणखी मजबूत होण्यास मदत होणार आहे. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील ११ रस्ते हे अत्यंत … Read more

आमच्यावर टीका करणाऱ्यांनी अगोदर आत्मपरीक्षण करावे; नाव न घेता उदयनराजेंचा शिवेंद्रराजेंना टोला

Udayanaraje Bhosale News (1)

सातारा प्रतिनिधी । ज्यावेळी एखादा माणूस जी विकासकामे करतो, त्यावरून त्याची राजकीय उंची ठरवली जाते. गेल्या तीन दशकाच्या राजकारणात समाजकारणाद्वारे सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून विकासकामांना मी प्राधान्य दिले आहे. उदयनराजे केवळ तोंडाच्या वाफा सोडणारा माणूस नाही. जे विकासकामांवर टीका करतात, त्यांनी स्वतः काय केले याचे आत्मपरीक्षण करावे, असा टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी आ. शिवेंद्रसिंहराजे … Read more

आगामी निवडणुकीत महायुतीला किती जागा मिळणार? BJP टिफीन बैठकीत उदयनराजेंनी आकडेवारीच सादर केली

Udayanaraje Bhosale News

सातारा प्रतिनिधी । सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपच्या वतीने नुकताच टिफिन बैठकीचा कार्यक्रम घेण्यात आला. या बैठकीस खासदार उदयनराजे भोसले यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्वाचे विधान केले. “आगामी लोकसभा निवडणुकीनंतर देशात पुन्हा भाजप सत्तेवर येणार आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. या विधानसभा निवडणुकीत राज्यात … Read more

विरोधीपक्षनेते पदाबाबत बाळासाहेब थोरात यांचं मोठं विधान; म्हणाले की,

Balasaheb Thorat News

कराड प्रतिनिधी । विधानसभेत आमचे संख्याबळ जास्त आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते पद आम्हाला मिळावे. तशी मागणी आम्ही विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे करणार आहे. ही परिस्थिती का आली? 1 वर्षात दोनदा पक्ष फोडणं आजपर्यंत कधी झालेले नाही. राज्याच्या राजकारणात अशी गोंधळाची परिस्थिती कधीही पाहिली नाही. राज्याला एक मुख्यमंत्री असून दोन उपमुख्यमंत्री आहेत. एक पूर्वीचे मुख्यमंत्री आता उपमुख्यमंत्री … Read more

उदयनराजेंना दणका ! Supreme Court ने ‘या’ प्रकरणात दिला महत्वाचा निकाल

Udayanraje Bhosale Supreme Court

सातारा प्रतिनिधी । भाजपचे खासदार तथा छत्रपती उदयनराजे भोसले यांना सुप्रीम कोर्टाने नुकताच एका प्रकरणात दणका दिला आहे. बहुचर्चित आणि दोघा भावात वाद झालेल्या खिंडवाडी येथील 15.30 एकर जागेचा निकाल सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजूने सुप्रीम कोर्टाने दिल्याने खा. उदयनराजे भोसले यांना दणका बसला आहे. सर्व प्रकारची कायदेशीर लढाई जिंकून बाजार समितीच्या ताब्यात जागा … Read more

राष्ट्रवादी सोडली त्यावेळी इतरांसोबत पवारांनाही तलवार, वाघनख्या द्यायला पाहिजे होत्या; उदयनराजे भोसले

Udayanraje Bhosale 2

सातारा प्रतिनिधी | तलवार आणि वाघनखे प्रत्‍येकाच्‍या घरात असावी, असे मला वाटते. भाजप नेत्यांना मी तलवार आणि वाघनख भेट देत आहे, याचा कोणीही वेगळा अर्थ काढू नये. असे असते तर जेव्हा मी राष्ट्रवादी पक्ष सोडला तेव्हाच तलवार, वाघनखं भेट दिले असते. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मी अभिनंदन केले असून, लवकरच त्यांना देखील तलवार आणि … Read more