पाचगणीत हुल्‍लडबाजांवर पाेलिसांचा राहणार वॉच; नियम माेडल्यास कडक कारवाई हाेणार

0
60
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सरत्‍या वर्षाला उद्या निरोप आणि नववर्षाच्‍या स्वागतानिमित्त पाचगणी येथे पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्‍यावेळी नववर्ष स्वागतोत्सव शांततेत पार पाडावा. यासाठी पोलिसांनी हुल्लडबाजांवर वॉच ठेवण्‍याची मोहीम आखली आहे. त्‍यानिमित्त बाजारपेठेतून संचलनही करण्यात आले.

नववर्षाचे स्वागत शांततेत व्हावे, तसेच या उत्सव दरम्यान हुल्लडबाजी करणारांवर कारवाई करण्याकरिता पाचगणी पोलिस ठाणे नेमणुकीचे पोलिस अधिकारी, पोलिस अंमलदार तसेच याव्यतिरिक्त स्वतंत्र एसआरपी प्लाटून वाहनासह अशी जादा पोलिस कुमकही पाचगणी येथे तैनात करण्यात येणार आहे.

दरम्यान, कोणत्याही प्रकारे वाहतुकीची कोंडी होणार नाही, यासाठी जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा व कराड वाहतूक नियंत्रण शाखेकडील अतिरिक्त कर्मचारी तैनात करण्यात येणार असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली आहे. पोलिस ठाणे हद्दीतील हॉटेल, लॉज, बंगलाधारकांना नोटिसची बजावणी करण्यात आली आहे.