स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक लवकर घ्या; कराडच्या प्रीतिसंगमावर पंचायत समिती संघर्ष समितीचे आंदोलन

Movement of Panchayat Samiti Sangharsh Samiti on Pretisangam of Karad jpg

कराड प्रतिनिधी । राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मुदत संपून जवळपास 16 महिने कालावधी झाला आहे. राज्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती / नगरपालिका/महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात नसल्यामुळे, सामान्य नागरिकांचे छोटे मोठे प्रश्न उपस्थित होत आहेत. अशात सरकारने स्थानिक स्वराज्य संसंस्थेच्या निवडणूक लवकर घ्याव्यात, पंचायत समितीसह संबंधित संस्थेच्या पदावरून प्रशासक हटवून लोकप्रतिनिधी नियुक्त करावी आदी … Read more

राज्यातील सर्व निर्णय फडणवीसांच्या हाती तर मुख्यमंत्री शिंदे BJP च्या हातातील बाहुली : पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan Eknath Shinde Devendra Fadnavis News jpg

सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्यातील सर्व निर्णय हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच घेतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे फक्त नावापुरते मुख्यमंत्री आहेत. फडणवीस सांगतील तसे त्यांना वागावे लागते. त्यामुळे एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या हातातील बाहुली आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. माढा लोकसभा मतदारसंघातील माण, खटाव … Read more

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अमृत महोत्सव समारंभास कराडच्या प्रीतिसंगमावरून ‘यशवंत ज्योती’ने प्रारंभ

Karad News 1 1 jpg

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मंगळवार दि. 15 ऑगस्ट रोजी अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. या निमित्ताने स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला कराड ते सातारा अशी नेण्यात येणारी यशवंत ज्योत कराडच्या प्रीतीसंगमावर यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, उपाध्यक्ष अनिल देसाई, जेष्ठ संचालक विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते प्रज्वलित … Read more

मणिपूर घटनेवरून चित्रा वाघ यांचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाल्या की…

Chitra Wagh News jpg

पाटण प्रतिनिधी | मणिपूर या ठिकाणी घडलेली घटना हि दुर्दैवी आहे. या ठिकाणी घडलेल्या घटने प्रकरणी केंद्र सरकार बोलायला तयार आहे. चर्चेसाठी विरोधकांनाही निमंत्रण देण्यात आले. मात्र, निमंत्रण देऊनही विरोधी पक्षच चर्चेला येत नाही. यामध्ये विरोधकांकडून कुठेतरी राजकारण आणले जात असल्याची अशी दाट शक्यता आहे, अशी टीका करत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी विरोधकांवर हल्लाबोल … Read more

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण पाहणार हातकणंगले व कोल्हापूर लोकसभा मतदार संघाचे निरीक्षक म्हणून काम

Prithviraj Chavan News 1

कराड प्रतिनिधी । भारत जोडो यात्रानंतर काँग्रेस ने संघटन वाढीसाठी मोठी तयारी केल्याचे दिसते. याचं अनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कडून राज्यातील सर्व 48 लोकसभा मतदार संघात काँग्रेसची ताकद वाढीसाठी निरीक्षक म्हणून पक्षातील जेष्ठ नेत्यांना जबाबदारी दिली आहे त्यानुसार माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांना कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानुसार … Read more

दबाव तंत्राच्या राजकारणातही काँग्रेस पक्ष तत्वांशी एकनिष्ठ राहिला : आमदार भाई जगताप

Congress Bhai Jagatap News jpg

कराड प्रतिनिधी । देशात झालेल्या दबावतंत्रााच्या राजकारणात देखील काँग्रेसने आपले लोकशाही विचार सोडले नाहीत. काँग्रेस पक्ष आपल्या तत्त्वांची एकनिष्ठ राहिला. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वेगळी उर्जा दिसत आहे. याच बळावर राज्यातील महाविकास आघाडीत काँग्रेस पक्ष एक नंबरवर राहील, असा विश्वास काँग्रेसचे सातारा लोकसभा निरीक्षक, आमदार भाई जगताप यांनी व्यक्त केला. कराडात काँग्रेसचे सातारा लोकसभा निरीक्षक, आ. … Read more

कराड – चिपळूण रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये लावली चक्क भात रोपे; पाटणला सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा आंदोलनातून निषेध

