कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून अनेक घटना घडत आहेत. कधी चोरी तर कधी मारामारी या घटना घडल्यानंतर पोलिसांकडून तात्काळ कारवाई देखील केली जातेय. मात्र, पोलीस विभागातही अनेकी समस्या आहेत. त्या संबधीत समस्या सोडवण्याकरिता उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा कार्यालय स्तरावर एक उपक्रम राबविला जात आहे. ‘संवाद तक्रारदारांशी’ हा उपक्रम पोलीस विभागाच्यावतीने राबविला जाय असून प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या गुरुवारी सकाळी 10 ते 1 या वेळेत पोलीस तक्रारदारांशी संवाद साधणार आहेत.
सातारा जिल्ह्यातील मुख्य अशा 7 तालुक्यात उपविभागीय स्थरावर हा उपक्रम पोलीस विभागाच्या वतीने राबविला जात आहे. सातारा जिल्ह्यात सातारा, कोरेगाव, वाई, कराड, फलटण, पाटण, वडूज अशा तालुक्यात उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात संवाद तक्रारदारांशी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.
या उपक्रामातंर्गत संबंधित स्टेशन हद्दीतील नागरिकांनी पोलीस विभागाशी आपल्या असणाऱ्या समस्या तक्रारीचे निवारण करण्याकरिता उपक्रमाच्या ठिकाणी उपस्थित रहावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. पोलीस प्रशासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमांतुन नागरिकांच्या तक्रारी, समस्या जाणून घेऊन चर्चा करून त्या सोडविल्या जाणार आहेत.