20230808 175253 0000 jpg

कराड प्रतिनिधी । कराड – चिपळूण रस्त्याच्या नित्कृष्ट दर्जाच्या कामाबाबत मंगळवारी पठण तालुक्यातील संगमनगर ( धक्का ) येथे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीने रास्ता रोको करत निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी कराड-चिपळूण रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये भात रोपे लावून शासनाचा निषेध नोंदवला. यावेळी पाटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा सौ. स्नेहल जाधव, माजी प. सं.सदस्य बबनराव कांबळे, बाळासाहेब … Read more

‘त्या’ 12 सदस्यांची निवड न केल्यास आत्मक्लेश आंदोलन करणार; सुशांत मोरेंचा थेट राज्यपालांना E-Mail द्वारे इशारा

Sushant More News 20230808 160938 0000 jpg

सातारा प्रतिनिधी । अनेक दिवसांपासून विधानपरिषदेवरील राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची मुदत संपत असून या सदस्यांची नियुक्ती राज्यपालांकडून होत असते. मात्र, अद्यापही ही नियुक्ती झालेली नाही. याच कारणास्तव सातारा येथील सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी निकषानुसार राज्यपालांना ई-मेल द्वारे निवेदन देऊन नवीन सदस्यांची नियुक्ती लवकरात लवकर करावी. ही नियुक्ती न केल्यास उच्च न्यायालयात फेरजनहित याचिका दाखल … Read more

सातारा जिल्ह्यातील शेतकरी संघटना BRS सोबतच : रघुनाथदादा पाटील

Raghunathdada Patil 20230806 084120 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | बीआरएस पक्षाने आपकी बार किसान सरकार…चा नारा दिला आहे. त्यामुळे शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तन-मन-धनाने त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीत केंद्र व राज्य सरकारला BRS च्या माध्यमातून उखडून टाकणार असल्याचा इशारा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी दिला. सातारा येथील शासकीय विश्रामगृहामध्ये शनिवारी भारत राष्ट्रीय समितीची … Read more

14 वर्षांनंतरही कराडच्या ऑलिम्पिकवीर पै. खाशाबा जाधवांच्या कुस्ती प्रशिक्षण संकुलाचा प्रश्न अधांतरीच

Karad News 5

कराड प्रतिनिधी । सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनात अनेक प्रश्न विरोधक सत्ताधाऱ्यांना विचारत असून त्याची ते उत्तरे देत आहेत. आतापर्यंत अधिवेशनात कराडचा विमानतळ, एसटी बसस्थानक प्रलंबित काम आदींचे प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. मात्र, ऑलिम्पिकवीर पैलवान खाशाबा जाधव कुस्ती प्रशिक्षण संकुलाचा विषय काही अधिवेशनात उपस्थित केला गेलेला नाही. त्यामुळे 14 वर्षांनंतरही या ऑलिम्पवीराच्या … Read more

पृथ्वीराजबाबांच्या धमकी प्रकरणाची कायदेशीर चौकशी करा : कराडच्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून मागणी

Karad Prithviraj Chavan News

कराड प्रतिनिधी । राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा कराड दक्षिणचे आ. पृथ्वीराज चव्हाण यांना शनिवारी मध्यरात्री नांदेडच्या इसमाकडून ई-मेलद्वारे धमकी देण्यात आली. या प्रकरणी संबंधित इसमास अटक करण्यात पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेनंतर कराड आणि मलकापूर येथील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आज कराडचे डीवायएसपी अमोल ठाकूर यांची भेट घेतली. संबंधित प्रकरणाची कायदेशीर चौकशी करावी तसेच धमकी देणाऱ्याविरुद्ध कठोर … Read more

कराडच्या हातगाडाधारक व्यावसायिकांनी घेतली पृथ्वीराजबाबांची भेट; केली ‘ही’ महत्वाची मागणी

Karad Businessmen

कराड प्रतिनिधी । कराड येथे गेल्या अनेक दिवसांपासून काही स्थानिक युवकांकडून प्रीतिसंगम घाट परिसरात हातगाड्याद्वारे व्यवसाय करत असलेल्या व्यावसायिकांना त्रास दिला जात आहे. हप्ते मागणे, युवतींची छेड काढणे, व्यावसायिकांना दमदाटी करणे आदी प्रकार केले जात असल्याने याविरोधात कारवाई करण्याची मागणी संबंधित व्यवसायिकांकडून केली जात आहे. मात्र, पोलिसांकडून दुर्लक्ष केले जात असल्याने येथील हातगाडे व्यावसायिकांनी आज … Read more